जळगाव

पाचोरा पं.स.सदस्य ललीत वाघ यांच्यावर गुन्हा दाखल

पाचोरा : तालुक्यातील नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालय येथे १ ऑगस्ट रोजी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास फिर्यादी डॉ.ज्ञानेश्वर रमेश सय्यासे कर्त्यव्यावर हजर असतांना पंचायत समिती सदस्य ललित राजेंद्र वाघ (रा.बांबरुड राणीचे) याने दारूच्या नशेत अरेरावी केली.तसेच शिवीगाळ दमदाटी करून चप्पलने मारहाण केली...

आयोध्येला जाणार्‍या कारसेवकांचा पहूरवासीयांकडून सत्कार

पहूर ता.जामनेर : आयोध्या येथे १९९० व १९९२ मध्ये प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थानी कारसेवेसाठी जाऊन आलेल्या कारसेवकांचा आयोध्येत होत असलेल्या श्रीरामलल्लांच्या अभूतपूर्व मंदीर भुमिपूजन सोहळ्याचे औचित्य साधून पहूरवासीयांतर्फे सत्कार करण्यात आला...

चिंचखेडा तपोवन येथील शेतकर्‍याची आत्महत्या

जामनेर : तालुक्यातील चिंचखेडा तपोवन येथील ३२ वर्षीय शेतकर्‍याने कर्जबाजारीपणामुळे विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केली. विनोद जयराम पाटील असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकर्‍याचे नाव आहे...

आठवड्यातून चार दिवस सुरु राहणार सर्व व्यापारी संकुले

जळगाव : राज्य शासनाने ठरवून दिलेले राज्य शासनाच्या नियमाबाहेर जाऊन प्रशासन परवानगी देऊ शकत नाही. गेल्या ४ महिन्यापासून दुकाने बंद असल्याने व्यापार्‍यांच्या हितासाठी दि.५ ऑगस्टपासून शहरातील सर्व प्रमुख व्यापारी संकुल मंगळवार, गुरुवार, शनिवारी बंद ठेवून इतर ४ दिवस उघडी ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि व्यापार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, जर या नियमानुसार व्यापारी संकुलात अधिक गर्दी होत असल्यास पुन्हा सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यात येतील असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केला...

शिवसेना जिल्हाप्रमुखांचा सणासुदीला चाळीसगावात प्रसिद्धीसाठी रिकामचोटपणा

चाळीसगाव : शेतकर्‍यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उचलणारे चाळीसगाव तालुक्याचे भाजपा आ. मंगेश चव्हाण यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून महाविकासआघाडीच्या पायाखालची वाळू सरकली असून आ. मंगेश चव्हाण यांनी जनतेच्या समस्या सरकार व मुख्यमंत्री यांच्याकडून सोडविल्या जात नाहीत म्हणून उद्विग्नपणे बोललेल्या रिकामचोट या साध्या सरळ शब्दाचा बाऊ करून शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी चाळीसगाव येथे आंदोलन करण्याचा पोरकटपणा केला. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे शिवसेनेत अडगळीत पडलेले ..

अमळनेरात वरद विनायक हॉस्पिटल कोविड सेंटरचे उद्घाटन

कळमसरे, ता.अमळनेर : अमळनेर शहरातील तज्ञ फिजिशियन डॉ अविनाश जोशी,डॉ निखिल बहुगुणे,डॉ किरण बडगुजर, डॉ. प्रशांत शिंदे आणि डॉ.संदीप जोशी आदींनी एकत्रित येत धुळे रोड येथे असलेल्या सरजू गोकलाणी यांच्या भव्य कलागुरु मंगल कार्यालयात शासनाच्या परवानगी ने भव्य वरद विनायक हॉस्पिटल नावाचे कोविड सेंटर निर्माण केले असून एकाच सुमारे ७५ रुग्णांची सोय असणार्‍या या हॉस्पिटलचे १ ऑगस्ट रोजी माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, जि.प.सदस्या जयश्री पाटील आदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी आ. डॉ. बी.एस. पाटील, ..

आ. मंगेश चव्हाण यांचा शिवसेनेतर्फे निषेध

जळगाव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत अवमानकारक शब्द वापरल्याप्रकरणी भाजपचे आ. मंगेश चव्हाण यांचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला आहे. जळगाव येथे त्यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले, तर चाळीसगाव येथे महाविकास आघाडीतर्फे त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले...

एका दिवसात ३६२ जण कोरोनामुक्त

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. जिल्ह्यात रविवारी तब्बल ३६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ३६५ बाधित रुग्ण आढळून आले आहे. नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये ९२ जण जळगाव शहरातील आहेत. तर १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे...

