Enter your Email Address to subscribe to our newsletters
शासकीय वैद्यकीय महाविद्यायात वडीलांना डबा देण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्यास धक्काबुक्की करुन त्याला मारहाण केल्याची घटना सोमवार, ७ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पाच जणांव
उत्पादन विकासासाठी केंद्र सरकारचे मार्गदर्शननवी दिल्ली,जागतिक अंतराळ बाजारपेठेत भारताची क्षमता दुप्पट करण्यासाठी या क्षेत्रातील स्टार्टअप्सला बळ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मागील काही काळापासून स्टार्टअप्सची सेवा घेत आहे. राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ (एनडीआरसी) आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- राष्ट्रीय अंतरिक्ष प्रयोगशाळा (सीएसआयआर-एनएल) या संशोधन व विकास संस्थांच्या मदतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने स्टार्टअप्सला प्रोत्साहन
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. याच प्रकरणाची कारवाई पाटण्याऐवजी मुंबईतून केली जावी, अशी मागणी करणारी याचिका रियाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. बिहार सरकारने दाखल केलेली एफआयआर योग्य असून बिहार सरकारला तपासाचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने
नवी दिल्ली : पारदर्शी करप्रणाली आणि प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरुवारी एका विशेष कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहे. यामुळे प्रत्यक्ष कर सुधारणा कार्यक्रमाला गती मिळणार आहे.
नवी दिल्ली : सीमावादाच्या पृष्ठभूमीवर भारत व नेपाळदरम्यान परराष्ट्र मंत्रालय पातळीवर 17 ऑगस्ट रोजी चर्चा होणार आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्यांची ही बैठक नेपाळची राजधानी काठमांडू येथे होणार आहे. नेपाळच्या परराष्ट्र सचिव शंकरदास बैरागी आणि नेपाळमधील भारताचे राजदूत विनय क्वाटरा यांच्यात ही बैठक होईल.
उधमपूर : कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर खंडित करण्यात आलेली वैष्णोदेवीची यात्रा 16 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. या यात्रेच्या काळात कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, याबाबतची नियमावली स्थानिक प्रशासनातर्फे जारी करण्यात आली आहे.
ऐझवाल : आमदार डॉ. झेड. आर. थियमसंग यांनी मिझोरममधील दुर्गम चंपाई जिल्ह्यात वेळेवर वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध न झाल्याने महिलेची प्रसूती केली. त्यामुळे या महिलेला जीवदान मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी आमदार हे वैद्यकीय सेवा देत होते.
मुंबई : कोणत्या कलाकाराची किती मिळकत आहे, त्यावर फोर्ब्ज कंपनी दरवर्षी सर्वे घेत असते. या वर्षीही त्यांनी तो घेतला. यंदा या मिळकतीत फरक पडेल असं अनेकांना वाटलं. कारण 2020 चं निम्म वर्ष कोरोनाने गिळंकृत केलं आहे. त्यामुळे काम नाही. त्यामुळे मानधनही नाही. पण फोर्ब्जने जारी केलेले आकडे पाहाल तर थक्क व्हाल. त्यांच्या सर्वेनुसार अभिनेता अक्षयकुमार या वर्षात मानधन मिळवलेला भारतातला सर्वाधिक श्रीमंत कलाकार बनला आहे. तर जगात त्याचा नंबर आहे सहावा. तर पहिल्या नंबरवर आहे. द रॉक.
नवी दिल्ली : व्यंकय्या नायडू यांचा आज मंगळवारी उपराष्ट्रपती म्हणून तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. यानिमित्त अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदनही केले.
नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश राखून ठेवला. न्यायालयाने सर्व पक्षांच्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद संक्षिप्त स्वरुपात लेखी देण्याच्या सूचना केल्या आहेत.
नवी दिल्ली : मागील पाच दिवसांत आज मंगळवारी प्रथमच नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 53,601 नवे बाधित आढळल्यामुळे देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 23 लाखांच्या जवळ पोहोचली आहे.
मॉस्को : रशियाने कोरोना विषाणूविरोधात विकसित केलेली लस पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरली होती. रशियाने येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावेळी प्राधान्यक्रम ठरवताना डॉक्टर आणि शिक्षकांना या लसीची पहिली मात्रा देण्यात येईल, अशी माहिती रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली.
वॉशिंग्टन : चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजला आहे. या मुद्यावर चीनने जगभराचा रोष ओढवून घेतला असताना, चीनने हा विषाणू लष्करी प्रयोगशाळेत तयार केला, असा दावा चीनमधून अमेरिकेत पलायन केलेल्या एका महिला वैज्ञानिकाने केला आहे. हा विषाणू विक्राळ रूप धारण करीत असल्याची जाणीव चीनला मागील वर्षी डिसेंबरमध्येच झाली होती, पण त्यांनी ही बाब उघड होऊ दिली नाही, असा दावा देखील या वैज्ञानिकाने केला आहे.
