‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर होणार जळगावच्या ललिता पाटीलची एन्ट्री

    दिनांक : 19-Jun-2022
Total Views |
जळगाव : आपल्या ताटात जे दोन वेळच जेवण आपल्याला मिळत याच श्रेय बळीराजास जात. ऊन, वारा, पाऊस, अशा कुठल्याच गोष्टीची पर्वा न करता तो मात्र दिवसरात्र प्रयत्नांची पराकाष्टा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. पण जेव्हा हा पोषणकर्ता आत्महत्या करतो तेव्हा परिस्थिती किती बिकट निर्माण होते हि व्यथा सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती’ या मंचावरून जळगावच्या ललिता जाधव सगळ्यांना सांगू इच्छितात की आत्महत्या हा पर्याय नाही.
 
 
kbc 
  
जळगाव येथील ललिता पाटील कोण होणार करोडपती या कार्यक्रमात सहभागी झाल्या असून बुधवारी २२ जून रोजी हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ललिता या अंगणवाडी शिक्षिका आहेत. त्यांना स्वतःची प्रगती करायची होती. म्हणून त्यांनी लग्नानंतर अजून शिक्षण करायचे ठरवले. परंतू घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कधी ओवाळणीतून किंवा अजून कुठून जर पैसे भेट म्हणून मिळाले तर ते पैसे त्या जपून ठेवत आणि लागतील तसे ते पैसे शिक्षणासाठी वापरत. असे करून त्यांनी एम.ए. केले आणि त्या शिक्षिका झाल्या.
 
ललिता यांचे लग्न एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाले. त्यामुळे सासरी देखील पैशाची अडचण कायम असायची. कधी हवामान साथ देत नाही तर कधी पिकाला हवा तो भाव मिळत नाही. म्हणून कायम हातात जेमतेम पैसा असे. या सगळ्या मुळे कर्ज घेण्याची वेळ आली पण आता ते कर्ज फेडणार कसे. फेडण्याचा काही मार्ग दिसला नाही म्हणून ललिता यांच्या पतीने किटकनाशक पिऊन आत्महत्या केली.
 
पतीच्या निधनांनंतर आलेल्या अडचणीवर त्यांनी कशी मात केली याबद्दल सविस्तरपणे अनुभव कथन करण्यास त्या रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात येऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा त्यांचा उद्देश आहे. हा भाग ‘कोण होणार करोडपती २२ जून बुधवार रोजी ‘ रात्री ९ वाजता. सोनी मराठी वाहिनीवर बघायला मिळेल.