राष्ट्रीय

चायनीज कंपनीकडून पीएम केअर फंडाला ७ कोटींची मदत

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पृष्ठभूमीवर कोरोनाविरोधात लढण्यासाठी चायनीज टेलीकॉम गिअर मेकर कंपनी हुआवेने पीएम केअर फंडासाठी ७ कोटी रुपये दिल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हुआवे या कंपनीने काही दिवसांपूर्वीच भारताला शरीराचे तापमान तपासणीसंर्भातील अद्ययावत तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शविली होती...

संसदेत दोन हात होऊन जाऊ द्या

नवी दिल्ली : लडाखच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पलटवार केला आहे. आम्ही चर्चा करण्यासाठी घाबरत नाही. राहुल गांधी केव्हाही संसदेत येऊन आमच्याशी चर्चा करू शकतात. मात्र, जवान सीमेवर लढत असताना पाकिस्तानला आनंद होईल अशा प्रकारची वक्तव्ये करणे गैर असल्याचे शाह म्हणाले...

देशात कोरोनाचा हाहाकार; २४ तासात ४१० रुग्णांचा बळी

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असून आकडेवारी नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाच्या तब्बल 19 हजार 906 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासात 410 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे...

गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना सध्या घरातच विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे जनसंपर्क प्रमुख प्रथेश पटेल यांनी ही माहिती दिली आहे...

देशाकडे डोळे वटारून पाहणाऱ्यांना चोख उत्तर दिले - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी आकाशवाणीच्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित करत आहे. देशातील कोरोनाचे वाढते संकट आणि लॉकडाऊन दरम्यान मोदींनी अनेकदा देशाला संबोधित केले आहे. पंतप्रधान मोदींचा 'मन की बात'चा हा ६६ वा भाग आहे. भारताकडे डोळे वटारून पाहणाऱ्यांना आपण चोख उत्तर दिले आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले...

भारतात ‘डेक्सामेथासोन’ औषध वापरायला परवानगी

नवी दिल्ली : देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन औषधाने उपचार करायला परवानगी देण्यात आली आहे...

इतर देशांच्या तुलनेत भारतात चांगली स्थिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : दिवसागणित देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटन यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते...

आता घरबसल्या अपडेट करता येणार रेशन कार्ड

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतीच 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची असल्यास ती आता घरूनच करता येणार आहे. ही नावाची नोंदणी कशी करायची, घरबसल्या रेशन कार्ड कसे अपडेट करायचे हे जाणून घ्या...

आसामला पूराचा फटका; १५ जणांचा मृत्यू

गुवाहाटी : आसाममध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे राज्यात पूर आला असून १६ जिल्ह्यातील ७०४ गावांना पूराचा फटका बसला आहे. पावसाच्या पाण्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ..

वेळेआधीच मान्सूनने व्यापला संपूर्ण देश

नवी दिल्ली : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) काल गुरूवारी संपूर्ण देश व्यापला. महत्वाचे म्हणजे १२ दिवस आधीच मान्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. सर्वसाधरणपणे देशातील मान्सूनची अंदाजित वेळ ८ जुलै होती. पण यंदा १२ दिवस आधीच म्हणजेच २६ जून रोजी मान्सूनने देश व्यापला. यंदाच्या हंगामात १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे...

'या' राज्याने वाढवले ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन

रांची : झारखंड सरकारने राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेता लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सरकारने शुक्रवारी एक आदेश जारी केला असून राज्यातील लॉकडाऊन ३१ जुलै २०२० पर्यंत वाढवला आहे. यापूर्वीच्या अटी व शर्ती या लॉकडाऊनमध्ये कायम राहणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे...

देशातील कोरोनाबाधितांनी संख्या पाच लाखांवर

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णवाढीने आता वेग धरला असून कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता पाच लाखांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. गेल्या २४ तासात कोरोना रुग्ण संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली. देशभरात गेल्या २४ तासात एकूण १८ हजार ५५२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे...

लडाखमध्ये चिनी सैनिकांच्या हालचाली वाढल्या

नवी दिल्ली : गलवान खोर्‍यातून अंशत: माघार घेणार्‍या चीनने लडाखच्या सीमेवरील फिंगर-4 आणि फिंगर-5 या भागात आपल्या हालचाली वाढविल्या असून, तिथे सैनिकांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब सॅटेलाईट इमेजमधून समोर आली आहे...

सुरक्षित अंतर आणि मास्कशिवाय पर्याय नाही : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : जगावर कोरोनासारख्या भयंकर संकटाचा सामना करावा लागेल, याची कल्पना कधी कुणी केली नव्हती. या महामारीवर औषध सापडत नाही, तोपर्यंत सुरक्षित भौतिक अंतर आणि तोंडाला मास्क हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी केले. आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार अभियानाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते...

