देश - विदेश

सूर्यापेक्षा 70 पट मोठ्या कृष्णविवराचा लागला शोध!

आपल्या आकाशगंगेत सूर्याच्या आकारापेक्षा 70 पट महाप्रचंड अशा राक्षसी कृष्णविवराचा (ब्लॅक होल) शोध लागला आहे. तारे आणि ग्रहांची उत्क्रांती कशी झाली, याबद्दल आजवर जे सांगितले जाते, त्या सिद्धांतालाच यामुळे आव्हान मिळाले आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे...

तालिबानसोबत पुन्हा चर्चा करणार- डोनाल्ड ट्रम्प

अफगाणिस्तानातील तालिबानसोबत पुन्हा एकदा शांतताविषयक चर्चा करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी द्वी पक्षीय चर्चादरम्यान केली. मात्र, आपल्या सैनिकांना कधीपर्यंत मायदेशी बोलावणार याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही...

डॉक्टर तरुणीवर अत्याचार केला, नंतर जाळून मारले

हैदराबादमध्ये एका वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला. ..

दबंद-३ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार दाखल

२० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणारा सलमान खान चा बहुचर्चित चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या जात आहे, म्हणून 'हिंदू जनजागृती समिती'तर्फे सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार करण्यात आली आहे...

नोकरी गेल्यास मोदी सरकार देणार २ वर्ष आर्थिक मदत !

जर तुमची नोकरी गेली असेल तर केंद्र सरकार 24 महिने म्हणजेच 2 वर्षांपर्यंत पैसे देणार आहे. ही मदत कर्मचारी राज्य बीमा निगमच्या (ESIC) 'अटल बीमित कल्याण योजनेअंतर्गत (Atal Bimit Vyakti Kalyan Yojana) खाजगी नोकर धारकांना ही मदत केली जाणार आहे...

राहुल गांधी पाचव्या दिवशीही अधिवेशनात अनुपस्थित

हिवाळी अधिवेशनाच्या 5 दिवसाच्या कार्यकाळात एकही दिवस राहुल गांधी सभागृहात हजर राहिले नाही. सध्या लोकसभेत महत्वाचे विषय चर्चीले जात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेतील अनुपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे...

डॉ. फिरोज खान यांना रा.स्व.संघाचेही समर्थन

संस्कृत साहित्याला समर्पित व श्रद्धा भावाने शिकवणाऱ्या व वैधानिक मार्गाने निवड झालेल्या प्राध्यापकास विरोध करणे योग्य नाही. संघ या विरोधाशी सहमत नाही..

इमरान खान हे लष्कराच्या हातातले बाहुले : रेहम खान

इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर रोषाला सामोरे जावे लागणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा आता त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी रेहम खान यांनीही समाचार घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे लष्कराच्या हातचे बाहुले आहेत, अशी टीका खान रेहम खान यांनी केली आहे.  इम्रान यांनी पुलवामा हल्ल्यावर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर देशभरातून पडसाद उमटू लागले. यावेळी रेहम यांनी ही टीका केली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४५ भारतीय जवानांना वीरमरण आले. पाकिस्तानी सैन्याने सूचना केल्याप्..

पुलवामा हल्ल्यानंतर काश्मिरी तरुणांनी घेतले देशसेवेचे व्रत

लष्करातील १११ जागांसाठी २५०० तरुणांनी केला अर्ज    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये परिस्थिती बदलताना दिसत आहे. काश्मीरमधील बारामुल्ला येथे भारतीय लष्कराच्या १११ जागांसाठी भरती सुरु केली आहे. लष्कराच्या भरतीला काश्मिरी तरुण चांगला प्रतिसाद देत आहेत.  भारतीय लष्करातील १११ जागांसाठी तब्बल २५०० काश्मिरी तरुणांनी अर्ज केला आहे. लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा या काश्मिरी ..

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूकदारांचे स्वागत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2019’ या जागतिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत   मुंबई, दि. 20 : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक असे पोषक वातावरण महाराष्ट्रात आहे. या क्षेत्राच्या वाढीसाठी राज्य तयार असून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे राज्यात स्वागत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. ‘नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2019’ या जागतिक परिषदेत झालेल्या एका मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. येथील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये ..