जिल्ह्यात शनिवारी २८५ नवीन कोरोना पॉझिटीव्ह तर २८४ झालेत बरे

जळगाव : जिल्ह्यात शनिवारी २८५ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. तर दिवसभरात २८४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे...

पारोळ्यात भाजपाचे आंदोलन

तभा वृत्तसेवा पारोळा : भाजपा महायुतीतर्फे पारोळ्यात शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी शनिवारी आंदोलन करण्यात आले. माजी खा. ए.टी.पाटील यांनी शेतकर्‍यांच्या तक्रारी व मागणीवरून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पारोळा तालुक्यातील बंद पडलेले मका खरेदी व खरेदी करण्यात आलेल्या मका प्रकरणी तक्रार करून झालेल्या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे...

जामनेरात दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी भाजपा महायुतीतर्फे मोर्चा

जामनेर :राज्यात मोठ्या तावातावात सात महीन्यापुर्वी स्थानापन्न झालेल्या महाविकास आघाडी सरकार राज्यातील तमाम जनतेसह शेतकरी वर्गाला उद्धव ठाकरे सरकार अपेक्षीत न्याय देऊ शकलेले नाही असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी येथे केला...

शहरातील माॅल्स व शाॅपिंग काॅम्प्लेक्समधील दुकाने 5 ऑगस्टपासून सुरू होणार

जळगाव : जिल्ह्यातील दुकानदारांची दुकाने सुरु करण्याची सातत्याने होत असलेली मागणी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आली होती. यास शासनाने विशेष परवानगी दिली असून येत्या 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत शहरातील माॅल्स व शाॅपिंग काॅम्प्लेक्समधील दुकाने सुरु करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली...

वृक्षांना राखी बांधून होणार रक्षाबंधन साजरे

जळगाव ः कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रक्षाबंधनासाठी प्रत्येक महिलेला आपल्या माहेरी जाणे शक्य नाही. त्यामुळे भारतीय सिंधू सभेतर्फे वृक्षारोपण करुन आणि त्याला भाऊ मानून राखी बांधून सण साजरा करावा. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने प्रत्येकाला घरात राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे घरात राहून आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय अध्यक्षा माया कोठनानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत आहे...

एकजुट व एकदिलाने संसर्गाची साखळी तोडून कोरोनावर मात करुया : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव : जळगाव जिल्हावासियांनी स्वयंशिस्तीचे पालन करत एकजुटीने, एकदिलाने कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडून त्यावर मात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी ‘शासनाचे दूत’ म्हणून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जळगावकरांना केले...

लोहटार येथे एकाने घेतला लिंबाच्या झाडाला गळफास

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील रहिवासी दिलीप मंगा सोनवणे (५५) हा शेतात बकर्‍या चारावयास गेला असता दुपारी तीन वाजेपुर्वी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन मयत झाला...

बहीण नांदवत नसल्याच्या रागामुळे शालकाने केला मेव्हण्याचा खुन

जामनेर : आपल्या बहीणीला नांदवत नसल्याचा प्रचंड राग मनात धरून शालकानेच नामी शक्कल लढवून मेव्हण्याचा खुन करून कायमचा संपविला. घटनेतील संशयीत आरोपीताने स्वतःहून पोलीस ठाण्यात बुधवार रात्री साडेसातच्या दरम्यान हजेरी लाऊन मी माझ्या मेव्हण्याचा खुन केल्याची कबुली दिली..

संसर्ग थांबेना ः जिल्ह्यात २६७ रूग्णांची वाढ

जळगाव : जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार गुरुवारी जिल्ह्यातील २६७ जणांना कोरोनाची बाधा झाला. तर दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात तब्बल २७१ रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आढळून आलेल्या अहवालात जळगाव शहरासह जामनेर व चाळीसगावात संसर्ग पुन्हा वाढत आहे...

वाढदिवसानिमित्त गरजूंना मदतीचा हात

जळगाव : शहरातील बारा वर्षीय चिमुकलीने आपल्या वाढदिवसावर खर्च न करता विविध सामाजिक उपक्रमावर केला. ओजस्वी माळी हिने आपल्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गरजूंना किराणा कीट व जीवनावश्यक साहित्यांचे वाटप केले. तिच्या वाढदिवसाचा होणारा खर्च टाळून त्या रक्कमेतून तिने गरजूंना थेट मदत करुन समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. ओजस्वी हि जळगाव येथील पोलीस बिनतारी संदेश विभागातील अमित माळी, माधवबाग हॉस्पिटल जळगावच्या संचालिका डॉ.श्रद्धा माळी यांची कन्या आहे...