गलवान खोऱ्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

लडाख : पूर्व लडाखच्या सीमेवरून भारत-चीनमध्ये संघर्ष वाढल्याने तणावात भर पडली. आठवडाभरापूर्वी चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताच्या वीस जवानांना वीरमरण आले होते. दरम्यान, गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना दोन जवानांना पुरातून वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे...

सर्व सहकारी बँका थेट रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणात

सर्व सहकारी बँका थेट रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणात ..

लडाखमधून माघार घेण्यास चीनला पाडले भाग

नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढलेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर काल भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावर सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये सैन्य माघारी घेण्यावर एकमत झाले. पूर्व लडाखमध्ये वादग्रस्त जागांवरून सैन्य मागे घेण्याबद्दल चर्चा झाली असून दोन्ही बाजू याची अंमलबजावणी करतील, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे...

पतंजलीकडून ‘कोरोनिल’ आयुर्वेदिक औषध लाँच

नवी दिल्ली : जगभरातील अनेक कंपन्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील लस शोधत आहेत. त्यासाठी अनेक देशांमध्ये संशोधनही सुरू आहे. याच पृष्ठभूमीवर योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला असून ते आज लाँच करण्यात आले आहे. आहे. हरिद्वार येथे आज दुपारी १२ वाजता दिव्य 'कोरोनिल' टॅबलेट लाँच करण्यात आले. योगगुरु बाबा रामदेव आणि पंतजलीचे सीईओ बालकृष्ण यांनी या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलचे निकाल समोर आणले...

भाविकांशिवाय जगन्नाथ पुरी रथयात्रेला सुरुवात

भुवनेश्वर : ओदिशातील ऐतिहासिक जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यानंतर आज जगन्नाथ पुरी रथयात्रेला भाविकांशिवाय सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, या रथयात्रेपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या. ..

भारतीय व्यवसायांवर चिनी हॅकर्सच्या हल्ल्याची शक्यता

पुणे : देशातील व्यवसाय आणि माध्यम समूहांवर चिनी हॅकर्स सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याचे डार्क वेबवरून समोर आले आहे. चीनमधील हॅकर्स मागील दहा दिवसांपासून भारताला धडा शिकवण्याच्या चर्चा करीत आहेत, अशी माहिती सायबर सुरक्षा क्षेत्रातील सिंगापूर येथे मुख्यालय असलेल्या सीफर्मा या कंपनीने दिली...

मिझोराम पुन्हा भूकंपाने हादरले

नवी दिल्ली : मिझोरामला आज सकाळी पुन्हा भूकंपाचे झटके बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ एवढी होती, अशी भूकंप विज्ञान केंद्राने दिली. मिझोराममध्ये पहाटे ४.१० मिनिटांनी या भूकंपाचे धक्के जाणवले. राज्याच्या दक्षिण-पश्चिम दिशेकडे असणाऱ्या चंफाई जवळ या भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात आले. परंतु या भूकंपाने राज्यात कोणतीही जीवित अथवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. राज्यात १२ तासांपूर्वीच म्हणजे रविवारी (दि. २१ जून) सायंकाळी भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता ५.१ इतकी होती...

गोव्यात ‘कोरोना’चा पहिला बळी

पणजी : गोव्यात सोमवारी कोराना व्हायरसमुळे पहिला मृत्यू झाला आहे. सत्तरी तालूक्यातील मोर्ले गावातील 85 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सोमवारी सकाळी दिली. राज्यात आतापर्यंत 818 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 135 जण बरे होऊन घरी गेले आहेत...

सीमा आणि बर्फाळ प्रदेशात योगा करून जवानांनी दाखवून दिली आपली क्षमता

नवी दिल्ली : भारतासह जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने सीमेवर जवानांनीही सोशल डिस्टन्सिंग राखून योग आणि प्राणायाम केला आहे. लडाखमध्ये सीमेवर योग दिवस योगासन करून साजरा केला जात आहे. बर्फात इम्युनिटी चांगली राहण्यासाठी जवानांनी योग आणि प्राणायम केले...

आयपीएल खेळून क्रिकेटपटू होण्याचे दाखविले स्वप्न!

नागपूर : कुठलाच कामधंदा न करता कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे शक्कलबाज गरजूंना हेरतात. त्यांना जाळ्यात ओढतात. अडकले नाही तर विविध आमिष दाखवितात. अशा अनेक घटना उघडकीस आल्या. अशाच प्रकारची एक घटना अजनी ठाण्यांतर्गत उघडकीस आली. ..

तंत्रज्ञानाचा उपयोग विकास अन् रोजगारासाठी व्हावा : ना. गडकरी

नागपूर : तंत्रज्ञानाचा उपयोग आपला व्यक्तिगत विकास आणि रोजगार मिळावा यासाठी करता आला पाहिजे. तंत्रज्ञानाला आमच्या जीवनात चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या माध्यमातून अनेकांनी रोजगार मिळविला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते शनिवारी महिला उद्योजिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना बोलत होते...