अनिल अंबानींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

   नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रिलायन्स कम्युनिकेशन्सविरोधातील एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर निर्णय दिला. अनिल अंबानी यांनी थकवलेले ४५३ कोटी रुपये चार आठवड्यात भरावेत, अन्यथा त्यांना तीन महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा करण्यात येईल. असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.   देशातील टेलिकम्युनिकेशन नेटवर्कच्या व्यवहाराची थकित रक्कम आणि व्याज मिळून ५५० कोटी रुपयांच्या संदर्भात एरिक्सन इंडियाने रिलायन्सला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. विनीत सरन आणि न्या. ..

दहशतवादाविरुद्ध सौदी अरब भारताला करणार 'ही' मदत!

सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दहशतवादाशी लढा देण्यासाठी सौदी अरब भारताला दहशतवादासंबंधीत गोपनीय माहिती देऊन मदत करणार असल्याचे मोहम्मद बिन सलमान यांनी जाहीर केले. मंगळवारी रात्री उशिरा मोहम्मद बिन सलमान भारतात दाखल झाले. बुधवारी सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. ..

जीएसटी काऊन्सिलची बैठक : सिमेंट, घरे स्वस्त होणार ?

  नवी दिल्ली : वस्तू व करांसंदर्भात बुधवार, दि. २० फेब्रुवारी रोजी महत्वाची बैठक होणार आहे. यात बांधकाम क्षेत्रात परवडणाऱ्या घरे खरेदी करण्यासाठी दिलासादायक निर्णय हाती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नितीन पटेल आणि राज्याचे महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रीगटाने परवडणाऱ्या घरांवरील जीएसटी ८ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणावा, अशी शिफारस केली होती. संबंधित अहवाल जीएसटी काऊन्सिलकडे सोपवला आहे.  एसटी (वस्तू व सेवा कर) परिषदेत सिमेंटवरील जीएसटीत २८ टक्क्यांवरुन ..

पाकिस्तानला झटका; कुलभुषण जाधव खटला स्थगित करण्याची मागणी फेटाळली

  कुलभुषण जाधव प्रकरणाचा खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे ) मंगळवारी फेटाळून लावली. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. आयसीजेमध्ये सध्या भारताचे नागरिक कुलभुषण जाधव यांच्या सुटकेबाबतच्या खटल्यावर सुनावणी सुरु आहे. यावर आज पाकिस्तानने आपली बाजू मांडली.  काल भारताने गुप्तचर असल्याच्या आरोपावरुन पाकिस्तानने अटक केलेले कुलभूषण जाधव यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी भारताने सोमवारी आयसीजेमध्ये केली होती. जाधव यांच्यावर पाकिस्तानातील ..

दहशतवादविरोधात इस्त्रायल भारताला बिनशर्त मदत करायला तयार

   दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्त्रायलने भारताला बिनशर्त मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. महत्वाचे म्हणजे या मदतीमध्ये कुठलीही मर्यादा नसेल. भारताला लागेल तितकी मदत आणि सहकार्य करायला आम्ही तयार आहोत असे इस्त्रायलचे नवनियुक्त राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी म्हटले आहे. इस्त्रायलने मोक्याच्या क्षणी भारताला साथ देण्याचा शब्द दिला आहे.  पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे देशात युद्धज्वराचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानवर इस्त्रायलसारखी कारवाई करावी असा जनसामान्यांमध्ये मतप्रवाह आहे. जेरुसलेम ..

वाराणसी बदल रही है, मोदींनी केली वचनपूर्ती!

  वाराणसी : “सरकारने जनतेला जे वचन दिले होते, ते पूर्ण केले आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी येथे झालेल्या सभेत म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंगळवारी वाराणसीमध्ये डिझेलमधून इलेक्ट्रीकमध्ये रुपांतर केलेल्या जगातील पहिल्या ट्रेन इंजिनचे लोकार्पण करण्यात आले. ‘मेक इन इंडिया’ या योजनेअंतर्गत या ट्रेन इंजिनची निर्मिती करण्यात आली आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींनी २,९०० कोटी रुपये किंमतीच्या ..

