भारत-वेस्ट इंडिज पहिली वनडे उद्या

    दिनांक : 21-Jul-2022
Total Views |
मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघांमध्ये उद्या, शुक्रवारपासून वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. तीन वनडे सामने होणार आहेत. त्यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका होईल. टीम इंडिया विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या मालिकेत जबरदस्त कामगिरी करून आपलं स्थान अधिक भक्कम करण्याचा टीम इंडियाचा विचार असणार आहे. (India vs West Indies 1st ODI Latest Update)
 
 

match
 
 
 
टीम इंडियाचे (Team India) स्टार खेळाडू या मालिकेत खेळणार नाहीत. शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) संघाची धुरा देण्यात आली आहे. वनडे मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व धवन करणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे.
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वरिष्ठ निवड समितीने वनडे मालिकेसाठी १६ सदस्यांचा संघ निवडला आहे.
माजी कर्णधार जेसन होल्डर याचे भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पुनरागमन झाले आहे. २२ जुलै अर्थात शुक्रवारपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. होल्डर हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. बांगलादेश विरुद्ध टी-२० मालिकेत होल्डरला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. मात्र, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीनं होल्डरला संधी दिली. भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली.
 
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना २२ जुलै रोजी खेळवण्यात येईल. ही लढत त्रिनिनादच्या क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियममध्ये होईल. शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. त्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होईल. हा सामना डीडी स्पोर्ट्सवर देखील पाहू शकता.
 
असा असेल भारतीय संघ
 
शिखर धवन (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह