नंदुरबार

नंदुरबारला बिल्डर देवेद्र जैन यांच्या कार्यालयावरील सशस्त्र दरोड्यात बारा लाखांची लूट

नंदुरबार : येथील गणपती मंदीर परिसरातील बिल्डर देवेद्र जैन यांच्या कार्यालयावर सशस्त्र दरोडा घालून सोळा लाखांची लूट केली आहे. डी.सी. डेव्हलपर्सच्या कार्यालयात दोन सशस्त्र दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून तेथील कर्मचार्‍याला बांधून ठेवत १२ लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली...

दक्षिण काशी प्रकाशा येथून जल, मातीचा कलश अयोध्येला रवाना

तळोदा : अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रजी यांच्या भव्य मंदिर बांधकामाच्या भूमिपूजनासाठी देशभरातून पवित्र नद्यांचे जल पोहचवले जात आहे. दक्षिण काशी म्हणून प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या प्रकाशा तालुका शहादा जि नंदुरबार येथून नद्यांच्या त्रिवेणी संगमातून पवित्र जल भरून कलश पाठविण्यात आला आहे...

नंदुरबार जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाभर पोस्टर आंदोलन

धडगाव/नंदुरबार : १० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेली अधिसूचना रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी नंदुरबार जिल्हा शिक्षक भारतीच्या वतीने बुधवार दिनांक २२ जुलै २०२० रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी पोस्टर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले...

महिला रुग्णालयाचे काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देश

नंदुरबार : महिला रुग्णालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीच्या ठिकाणी कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात येत असल्याने इमारतीची आवश्यक कामे ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावीत आणि ऑक्सिजन व्यवस्थादेखील त्वरीत निर्माण करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले...

नंदुरबार जिल्ह्यातील ४ शहरात ८ दिवस कडक संचारबंदी

नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार नगरपालीका/नगरपंचायत क्षेत्राच्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून पुढील आदेश येईपर्यंत चारही शहरात २२ जुलैच्या रात्री १२ वाजेपासून ते ३० जुलै २०२० च्या मध्यरात्रीपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत...

तळोदा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे १५०० नागरिकांना रोगप्रतिकारक काढा वाटप

तळोदा : येथील विठ्ठल मंदिर परिसरात आयुष्य मंत्रालयाने निर्धारित केलेल्या काढ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे १५०० नागरिकांना वाटप करण्यात आले. कोविड १९ या आजारावर रोगप्रतिकारक शक्ती वाढावी ह्या हेतूने काढ्याच वाटप करतांना त्याच महत्व पटवून देण्यात आले...

नंदुरबार, शहादा येथे १८७ वृक्षांची लागवड, संवर्धन

नंदुरबार : महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मणार्थ येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात ७७ तसेच शहादा येथील शाळेच्या परिसरात ११० अशा एकुण १८७ वृक्षांची लागवड करण्यात आली. देशात व राज्यात कोरोना महामारीचे संकट असताना सामाजिक बांधिलकी जपत व कोरोना संदर्भात शासनाने दिलेल्या सुचना व नियमाचे काटेकोर पालन करत वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबविण्यात आले...

तळोद्यात सव्वाचार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

तळोदा : येथील नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नगरोत्थान अभियानांतर्गत एकूण ४ कोटी २६ लाख रुपयांचा रस्ते, दुभाजक, फुटपाथ, गटारी अश्या विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६० दात्यांनी रक्तदान केले...

आयान शुगरची गाळपाची तयारी; तोडणी, वाहतूक यंत्रणांचे करार पूर्णत्त्वास

नंदुरबार : समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्याने आगामी गाळप हंगामासाठी जोरदार तयारी केली आहे. जिल्ह्यात २२ ते २३ लाख टन ऊस उपलब्ध आहे. पैकी दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सलग तीन वर्ष दुष्काळामुळे मागील वर्षी ऊस टंचाईचा फटका बसला. मागील वर्षी व याही वर्षी सुरुवातीलाच वरुण राजाने कृपादृष्टी दाखवली. डिसेंबर-२०१९ पासून ऊसाच्या लागवडी वाढल्या. आगामी हंगामासाठी जिल्ह्यातून कारखान्याकडे आजपर्यंत १२ हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान खात्याने ..

प्रतिबंधीत क्षेत्रात संचारबंदीचे कठोरतेने पालन करा : डॉ. के.सी. पाडवी यांचे निर्देश

नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्रात संचारबंदीची अंमलबजावणी कठोरतेने करावी आणि नागरिकांमध्ये या आजाराबाबत अधिक जनजागृती घडवून आणावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.के.सी. पाडवी यांनी दिले. कोरोनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. ..

अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे रोग प्रतिकारक शक्ती औषधाचे वाटप

नंदुरबार : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सुरुवातीला उच्चभ्रू वस्तीमध्ये आढळलेल्या कोरोनाने आता झोपडपट्ट्यांमध्ये धिरकाव केला आहे. अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे नंदुरबार न.पा.तील सफाई कर्मचार्‍यांना रोग प्रतिकारक शक्ती औषधाचे वाटप करण्यात आले...

मास्कच्या वापराबाबत जनजागृतीवर भर द्या : डॉ.भारुड

नंदुरबार : जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांना मास्क वापराबाबत आवाहन करण्यात यावे आणि सूचनांचे पालन न करणार्‍या विरोधात दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी बबन काकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आदी उपस्थित होते. ..

धडगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

धडगाव : नंदुरबार जिल्हयात पुन्हा ५ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. त्यात नंदुरबार २, अक्कलकुवा २, धडगांव येथे एकाचा समावेश आहे. त्यामुळे आता ४१ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १६० रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत धडगांव तालुका कोरोनापासून लांब होता. मात्र आता धडगांव तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे...

शासनाची बीडीएस प्रणाली सुरु

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शासकीय कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव गेल्या ३ महिन्यांपासून प्रलंबित होतेे. स्वतःची जमा रक्कम कौटूंबिक अडचणीसाठी बीडीएस प्रणालीतील बिघाडमुळे काढता येत नव्हती. यामुळे राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले होते. याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व अतिरिक्त मुख्य सचिव, वित्त विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना संघटनेमार्फत २८ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक ..

नियमित कर्ज भरणार्‍यांना दिलासा द्या

तळोदा : शेतकर्‍यांचे कर्ज माफ करून त्यांना पीक कर्ज द्यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे बँकांसमोर निदर्शने केली. तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले...

नंदुरबारमध्ये स्टेट ट्यूब, सिरिन साहित्य आढळले उघड्यावर

नंदुरबार : शहरातील जुना बैल बाजार परिसरातील महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळ एका प्लॅस्टिकच्या पिशवीत रक्ताचे नमुने तपासणीसाठी वापरण्यात आलेले स्टेट ट्यूब आणि सिरिन साहित्य बेवारसरित्या आढळून आल्याने खळबळ उडाली. ..

तळोदा येथे कोरोनाचा शिरकाव

तळोदा : येथे अखेर ३ महिन्यानंतर कोरोनाने एन्ट्री केली आहे. ठाणे येथून (मुंबई) आलेल्या एका ४० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान या मुलाच्या आईचे शुक्रवारी रात्री निधन झाल्याने मुलाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे...

तळोदा तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची खा.डॉ.हिना गावीत यांच्याद्वारे पाहणी

नंदुरबार : नंदुरबार मतदारसंघाच्या खा. डॉ. हिना गावित यांनी तळोदा तालुक्यातील मोड, बोरद , खरवळ आदी गावाना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकर्‍यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मोड, बोरद या गावात सर्वाधिक घरांची पडझड झाली आहे. अनेकांचे घर संसार उघड्यावर आली आहेत. त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी तहसीलदार विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी ग्रामसेवक तलाठी आणि नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे वादळी पावसातील नुकसानग्रस्तांना मदतीचा हात

शहादा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्यावतीने सोनवल ता.शहादा येथे क्षतिग्रस्त १०० कुटुंबांना तातडीने निवारा होण्याच्या दृष्टीने ताडपत्री कागद, केरोसीन दिवे आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले...

अभियंता बबनराव जगदाळे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

नवापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एका बांधकाम ठेकेदाराने जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत पिपंरीपाडा (ता. नंदुरबार) येथे रस्त्यावर स्लॅब ड्रेन (पूल) तसेच जिल्हा परिषद दुरुस्तीचे कामे व पंचायत समितीच्या दुरुस्तीच्या कामांचे ठेके घेऊन कामे पूर्ण केले आहेत. त्याची ४४ लाखांचे बिल मंजूर होऊन रक्कम ठेकेदाराला मिळाली आहे. मात्र ही मंजुरी करताना अडीच टक्क्यांप्रमाणे एक लाख पाच हजाराची रक्कम अभियंता जगदाळे यांनी मागितली होती. त्यापोटी २० हजार रूपये आधी दिलेही होते. उर्वरीत रक्कम देण्याचे ..