सेऊल : दक्षिण कोरियातील नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीपोटी 2.25 ट्रिलियन डॉलर्स मूल्यांचे कागदी चलन, नाणी नष्ट केल्या किंवा त्यांचे नुकसान केले असल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेकडे आता खराब झालेल्या चलनांचा खच पडून असल्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्यास सुरुवात होत असून बुधवारी तब्बल ९६ नवीन रुग्ण आढळून आले. ४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून दिवसभरात एका जणाचा मृत्यू झाला.
पाचोरा : गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेल्या पाचोरा नगरपरिषदेच्या भाजीपाला मार्केट जागेवरील बांधलेल्या व्यापारी संकुलातील संभ्रमित गाळे लिलाव प्रक्रियेला अखेर.जिल्हाधिकारी यांनी ३ नोव्हेंबर रोजी याबाबतीत आर्थिक व्यवहारावर निर्बंध घालणारे आदेश पारित केले आहे.
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात रविवारी ८६ रुग्ण बरे होवून घरी परतले असून जिल्हाचा रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच रविवारी जिल्ह्यात ३८ नवीन रुग्ण आढळून आले. तर कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : टेबल, खुर्च्या, खेळणी आणि क्रीडा साहित्याच्या आयातीसाठी लवकरच परवान्याची आवश्यकता राहील. आयातीचे प्रमाण कमी करून देशातील उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला, असे या घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले.
नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात भविष्य निर्वाह निधीतील वजावट 10 टक्के करण्यात आली होती, पण आता मोकळीकच्या तिसर्या टप्प्यात बहुतांश उद्योग आणि व्यवसाय सुरू झाले असल्याने, ही वजावट पूर्ववत 12 टक्के इतकी करण्यात आली आहे. यामुळे कर्मचार्यांच्या हातात येणारे वेतन कमी होणार असले, तरी त्यांच्या भविष्यातील पुंजीत वाढ होणार आहे.
नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील गुंतवणूक निगडित प्रोत्साहन योजनेंतर्गत देशात 22 कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. यात काही विदेशी कंपन्यांचा देखील समावेश असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.
‘‘मी कुणालाही आवडत नाही!’’ हे विधान आहे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीचे! अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे! 3 नोव्हेंबर रोजी होणार्या राष्ट्रपती निवडणुकीत ट्रम्प हे कोरोनाचे बळी ठरण्याचे स्पष्ट संकेत आहेत. जेव्हा केव्हा कोरोनाचा इतिहास लिहिला जाईल- दोन राष्ट्राध्यक्षांची नावे काळ्याकुट्ट अक्षरांनी लिहिली जातील. एक म्हणजे राष्ट्रपती ट्रम्प आणि दुसरे नाव आहे ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोल्सोनारो! कोरोनात सध्या हे दोन देश आघाडीवर आहेत. त्याच वेळी दोन देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिह
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विरोधी विचाराची मंडळी संघावर वेगवेगळे विषय घेऊन आग पाखड करण्याचा प्रयत्न सतत करत असतात. दोन वेळा पूर्णतः व एकदा अंशतः संघाचा थेट गळा घोटण्याचा प्रयत्न झाला .पण संघ या सगळ्याला पुरून उरला एव्हढेच नव्हे तर प्रत्येक वेळी नवी झळाळी घेऊन बाहेर पडला. मग संघावर वेगवेगळे आरोप करण्याचे सत्र सुरु राहिले. कधी गांधी हत्येचा आरोप,, तर कधी 42 च्या स्वातंत्र्य लढयात,संघाचा सहभाग नव्हता, कधी जातीयवादी ,भगवे आतंकवादी असे साम्यवादी पठडीतलें नवनवीन आरोप लादण्याचे सत्
माजी क्रिकेटपटू, क्यूरेटर गोपालस्वामी कस्तुरीरंगन कालवश
मुंबई ब्राझीलचा स्टार फुटबॉल नेमार याच्यावर चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते. मंगळवारी चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य सामन्यात लाइपत्सिगविरुद्ध पीएसजीच्या विजयानंतर नेमार कॅमेर्यावर शर्टची अदलाबदल करताना पकडला गेला. नेमारने मार्सेल हॅल्स्टनबर्गबरोबर आपला शर्ट बदलला. पीएसजीने प्रथमच चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यूईएफएच्या नवीन वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार, नेमारवर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते आणि दुसर्
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये झाली होती. या स्पर्धेत भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांची कमाई केली होती. स्पर्धेत ४ बाय ४०० या रीले प्रकारात भारताने रौप्यपदक पटकावले होते. संघात धावपटू हिमा दासचाही सहभाग होता. यावेळी हिमाबरोबर भारतीय संघात मोहम्मद अनास, पुवम्मा आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. स्पर्धेत बेहरिनने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. संघातील केमी अँडेकोया ही उत्तेजन सेवन चाचणीमध्ये दोषी आढळल्याने आता बेहरिनचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या रौप्य