हिंदू महाग्रंथांमधून मिळाली मानसिक शांती; जलतरणपटू मिसी फ्रॅंकलिन यांचे मत

   मोनॅको : हिंदू धर्मग्रंथ वाचल्याने मला मानसिक शांती मिळते, असे मत ऑलम्पिकमध्ये पाच सुवर्णपदके कमावणाऱ्या अमेरिकन-कॅनेडियन जलतरणपटू मिसी फ्रॅंकलिन यांनी व्यक्त केले आहे. वयाच्या तेवीसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरातून निवृत्ती घेतलेल्या मिसीला खांदेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे योगासने शिकण्यास सुरुवात केली. यावेळी हिंदू धर्माबद्दल कुतूहल निर्माण झाल्याने जॉर्जिया विश्वविद्यालयातून धर्माचा अभ्यास सुरू केला.   सोमवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी मोनॅको येथे झालेल्या लॉरेस ..

''इमरान खान, मसूद अझहरला पकडून दाखवा''

   चंदिगढ : पुलवामा हल्ल्याबाबत भारताकडे पुरावे मागणाऱ्या इमरान खान यांना पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये दहशतवादी मसूद अझहर लपला आहे. इमरान यांनी त्याला पकडण्याचे धाडस दाखवावे, तुम्हाला शक्य नसेल तर आम्ही ही कारवाई करू, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला सुनावले. आपल्या ट्विटमध्ये कॅ. अमरिंदर सिंह म्हणाले, “इम्रान तुम्ही भारताकडे पुलवामा हल्ल्याचे पुरावे मागत आहात. मात्र, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पुरावे ..

चोराच्या उलट्या बोंबा, इमरान खानची भारताला धमकी!

  इस्लामाबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे वृत्त पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी फेटाळले आहे. “भारताने युद्धाला सुरुवात केल्यास, पाकिस्तान त्याला उत्तर द्यायला विचार करणार नाही.” अशी धमकी इमरान खान यांनी भारताला दिली.   “कोणताही पुरावा नसताना भारताकडून उगाच पाकिस्तानवर आरोप केला जात आहे. सध्या भारतामध्ये निवडणूकीचा काळ आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा. अशी चर्चा भारतात सुरु आहे. हे मी समजू शकतो.” असेही इमरान खान यांनी म्हटले. ..

शिवाजी महाराजांसारखा राजा होणे नाही : पंतप्रधान मोदी

   नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी शिवरायांना विनम्र अभिवादन केले. “जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण आहे. शिवाजी महाराज हे एक बहुआयामी व्यक्ती होते. सततच्या लढाया लढून, संघर्ष करूनही शिवाजी महाराजांनी सुशासन कायम ठेवले.” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.   श्रीरामाच्या वानरसेनेचा ..

महिलांच्या सुरक्षेसाठी ११२ हा नवीन इमर्जन्सी नंबर

आजपासून मुंबईसह १६ राज्यात व केंद्रशासित प्रदेशात होणार कार्यान्वित   नवी दिल्ली : महिलांच्या व लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी केंद्र सरकारने नवीन आपत्कालीन क्रमांक सादर केला आहे. आजपासून १६ राज्यात व केंद्रशासित प्रदेशात महिलांसाठी ११२ हा नवीन आपत्कालीन क्रमांक असणार. महिला कोणत्याही अडचणीत असताना हा क्रमांक त्यांच्यासाठी आशेचा किरण बनणार आहे. अडचणीच्या वेळेस ११२ हा क्रमांक डायल केल्यास महिलांना तात्काळ मदत मिळणार आहे. याशिवाय ११२ हे मोबाईल अँपही तयार केले असून मोबाईलमध्ये हे अँप डाउनलोड ..

बंदूक हाती घेणारा प्रत्येकजण मारला जाणार

लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीफचा इशारा  नवी दिल्ली : पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीफने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. बंदूक हाती घेणारा प्रत्येकजण मारला जाणार असल्याने तुमच्या मुलांना परत बोलवा असे आवाहन यावेळी पालकांना केले. जम्मू-काश्मीरमध्ये आईची भूमिका फार महत्वाची असणार आहे. त्यामुळे तुमच्या मुलांना समर्पण करायला सांगा असेही यावेळी सांगण्यात आले.   लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी यावेळी ..