हतनुर धरणाचे चोवीस दरवाजे पूर्ण उघडले

जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत चांगल्या प्रकारे वाढ होत असून अनेक मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये 17.74 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे चोवीस गेट पूर्ण उघडण्यात आले असून धरणातून आज 52 हजार 995 व्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी ..

रावेर : आयशरमधून गुरांची अमानुष वाहतूक

रावेर : महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर पोलीस तपासणीत महिंद्राची पीकअप व्हॅन आणि आयशर गाडीतून गुरांची अमानुष कोंबुन अवैध वाहतूक करणार्‍यांवर रावेर पोलिसांनी धडक कारवाई करून त्यांच्याविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे...

कोरोना काळातही पाळला ‘शेजारधर्म’

जळगाव : ‘शेजारधर्म’ विषयी समाजात आपण अनेक चांगले - वाईट अनुभव ऐकत असतो. बहुतेकांचा अनुभव वाईट असला तरी सध्या कोरोनाच्या काळात मात्र अशा शेजारधर्म आणि माणुसकी पाळण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कोरोनाबधित कुटुंबातील निगेटिव्ह आलेल्या दोन बालकांचा सांभाळ करीत शेजार्‍यांनी खर्‍या अर्थाने शेजारधर्म निभावल्याचा प्रत्यय यावल तालुक्यातील साकळी येथे आला...

कृती फाऊंडेशनतर्फे ऑनलाईन कोरोना योद्धाचे समुदेशन

जळगाव : कृती फाऊंडेशनच्यावतीने कोरोनाशी लढा देत असलेल्या योद्ध्यासाठी व्हिडिओ कॉन्फ्रसींगच्या माध्यमातून संवाद साधून कोरोना समज, गैरसमज व घ्यावयाची काळजी याबाबत फाऊडेशनच्या कार्याध्यक्षा डॉ.श्रद्धा माळी, डॉ. श्रेयस महाजन यांनी योग्य मार्गदर्शन व समुपदेशन करून सर्वांच्या प्रश्नांचे शंकांचे निरसन केले. आजच्या या मार्गदर्शनातून मानसिक बळ मिळाल्याचे सांगत यावेळी अनेकांनी समाधान व्यक्त केले व आभार मानले. कृती फाऊंडेशनचे सचिव जी.टी. महाजन, पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी या उपक्रमाचे आयोजन ..

लाभार्थ्यांना मिळालेल्या भाकड बकर्‍यांवरून जि.प.ची सभा गाजली

जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लाभार्थ्यांना पशुसंवदन विभागाकडून उस्मानाबादी शेळ्याऐवजी अमळनेरच्या भाकड बकर्‍या देण्यात आल्याने सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी पशुसंवर्धन विभागातील अधिकार्‍यांना याप्रकरणी धारेवर धरले. मात्र पशुसंवर्धन विभागातील अधिकारी त्यांच्या या प्रश्‍नावर समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. जि.प.सदस्य मधुकर काटे यांनी याबाबत चौकशी करण्यात येऊन यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जिल्ह्यातील रासायनिक खताच्या उपलब्धतेबाबत सदस्य सभेत आक्रमक ..

जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांवर

जळगाव : जिल्ह्यात सोमवारी ३१२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० हजाराच्या पार झाला आहे. दिवसभरात २१४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे...

खडकी येथील विवाहीतेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

जामनेर : तालुक्यातील खडकी येथील अंजना नाईक वय २३ या विवाहीतेचा २५ रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता.त्यानतंर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. परंतु सासरच्या मंडळीनीच आमच्या मुलीची हत्या केली म्हणून अगोदर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी. मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करावे अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी लावून धरली होती.त्यानुसार मृतदेहाचे धुळे येथे शवविच्छेदन करण्यात आले असून पाच आरोपीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला...

शिरपूरला कत्तलीसाठी जाणारी ५१ गुरे पकडली

शिरपूर : येथे शिरपूर तालुक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान कत्तलीसाठी जाणारी ५१ गुरे पाय बांधून वाहतूक करतांना पकडण्यात आली. त्यामुळे शिरपूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे. गोवंश तस्करीप्रकणी पोलिसांनी २७ रोजी रात्री तीन ते पाच वाजे दरम्यान कारवाई केली आहे...