रोटरी क्लब ऑफ नंदुरबारतर्फे कोरोना योध्यांना पीपीई कीट वाटप

नंदुरबार : कोरोना महामारी रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांबरोबरच पोलीस अधिकारी-कर्मचारी सुद्धा जीवाची बाजी लावत असून नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कसा होईल यासाठी कार्यरत आहेत. या कोरोना योध्यांना रोटरी क्लब ऑफ नंदुरबारतर्फे पीपीई किटचे वाटप करण्यात आले...

मोदी सरकारचे दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या वर्षांत क्रांतिकारी निर्णय : खा.डॉ.गावीत

नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घटनेमधील कलम ३७० रद्द केला. तत्कालीन कॉंग्रेस सरकारने केलेली एक ऐतिहासिक चुक सुधारली. ६ ऑगस्ट २०१९ या दिवशी खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले. तसेच कोरोना विषाणू विरुध्द वेळेवर लॉकडाऊन लागू करुन इतर देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाची स्थिती खूपच नियंत्रणात असल्याची माहिती खा.डॉ.हिना गावीतयांनी पत्रकार परिषदेत दिली...

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीवर अधिक भर द्या : पालकमंत्री डॉ.पाडवी

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीवर अधिक भर द्या : पालकमंत्री डॉ.पाडवी..

कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

नंदुरबार : पंधरा वर्षापासुन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करीत असून शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कंत्राटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे...

नंदुरबार येथील घरफोडीप्रकरणातील आरोपी जेरबंद

नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नगाव तिसी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहार योजनेंतर्गत तेल, दाळ, तांदुळ, तसेच शाळेतील संगणक संच व प्रोजेटर असा एकुण 18,900रु.किंमतीचा मुद्देमाल अज्ञात आरोपींनी शाळेचे बंद दरवाजाचे कुलुप तोडून चोरी केला. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे प्रमिलाबाई साहेबराव देसाई नंदुरबार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे...

रहस्य चित्रपटाच्या पोस्टरचे नंदुरबार येथे अनावरण

दिग्दर्शक भावेश पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथील परिसरात रहस्य या चित्रपटाची शूटिंग करण्यात आले आहे. प्रत्येक नवी रात्र ही रहस्याला जन्म देत असते. अशाच एका रहस्याचा आणि त्या रहस्याचा शोध घेण्याच्या प्रवासाचा थरारक अनुभव देणारा ‘भावेश प्रोडक्शन्सचा’ ‘रहस्य’ हा आगामी मराठी चित्रपट ७ फेब्रुवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे...

काश्मीर पुन्हा तापविण्याचा प्रयत्न!

कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेेष दर्जा काढून घेण्यात आल्यानंतर, चीनने सुरक्षा परिषदेत काश्मीरमधील स्थितीबाबत चर्चा घडविली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या पररराष्ट्र मंत्र्यांनी 12 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्राला पाठविलेल्या पत्रात पुन्हा काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे...

आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी- अभाविपची मागणी

नंदुरबार: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेतर्फे हैद्राबाद स्थित पशुवैद्यक डॉक्टर प्रियंका रेड्डी हिच्यावर बुधवारी सायबराबाद येथे झालेल्या अमानुष बलात्कार व हत्येविरोधात शहरात संवेदना कँडेल मार्च (मूक मोर्चा) काढण्यात आला. या संवेदना रॅली मध्ये शहरातील नागरिक व परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.    अभाविप नंदुरबार जिल्हा संयोजक निलेश हिरे यांनी ह्या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला व ह्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी ..

कुपोषण मुक्तीसाठी व्हाउचर योजनेस प्रारंभ सुरू

नंदुरबार जिल्हा : गर्भवती मातांसाठी सक्षम पाऊल..

पिसावर ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिमा अनावरण

महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरणाचा सोहळा झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुकरमुंडाचे माजी सरपंच डॉ.विजय पटेल हे उपस्थित होते. प्रतिमा अनावरण पिसावरचे सरपंच अशोक लाश्या ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले...

रघुवंशी विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थ्यांकडून ३८ उपकरणे सादर

 नंदुरबार : येथील कै. मोहनसिंग कन्हैयालाल रघुवंशी प्राथमिक विद्या मंदिरात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ३८ उपकरणे सादर केली.  प्रदर्शनाचे उद्घाटन नंदुरबार पं.स. गटशिक्षणाधिकारी ड..