धुळे

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रोत्साहित करावे : जिल्हाधिकारी संजय यादव

धुळे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्ंगत खरीप हंगाम २०१९ मध्ये धुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी एकूण ९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तो शेतकर्‍यांच्या बचत खात्यात वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षीही अधिकाधिक शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग नोंदवावा. जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून कृषी विभाग व विमा कंपनीने शेतकर्‍यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे...

कोरोना लढ्यात शिरपूरच्या वीटभट्टी चालकाचे औदार्य

शिरपूर : तालुक्यातील लौकी गावातील वीटभट्टी चालकाने आपल्या वीटभट्टीमधून मिळणार्‍या उत्पन्नापैकी एका दिवसाचे उत्पन्न दहा हजार रुपये तहसीलदार आबा महाजन यांच्याद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहायता कोषात (प्रत्येकी पाच हजार रुपये) नुकतेच सुपूर्द केले. अशा संकटात अन्य बांधकाम व्यावसायिकांनीही मदतनिधी देण्याचे आवाहन गणेश पाटील यांनी केले आहे...

धुळे जिल्ह्यातून आतापर्यंत १०१८ रुग्ण कोरोनामुक्त

धुळे : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ६०.७७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, तर मृत्यू दर एप्रिल २०२० मधील २१.४३ टक्क्यांवरून ४.७१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. धुळे जिल्ह्यातील एकूण १६७५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत १०१८ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त होवून आपापल्या घरी परतले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे...

खरीपासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना

धुळे : राज्य सरकारने प्रधान मंत्री फसल बीमा योजना (पीएमएफबीवाय) २०२० च्या खरीप हंगामासाठी पालघर, रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला आणि भंडारा या जिल्ह्यांतील कर्जदार आणि विना -कर्जदार शेतकर्‍यांसाठी एचडीएफसी एर्गो जनरल विमा कंपनीला अधिकृत केले आहे. पीएमएफबीवाय योजना दुष्काळ, पूर, कोरडे गवत, भूस्खलन, चक्रीवादळ,कीटक, रोग आणि इतर अशा विस्तृत बाह्य जोखमीमुळे पिकांच्या उत्पन्नातील कोणत्याही नुकसानाविरूद्ध विमा देते. उत्पादनातील तोटा निश्चित करण्याच्या उद्देशाने राज्य सरकार या योजनेसाठी अधिसूचित ..

धुळ्याचे जिल्हाधिकारी पोहोचले शेतकर्‍यांच्या बांधावर

धुळे : कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पीपीई कीट घालत जिल्हा रुग्णालय व श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुगणालयातील अलगीकरण कक्षात जावून या रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेणारे जिल्हाधिकारी संजय यादव आज थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले. एवढेच नव्हे, तर त्यांनी ट्रॅक्टरवर बसून रोटाव्हेटर चालविले. निमित्त होते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजर्‍या होणार्‍या कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपाचे...

हिरे रुग्णालयाच्या डॉक्टरांसह १२ कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा

धुळे : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येचा आकडा दिवसागणिक वाढतोच आहे. मंगळवारी ६० नवीन रुग्ण समोर आले. यात हिरे रुग्णालयातील सहा डॉक्टर, चार टेक्निशियन आणि दोन कर्मचार्‍यांचा समावेश आहे. ..

विद्यार्थ्यांचा एटीकेटीचा प्रश्न जैसे थे

धुळे : राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय घेवून दहा दिवस उलटलेले असले तरी अद्याप एटीकेटीच्या बाबत सरकारने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. परीणामी राज्यभरातील १० लाख विद्यार्थ्यांपैकी जवळपास ३ लाख विद्यार्थ्यांच्या डोक्यावर या निर्णयाबाबतची टांगती तलवार आहे...

धुळ्यात 25 रुग्णांची कोरोनावर मात

धुळे : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहे. याठिकाणी असलेले 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना शनिवारी सेंटरमधून सुटी देण्यात आली. यावेळी महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, उपायुक्त गणेश गिरी, सहायक आयुक्त शांताराम गोसावी आदी उपस्थित होते. टाळ्या वाजवत, पुष्पवृष्टी करून कोरोनामुक्त झालेल्यांना निरोप देण्यात आला. या वेळी आयुक्त अजिज शेख म्हणाले की, कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेण्याची ..

प्रशांत महाजन यांना पीएच.डी. प्रदान

शिरपूर : येथील आर.सी.पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कुलसचिव प्रशांत तुकाराम महाजन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून व्यवस्थापन विद्याशाखेंतर्गत पी.एचडी. पदवी प्राप्त करीत यश संपादन केले आहे...

शेतकर्‍याची आत्महत्या; ९ जणांना कोठडी

धुळे : शहरापासून जवळ असलेल्या सौंदाणे गावातील शेतकरी विजय पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी मोहाडी पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे. त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली...

धुळ्याला ७ रुग्ण कोरोनामुक्त

धुळे जिल्हा रुग्णालयासह छगनमल बाफना आयुर्वेद महाविद्यालय, नगावबारी, धुळे येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील दोन, असे सात रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला...

शिरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातून दहा जणांची कोरोना विषाणूवर मात

शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल दहा रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली. त्यांना आज जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. शिरपूर उपजिल्हा रुग्णालय डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तेथे सध्या २४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी दहा रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला...

कर्जमाफीचा शासन आदेश म्हणजे विश्वासघाताची परिसीमा - बबनराव चौधरींची सरकारवर टीका

वर्षभरात आधी दुष्काळ, महापूर आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे राज्यातल्या शेतकर्‍याचे भयंकर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी व्हावी अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत होती. ..

नागपूर सुरत महामार्ग चे कामाला लवकर शुभारंभ होणार

तालुक्यातील बेडकीपाडा ते धुळे जिल्ह्यातील फागणे येथील चौपदरीकरणाचे काम निधी अभावी दीड वर्षापासून रखडलेले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने कामाचे उर्वरीत कामाचे 13 डिसेंबर 2019 रोजी नोटीस वेब साईडवर अपलोड केली आहे...

धुळे येथे हिंदुराष्ट्र जागृती सभेच्या प्रसाराचा झंझावात....!

येत्या २२ डिसेंबर २०१९ रोजी येथील गिंदोडीया मैदानात होणाऱ्या हिंदु राष्ट्र जागृती सभेचा प्रसार धुळे शहर आणि ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु असून, शहरातील मोक्याच्या जागी लावलेले होर्डिंग आणि फलक लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सभेचे वैशिष्ट्य म्हणजे शहर आणि ग्रामीण क्षेत्रातील आबाल वृद्ध या सभेच्या प्रसारात सहभागी होत आहेत. ..

चोरीचे फोन विकताना चोरट्यांना रंगेहात पकडले ; पोलिसांची बहादुरी

पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून १८ मोबाईल फोन चोरल्याचे काबुल करण्यात आले आहे. दहिवद येथील दोन इसम हे काही महागडे टच स्क्रीन मोबाईल चोरुन लपुन विक्री करीता ग्राहक शोधत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने स.पो.नि. पाटील यांनी पथक तयार करुन सदर व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला व चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या...

धुळ्यात भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू

धुळ्यामध्ये पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. मजुरांना घेऊन जाणारी पिकअप व्हॅन उस्मानाबादकडे जात असतांना ही घटना घडली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ..

शिवजयंतीनिमित्त‘शिवदौड’

   शिरपूर, १८ फेब्रुवारीमराठा व्यापारी संघटनेतर्फे शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला ‘शिवदौड’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. शहरातील पित्रेश्‍वर कॉलनी मैदानापासून सकाळी ७.३० वा. मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धा सुरू होईल. उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार चंद्रशेखर देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, मुख्याधिकारी अमोल बागुल, निरीक्षक संजय ..