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनासाठी प्रकाशा येथील जल अन् माती रवाना

मामाचे मोहिदे, … प्रभू श्रीरामचंद्र भगवान यांचे आयोध्या येथे भव्य मंदिराचे भूमिपूजन सोहळा ५ ऑगस्ट रोजी होत आहे. या भूमिपूजनासाठी प्रकाशा दक्षिण काशी येथील त्रिवेणी संगमातून जल, माती व रेती यांचे पूजन करून २७ जुलै रोजी अयोध्या येथे पाठविण्यात आले...

धरणगावात १०० खाटांचे अद्ययावत उपजिल्हा रूग्णालय उभारणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव : धरणगाव येथे लवकरच अद्ययावत उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार असून येथे १०० ऑक्सीजनयुक्त खाटांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल.अशी महत्वपूर्ण घोषणा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धरणगाव येथे आयोजित अत्याधुनीक कार्डियाक रूग्णवाहिकेचे लोकार्पण करतांना ते बोलत होते...

भाजपा ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी आ.सुरेश भोळे

जळगाव : भारतीय जनता पार्टीच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शहराचे आ.सुरेश दामू भोळे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आ.भोळेंची ही नियुक्ती केली असून या नव्या जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदनही केले आहे...

भाविकांनी लांबूनच घेतले शिवदर्शन, मंदिर परिसरात शुकशुकाट

जळगाव : श्रावण महिन्याचा पहिल्या सोमवारी शहरातील सर्व मंदिर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी बंद होती. त्यामुळे भाविकांनी मंदिराबाहेरुच महादेवाचे दर्शन घेतले...

सावखेडा सिम येथील तरुणाचा वरी धरणात बुडून मृत्यू

दहिगाव ता. यावल : येथून जवळच असलेल्या सावखेडा येथील खाटीक कुटुंबातील २३ वर्षीय तरुणाचा वरी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली...

बोदवडला महिन्याभरापासून पावसाची दांडी

बोदवड : जळगाव जिल्ह्यातील सर्वत्रच पाऊस सुरू असून मात्र बोदवड परिसर पावसापासून वंचित आहे. मागील महिन्यात ढगफुटी झाली. त्यातील सुरवाडे, मानमोडी या गावातील बर्‍याच शेतकरी यांचे पिक जमिन दोस्त झाले. नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे सुद्धा झाले पण शासनाची मदत मिळेलच याचा भरवसा नाही. तालुक्यात तीनदा पेरणी झाली आहे. दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस आतापर्यंत झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे...

वयोवृद्धाच्या आरोग्य सेवेसाठी सरसावल्या महापौर

जळगाव : गेल्या चार महिन्यांपासून कोविड योद्धा म्हणून दिवसरात्र मेहनत घेणार्‍या महापौरांच्या तत्परतेने रविवारी पुन्हा एकदा वयोवृद्धाला वेळीच उपचार मिळाले. गेल्या चार दिवसांपासून घरात एकटेच असलेल्या आजोबांची समजूत घालत महापौर भारती सोनवणे यांनी त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे. महापौरांनी वृध्दाच्या विदेशात राहत असलेल्या मुलाशीदेखील व्हिडीओ कॉलने संपर्क करून याबाबत माहिती दिली आहे...

कंटेनरने उडविली ५० हूनअधिक वाहने

जळगाव : तालुक्यातील नेरीपासून ते जळगाव येथील रेल्वे स्टेशनदरम्यान भरधाव कंटेनरने सुमारे ५० हूनअधिक वाहने उडवल्याचा थरारक प्रकार रविवारी दुपारी घडला. मद्यधुंद चालकासह कंटेनरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ..

तीन सदस्यीय केंद्रीय समिती प्रशासनाच्या कामाबद्दल समाधानी

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन सदस्यीय केंद्रीय समितीद्वारे रविवारी पाहणी करण्यात आली. जिल्हा प्रशासनास समितीकडून महत्त्वाच्या सूचना दिल्या असून प्रशासनाच्या आणि कोविड रुग्णालयाच्या कामकाजबद्दल समाधान व्यक्त केल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रपरिषदेत दिली...

चिंचपुरे येथे बंधारा फुटला

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे ता.पाचोरा येथे बहुळा नदीच्या उगमस्थानी झालेल्या पावसामुळे रात्री ८:३० ते ९ वाजता अचानक आलेल्या पुरात नदी शेजारी असलेल्या घर मालक शिवाजी माधवराव पाटील यांचे घरात भाडेकरू म्हणून राहत असलेल्या राजेंद्र पाटील यांचे मातीचे घर वाहून गेले. चिंचपुरे गावालगत असलेला के.टी.वेअर बंधारा फुटल्याने यात घरातील सर्वच संसार उपयोगी वस्तू या पुराच्या पाण्यातून वाहून गेल्या आहेत...