देशाला मोजक्‍याच बड्या बॅंकांची गरज : अरुण जेटली

   नवी दिल्ली : बॅंकिंग क्षेत्राचा सर्वांगिण विकास होण्यासाठी देशात मोजक्‍याच बड्या बॅंकांची गरज असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी (ता.१८) व्यक्त केले. भारतीय स्टेट बॅंकेनंतर सार्वजनिक क्षेत्रातील देना, विजया आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांचे विलीनीकरण होणार आहे. हंगामी अर्थसंकल्पाविषयी जेटली यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाशी संवाद साधला. त्यावेळी जेटली यांनी बड्या बॅंकांचे महत्व अधोरेखीत करून विलीनीकरणासंदर्भातील सरकारची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.  ..

युती झाली; लोकसभेत भाजपला २५ शिवसेना २३ जागा

   मुंबई : शिवसेना भाजप विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकत्र लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले. लोकसभेत शिवसेना २३ तर भाजप २५ जागा लढवेल तर विधानसभेसाठी ५०-५० हा फॉर्म्युला ठरल्याचेही त्यांनी जाहीर झाले.   आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप युतीच्या चर्चेसाठी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. शिवसेना भाजपतर्फे युतीच्या घोषणेसाठी मुंबईतील एका हॉटेलमध्ये संयुक्तपत्रकार परिषद घेण्यात आली. ..

न्यूयॉर्कमध्ये साजरी झाली शिवजयंती

   दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांची प्रमुख उपस्थितीन्यूयॉर्क : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यातच नव्हे तर जगभरात प्रचंड उत्साहात साजरी होत आहे. न्यूयार्कमध्येही हाच जोश पाहायला मिळाला. न्यूयार्कमधील भारताचे वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा पथक व छत्रपती फाऊंडेशनतर्फे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे, न्यूयॉर्क स्टेट सिनेटर केव्हिन थॉमस, पश्चिम विंडसर भागाचे महापौर हेमंत मराठे, उप-राजदूत शत्रुघ्न सिन्हा प्रमुख पाहुणे म्हणून ..

कुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानचा बुरखा फाडला

   द हेग : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी भारताने पाकिस्तानला चोहोबाजूंनी घेराव घातला. भारतातर्फे अॅड. हरिश साळवे आणि अॅड. दीपक मित्तल यांनी पाकिस्तानचा पर्दाफार्श केला.    हरिश साळवे यांनी केलेल्या आरोपांनुसार, “पाकिस्तानने वारंवार वियना संधी उल्लंघन केले आहे. १३ वेळा विनंती केल्यानंतरही परवानगी नाकारली होती. कुलभूषण जाधव हे निर्दोष असतानाही पाकिस्तान आपल्या दुष्प्रचार सुरूच ठेवला आहे.”  हरि साळवे यांनी ..

पाकिस्ताननेही उच्चायुक्ताला परत बोलवले

पाकिस्ताननेही उच्चायुक्ताला परत बोलवले ..

बलुचिस्तान; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला

  इस्लामाबाद: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी ताज्या असतानाच पाकिस्तानच्या सैन्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात 9 जण ठार झाले असून 11 जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हा हल्ला झाला. द बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, बलुच राजी अजोई संगर या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असलेल्या भागात हा हल्ला झाला. तुरबत आणि पंजगुर यांच्या दरम्यान पाकिस्तानी सैन्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला. सौदी ..

पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला; भारतीय हॅकर्सकडून २००हुन अधिक साईट हॅक

  नवी दिल्ली- भारतीय हॅकर्सच्या एका गटाने पाकिस्तानच्या जवळपास 200हून अधिक वेबसाइट्स हॅक केले आहेत. टीम आय-क्रूद्वारा हॅक करण्यात आलेल्या या वेबसाइट्स ओपन केल्यास पुलवामा हल्ल्यातील भारतीय शहिदांना श्रद्धांजली वाहिल्याचे निदर्शनास येत आहे आणि पेटती मेणबत्तीही नजरेस पडत आहे. तसेच भारतीय हवाई दलाची लढाऊ विमान तिरंग्याच्या रंगांमध्ये उडताना दिसत आहेत.  पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना आमची श्रद्धांजली, असे या पेजवर लिहले आहे. तसेच पेजवर 14/02/2019चा हल्ला ..