खडकीच्या विवाहीतेचा संशयास्पद मृत्यू

जामनेर : तालुक्यातील खडकी येथील विवाहीतेच्या संशयास्पद मृत्युमुळे डोहरी (ता.जामनेर) येथील माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर ठपका ठेवत मृत्यू पावलेल्या विवाहीतेच्या इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी करून उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारामधे दांगडो केला...

पाचोर्‍यात कडकडीत बंद

पाचोरा : पाचोरा, भडगाव तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पहाता ही साखळी पुन्हा एकदा तोडण्यासाठी २५ ते ३१ जुलै पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लॉकडाउन झाले आहे. आज शनिवारी पहिल्याच दिवशी पाचोरा शहरासह सर्वत्र इमर्जन्सी सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे चित्र दिसून आले...

युरीयासाठी जिल्ह्यात शेतकर्‍यांची दमछाक

जळगाव : जिल्ह्यात रासायनिक खताचा तुटवडा कमी होण्यास तयार नाही. मोजक्या काही कृषी केंद्रांनाच युरीया मुख्य डिलरकडून पुरवठा करण्यात आला. मात्र या कृषी केंद्रांवर शेतकर्‍यांच्या रांगा लागल्या आहेत. आजही जिल्ह्यात युरीया खताची ऐन हंगामात टंचाई झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे..

सोमवारपासून ‘नो व्हेईकल झोन’ रद्द

जळगाव : जळगाव मनपा हद्दीतील तसेच अमळनेर व भुसावळ नगरपालिका क्षेत्रातील ‘नो व्हेईकल झोन’चा आदेश सोमवार, २७ जुलैपासून जिल्हाधिकार्‍यांनी आज रद्द केला आहे. या निर्णयामुळे वाहतूकधारकांना दिलासा मिळणार आहे...

कैद्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना

जळगाव : येथील जिल्हा कारागृहातून शनिवारी सकाळी ७.३० वाजता तीन कैद्यांनी बंदुकीचा धाव दाखवून मुख्य प्रवेशद्वारातून पलायन केल्याची घटना घडली. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कारागृह भेट दिली असून फरार आरोपींना काही तासातच ताब्यात घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे...

नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तरुणीची सात लाखाने फसवणूक

जळगाव : रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगत शहरातील सम्राट कॉलनीतील तरुणीची सात लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आकाश मनोहर पाटील (रा. वडगाव, ता. रावेर) यास अटक केली आहे...

कोरोना कहर : जिल्ह्यात आढळले ३३४ कोरोनाबाधित

जळगाव : जिल्ह्यात आणि शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची वाढ होत असून शुक्रवारी ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्यात सर्वाधिक १०० कोरोबाधित रुग्ण हे जळगाव शहरातील असून दिवसभरात १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिलासादाखक बाब म्हणजे शुक्रवारीसुद्धा २०० जण कोरोनामुक्त झाले आहेत...

बकरी ईदची नमाज घरीच अदा करावी : पोलीस अधीक्षकांचे आवाहन

जळगाव : कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद निमित्तची नमाज ही मस्जिद, ईदगाह तसेच सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, आपल्या घरीच अदा करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी केले...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर चाळीसगावच्या ‘त्या’ नगरसेवकाची ‘नाकघासणी’

जळगाव, २४ जुलै चाळीसगावला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी शिवप्रेमींच्या मागणीवरून शुक्रवारी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हात जोडून नाकघासणी करून माफी मागितली...

पाण्याच्या तक्रारीमुळे उमाळे जलशुद्धीकरण केंद्राची पाणी पुरवठा सभापतींकडून पाहणी

जळगाव : शहरात अनेक ठिकाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार शिवसेनाकडून करण्यात आली होती. गुरुवारी मनपा पाणीपुरवठा सभापती अमित काळे यांनी शहरातील पाण्याच्या टाक्यांची तर शुक्रवारी स्थायी समिती सभापतींसह उमाळे जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली...

चोरीच्या घटना थांबविण्यासाठी साईनगरवासीयांचे गस्ती पथक

पहूर ता .जामनेर : पहूर येथील साईनगरात स्थानीक रहीवाश्यांच्या गस्ती पथकामुळे चोर्‍यांच्या घटनांना लगाम लागला असून पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून स्थानिक रहीवाशी आपल्या भागाचे आळी - पाळीने रक्षण करण्यासाठी सज्ज झाले आहेत . पहूर येथील साईनगरमध्ये बहूतांश व्यापारी व सधन लोकांची वस्ती आहे. त्यामुळे अधूनमधून भूरट्या चोर्‍यांचा त्रास या वस्तीत सुरूच होता . तथापी एकाही चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही. पोलीस व नेपाली गोरखा अबिर बहादूर खत्री यांची रात्रीची गस्त असूनही त्यांच्या येण्याची वेळ टाळून भुरटे ..

अमळनेर कोविंड सेंटरमधून बेपत्ता बापू वाणी यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करा

अमळनेर : येथील कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या बापू निंबा वाणी या रुग्णाच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लाडशाखीय वाणी समाजातर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. ..

अनुदानित आश्रमशाळा कर्मचार्‍यांना सक्तीच्या उपस्थितीमुळे कोरोना संक्रमणाचा वाढतोय धोका

फैजपूर, ता.यावल : आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी व शिक्षक प्रकल्प यावल, जि.जळगाव राज्यात सध्या कोरोना संसर्गाचा भडका उडालेला असतानाच जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचा उच्चांक गाठलेला असल्यामुळे अद्यापही शाळा, महाविद्यालय व सामूहिक गर्दीची वर्दळ असलेल्या जागी बंदी घातली आहे मात्र यावलच्या आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा प्रकल्पातील कर्मचारी व शिक्षक यांना केलेल्या सक्तीच्या उपस्थितीमुळे कोरोना संक्रमित होण्याचा धोका असल्याची भीती येथील शिक्षक व कर्मचारी वर्गात व्यक्त होत आहे. ..

मोयखेडा दिगर येथील १२ वर्षीय मुलाचा डोहात बुडून मृत्यू

जामनेर : तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील १२ वर्षीय आनंद श्याम चौधरी हा गावातील गुळ नदीत खेखडे शोधण्यासाठी गेला असता नदीत रेतीच्या उपस्यामुळे पडलेल्या खड्यात साचलेल्या डोहात पाय घसरून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला...

धरणगाव तालुक्यात नवे १९ कोरोनाबाधित

धरणगाव : धरणगाव कोवीड केअर सेंटरला बुधवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार तालुक्यात पुन्हा १९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात रेल ५, पिंप्री आणि वराड बुद्रुक प्रत्येकी ३ तर साळवा २, सर्वे खुर्द , निशाणे बुद्रुक, मुसळी, आनोरा, बांभोरी प्र.चा.आणि पाळधी खुर्द प्रत्येकी एकाच समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. तालुक्यातील एकुण रूग्ण संख्या आता ३८३ झाली आहे. तर साधारण ९९ रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत साधारण २६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ..

नोकरीचे आमिष दाखवून ७ लाखांची फसवणूक; पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

जळगाव : वडील भुसावळ येथे टी.सी. आहेत, मुलीस रेल्वेमध्ये नोकरीला लावून देतो, असे सांगून तरूणाने वेळोवेळी असे एकूण सात लाख रूपये घेतल्यानंतरही नोकरी लावून न दिल्याने फसवणूक झाल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी पितापुत्रावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे...

शेतकर्‍यांना युरिया उपलब्ध करून देण्यासाठी आ. मंगेश चव्हाण यांची भर पावसात कृषी केंद्रावर धाव

चाळीसगाव : खरीप हंगाम अर्धा संपत आला तरी तालुक्यातील शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात खते विशेषतः युरिया उपलब्ध न झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला असताना तालुक्यातील निवडक कृषी केंद्रांवर बुधवारी युरिया उपलब्ध झाल्याचे कळताच शेतकर्‍यांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. काही कृषी केंद्रांवर युरिया पोहोचला नसल्याने बंद होती. घाट रोडवरील सुयोग कृषी केंद्रावरदेखील मोठी गर्दी होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत रस्त्यावर रांगा लागल्या होत्या. त्यातच अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकरी भर पावसात उभे असल्याची ..

बोदवड न.पं.च्या मुख्याधिकार्‍यांना जीवे मारण्याची धमकी

बोदवड : येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना बुधवार २२ रोजी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...