पुलवामामध्ये दहशतवाद्यांशी चकमक, सुरक्षा दलाचे चार जवान शहीद

   पिंगलान : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याची घटना ताजी असताना सोमवारी पहाटे पुलवामा येथील पिंगलान येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले आहेत. या चार जवानांमध्ये एका मेजरचाही समावेश आहे.   पुलवामामधील पिंगलान येथे काही दहशतवादी लपून बसले होते. अशी महिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सोमवारी पहाटे सुरक्षा दलाने या भागात दहशतवाद्यांचा शोध घेतला. यादरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर ..

लष्कराची मोठी कारवाई, जैशच्या कमांडरला कंठस्नान

दहशतवादी लपलेले घर लष्कराकडून उध्वस्त.. लष्कराची मोठी कारवाई   पिंगलान : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी पहाटेपासून चकमक सुरु होती. जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. जैश-ए- मोहम्मदचा कमांडर कामरान आणि सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड गाझी राशीद या दोघांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले. अशी माहिती मिळाली आहे.   सुरक्षा दलाकडून अजून यावृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात ..

किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता २४ फेब्रुवारीला

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ७५,००० कोटी रुपयांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे २४ फेब्रुवारी रोजी एक कोटी लाभार्थ्यांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता देऊन केला आहे, अशी माहिती कृषिमंत..

नायब राज्यपाल-दिल्ली सरकारात अधिकारांचे वाटप :

सेवा नियंत्रणावरून सर्वोच्च न्यायालयाचा विभाजित निकाल   नवी दिल्ली, १४ अधिकार्‍यांच्या बदल्यांसह इतर सेवा नियंत्रणांवरून तसेच अधिकारांच्या विभाजनावरून दिल्ली राज्य सरकार आणि केंद्रातील वादाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी विभाजित निकाल दिला. यावेळी हे प्रकरण मोठ्या न्यायासनाकडे पाठवण्यात यावे, असेही म्हटले आहे.  मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), चौकशीसाठी आयोग स्थापन करणे, विद्युत मंडळावरील नियंत्रण, जमीन महसुलांची प्रकरणे आणि सरकारी वकिलांच्या ..

आले युवराजांच्या मना...

सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी महिलांच्या हिताच्या अनेकविध योजना सौदी अरबमध्ये राबविल्या. त्याची सुरुवात महिलांना वाहन परवाना देण्यापासून झाली. त्यानंतर सरकारी प्रशासनातील त्यांचा सहभाग वाढावा, त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळावा, यांसारख्या अनेक सवलती, सूट महिलांना देण्यात आली. यापुढे सौदी अरबमधील महिलांना तलाकसंबंधीचे सर्व अपडेट्स त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मिळणार आहेत.   भारतात सध्या तिहेरी तलाक बंदी विधेयकावरून रणकंदन सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निकालानंतर ..

काळोखातील सोनेरी किरणे

२०१८ हे वर्ष सरताना अनेक पर्यावरणवाद्यांनी आजच्या मानवाबद्दल निराशा व्यक्त केली आहे. समुद्रातील पाणी पातळीत वाढ, तापमानवाढ, हिमनद्यांचे वितळणे आणि वन्य प्रजातींची संख्या सातत्याने घटत जाणे, हे सर्व चिंता वाढविणारे आहे. आजकाल, या प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रातही नियमितपणे येतात. अशा परिस्थितीत आशेचा एक किरण अगदी अनपेक्षित अशा स्त्रोताकडून आला आहे - पारंपरिक व्हॅटिकनमधून.  पोप फ्रान्सिस यांच्या, ‘आपण कडेलोट होण्यापासून अजूनही वाचू शकतो,’ या शब्दांमुळे उमेदीचा उषःकाल अजूनही होऊ शकतो, ..