नोएडाच्या कंपनीने केळी व्यापार्‍याची केली ११ लाखात फसवणूक; दोन संचालकांविरुद्ध गुन्हा

जामनेर : तालुक्यातील नेरीदिगर येथील केळी व्यापारी शेख रशीद शेख बशीर यांच्याकडुन घेतलेल्या मालाचे १० लाख ९२ हजार ४११ रूपये अद्याप दिले नसल्याने नोएडा येथील कंपनीच्या दोन संचालक/मालकांविरोधात जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. कमलेश यादव साईफ्रुट कंपनी होशीयारपुर नोएडा,सुंदर यादव एनएफसी फृट कंपनी हबीबपुर नोएडा असे आरोपींची नावे आहेत...

कोरोना कहर : जिल्ह्यात आढळले ४१८ कोरोनाबाधित

जळगाव : जिल्ह्यात आणि शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची वाढ होत असून बुधवारी ४१८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. सर्वाधिक १२१ कोरोबाधित रुग्ण हे जळगाव शहरातील असून दिवसभरात १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिलासादाखक बाब म्हणजे बुधवारीसुद्धा २१९ जण कोरोनामुक्त झाले आहेत...

धुंदी...सत्तेची आणि बेजबाबदारपणाचीही!

जळगाव : ‘आधीच मर्कट, त्यातही मद्य प्याला; मग तयाला झाली भूतबाधा..’ अशा अर्थाचा संत एकनाथ महाराज यांचा एक प्रसिध्द अभंग आहे. त्याचाच प्रत्यय बुधवारी जळगावला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रात मोठ्या हिकमतीने सत्तास्थानी बसलेल्या कॉंग्रेस - राष्ट्रवादी महाआघाडीतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस ज्या पद्धतीने साजरा करण्यात आला, त्यावरून आणि सोशल मिडीयावर हे छायाचित्र आणि घटनेबद्दल ज्या उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यावरुन आला...

संतोष पाटील यांचा एका तासात सर्वांत जास्त प्लेज घेण्याचा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड

पाचोरा : तालुक्यातील गोराडखेडा येथील शिक्षक तथा व्याख्याते संतोष पाटील गोराडखेडेकर यांनी सर्वात जास्त प्लेज एका तासात घेण्याचा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड नोंदविला. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्लेज घेतल्या. याच बरोबर त्यांनी कोरोना योध्याचे ई-सर्टिफिकेट एका तासात सर्वांत जास्त मिळविले. यात त्यांनी कोरोना प्लेज राष्ट्रीय एकता प्लेज अशा विभिन्न प्रकारच्या प्लेज घेतल्या. त्यांनी चोवीस प्लेज सर्टिफिकेट व वीस कोरोना योद्धा सर्टिफिकेट मिळविले. हा रेकॉर्ड त्यांनी एका तासात आपल्या नावे केला. लॉकडाउन काळाच्या ..

फैजपूर प्रांतची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल

फैजपूर, ता.यावल : फैजपूर उपविभागात असलेल्या रावेर व यावल तालुक्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. या दोन्ही तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्के झाले आहे. त्यामुळे आता केवळ २५ टक्के रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिली. भविष्यातही नागरिकांनी काळजी घेत नियमांचे पालन केल्यास फैजपूर उपविभाग लवकरच कोरोनामुक्त होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला...

पहूर येथे कोरोना योध्यांना कोविड प्रतिबंधात्मक किट वाटप

पहूर, ता.जामनेर : पहूर पेठ व पहूर कसबे या दोन्ही गावातील अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व पत्रकार या सर्व कोविड योध्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते प्रफुल लोढा यांच्याद्वारे कोविड नियंत्रण किटचे वाटप करण्यात आले...

जारगाव चौफुलीवर ट्रॅफिकजाममुळे लांब रांगा

पाचोरा : तालुक्यासह सोयगाव तालुक्यातील बनोटी वरच्या भागात काल रात्री जोरदार पाऊस झाल्याने हिवरा नदीला मोठया प्रमाणावर पूर आल्याने पाचोरा शहरातील कृष्णापुरी फरशीवर पाणी आल्याने या मार्गावर वाहतुक ठप्प झाली व जारगाव चौफुलीवर शहरातील व शहराबाहेरील तसेच मुंबई-नागपूर हायवे मार्गावरील चारही बाजूंनी ट्रॅफिक वाढल्याने ट्रॅफिकजामच्या मोठया प्रमाणावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात अशोका बिल्डकॉमद्वारा रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहनधारकांना तासन्तास ट्रॅफिकजामचा सामना करावा लागला...

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांचा चोपडा येथे दौरा

चोपडा : तालुक्यात कोरोनाचा प्रसार हा वाढतच आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. चोपड्यातील बाधितांची संख्या ५६७ झाली असूनही भरपूर अहवाल प्रतीक्षेत आहेत.त्याच पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी चोपडा येथे दौरा केला. त्यांना शहरात दुपारी दोननंतर कसे कडकडीत बंद असते याचा तसेच शिस्त पाळली जात असल्याचा देखावा करण्यात आला...

शिवाजीनगरात नगरसेवक राजू मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोप

शिवाजीनगरात नगरसेवक राजू मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोप..

चाळीसगाव पालिकेचा वनवास अखेर संपला

चाळीसगाव : नगरोत्थान योजनेत ९० कोटी,१५० कोटींच्या महत्वाकांक्षी भुयारी गटार योजनेतील पहिल्या टप्प्यातील ७० कोटी, २२ कोटींचा घनकचरा प्रकल्प याच बरोबर कोट्यावधी रुपयांची शहर सुशोभीकरण, एलइडी विद्युत दिवे योजना अशा अनेक योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मोठा निधी आणून शहराच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू असतांना गेल्या बारा महिन्यापासून चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने शहरवासीयांची कामे खोळंबली होती. विकास कामांची गती मंदावली ..

एरंडोल, पारोळा न.पा. क्षेत्रात विकासकामांसाठी ८ कोटी मंजूर

पारोळा : एरंडोल व पारोळा नगरपालिका क्षेत्रात मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या दोन्ही नगरपालिका साठी विशेष प्रयत्न करून.विकासाची गंगोत्री आणून नगरपालिका क्षेत्रातील दुर्लक्षित कामांना प्राधान्य देऊन शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आ.पाटील यांच्याकडून होत आहे.शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रत्येकी रु.४ कोटी याप्रमाणें दोन्ही नगरपालिकाना रु.८ कोटी मंजूर करून मतदारसंघात आपल्या कामाची छाप पाडून विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. यानंतर आणखी शहरातील ..

पहूरपेठ येथील ग्रामपंचायत पदाधिकार्‍याला कोरोनाची बाधा; २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

पहूर : पहूरपेठ येथील संतोषीमाता नगरात राहणार्‍या ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली .दोन दिवसांपासून त्रास जाणवत असल्याने त्यांना पाचोरा येथील खाजगी दवाखान्यात भर्ती करण्यात आले होते. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पाझिटिव्ह आल्याची माहिती आहे. मगळवारी दिवसभरात पहूर कोविड सेंटरमधील एकुण ९९ रूग्णांची रॅपिड ऍॅन्टीजेन टेस्टिंग करण्यात आली. त्यात २७ जणांचा अहवाल कोरोना पाझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय अधिक्षक तथा नोडल अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांनी दिली ..

पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेशी अतिप्रसंग

अमळनेर : पतीला जीवे मारणची धमकी देत विवाहित तरुणीवर अतिप्रसंग केल्याची घटना तालुक्यातील दहीवद येथे ते चार महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

पारोळा तालुक्यात नव्याने १२ पॉझिटिव्ह

पारोळा : शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.मंगळवारी पुन्हा नव्याने १२ अहवाल प्राप्त झाले पूर्ण अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या मध्ये गोपाल नगर १ स्त्री वय ५०, बहादरपुर ८ पुरूष वय ३३, २८, ३ स्त्रीया वय ७०, १३, ७, १८, ५५, जोगलखेडा १ पुरूष वय ५३, विटनेर १ पुरूष वय १३, सावरखेडा १ पुरूष वय ६७ यांचा समावेश आहे...

पाचोरा येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये बांबरुड(राणीचे)येथील युवकाची आत्महत्या

पाचोरा : येथील पाचोरा- वरखेडी रोडवरील साईमोक्ष लॉन्स संशयित कोरोना रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या एका युवकाने कोरोना तपासणी अहवाल येण्यापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे...

म.फुले यांच्या स्मारकाची तोडफोड करणार्‍याला शिक्षा करण्याची म.फुले ब्रिगेडची मागणी

बोदवड : यवतमाळ येथील आझाद मैदानावर असलेल्या शिक्षण महर्षी महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारकाची अज्ञात माथेफिरूने विटंबना केली. सोबत मागील काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजगृहावर तोडफोड झाली. ज्या ज्ञानगंगेने आम्हा सर्वांना ज्ञान प्राप्त केले अशा थोर विचारवंतच्या स्मारकाची आणि राजगृहाची विटंबना झाली. अशा अज्ञात माथेफिरूविरुद्ध त्वरीत गुन्हा दाखल करून त्याला अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी विनंती बोदवड तालुका महात्मा फुले बिग्रेडच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर महात्मा फुले बिग्रेडचे ..