गलवान नदीवर 72 तासांत बांधला पूल

लडाखच्या गलवान खोर्‍यात 15 जूनच्या रात्री भारत आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. त्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र, या स्थितीतही भारतीय लष्कराने रणनीतिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पुलाचे बांधकाम अवघ्या 72 तासांत पूर्ण करून दाखविले. ..

चीनसोबतच्या तणावाचा परिणाम अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामावर

नवी दिल्ली : भारत चीन सीमेवर घडलेल्या घटनेचा परिणाम अयोध्येतल्या राम मंदिराच्याही कामावर होताना दिसत आहे. कारण सीमेवरच्या वाढत्या तणावामुळे राम मंदिराच्या उभारणीचे काम लांबणीवर टाकण्यात आले आहे. राम मंदिर ट्रस्टने अधिकृतपणे ही तारीख पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. सध्या भारत चीन सीमेवरची स्थिती ही चिंताजनक असून देशाचे रक्षण ही पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी मंदिर निर्मितीचे काम पुढे ढकलले जात असून स्थितीचा आढावा घेतल्यानंतर नवीन तारीख जाहीर केली जाईल, असे मंदिर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात ..

हरभजन सिंगचे ट्वीट चीनच्या लागले जिव्हारी

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग याने चीनी मालाचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे. हरभजन सिंग याचे ट्वीट चीनच्या चांगलेच जिव्हारी लागले असून चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने या ट्वीटवर आगपाखड केलीय...

सोन्या-चांदीची झळाळी उतरली

नवी दिल्ली : सोन्याच्या स्पॉट किंमतीबरोबर वायदा किंमतीतही चढउतार पाहायला मिळतो. व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी आजे वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले...

56 हजार बेरोजगारांना रेल्वे मंत्रालयाद्वारे सरकारी नोकरी

मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशभरातील अनेकांना आपला रोजगार गमावावा लागला. असे असताना रेल्वे मंत्रालयाने असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियनच्या सुमारे 56 हजार जागा भरल्या आहेत. यामुळे बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ..

गलवान संघर्ष हा चीनचा पूर्वनियोजित कटच

लडाखच्या गलवान खोर्‍यातील सद्य:स्थिती बदलण्यासाठी आणि भारतीय भूभाग हडपण्यासाठीच चीनने सोमवारी मुद्दाम संघर्ष घडविला आहे. हा सर्व प्रकार पूर्वनियोजित होता. आपली चूक सुधारा अन्यथा दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याचीच शक्यता जास्त आहे, असा स्पष्ट इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज बुधवारी चीनला दिला..

डिवचाल तर ठेचून काढू

नवी दिल्ली : भारत हा शांतीप्रिय देश आहे, संघर्ष निर्माण व्हावा, अशी भारताची भूमिका कधीच राहिली नाही. शेजारील देशांसोबत सीमांवर शांतता असावी, यावरच आम्ही नेहमी भर दिला आहे. मात्र, कुणी आम्हाला डिवचले, तर ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. शत्रूंच्या कोणत्याही धाडसाला त्यापेक्षाही प्रखर भाषेत प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे, असा कठोर संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी चीनला दिला...

माजी खा.हरिभाऊ जावळे यांचे कोरोनाने निधन

जळगाव : भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा रावेर लोकसभा मतदारसंघातील माजी खा. हरिभाऊ माधव जावळे (वय ६७) यांचे मंगळवार १६ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईत निधन झाले. ..

विद्युतमार्गावर धावले पहिले डबल स्टेक कंटेनर

नवी दिल्ली : पश्‍चिम रेल्वेने ‘डबल-स्टेक कंटेनर’ यशस्वी रीत्या चालवून जागतिक विक्रम नोंदविला आहे. आतापर्यंत जगातील सर्वांत मोठ्या विकसित देशांनाही हे यश प्राप्त झालेले नाही. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी टि्वट करून याबाबतची माहिती दिली आहे...

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या शहरांत पुन्हा लॉकडाऊनबद्दल अनुकूलता

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने केंद्र सरकार १८ जूनपासून पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. केंद्र सरकारने मात्र हा दावा फेटाळला असून चुकीचा असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. ही एक अफवा असून विश्वास ठेऊ नका असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे...

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर नावलौकीक मिळविणारा अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत (३४) याने आत्महत्या केली आहे. वांद्ˆयातील घरी गळफास घेऊन त्याने जीवनयात्रा संपविली...

राज्यांशी बोलून आपात्कालीन योजना तयार करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी वरिष्ठ मंत्री आणि अधिकार्‍यांच्या उच्चस्तरीय बैठकीत देशातील एकूण कोरोना स्थितीचा आणि आगामी दोन महिन्यांमधील तयारीचा आढावा घेतला. सर्व राज्यांशी चर्चा करून, आपात्कालीन योजना तातडीने तयार केली जावी, असा निर्देश पंतप्रधानांनी अधिकार्‍यांना दिला...

कर्नाटकात ५वी पर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद

बंगळुरु : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण सर्वत्र सुरू करण्याचा निर्णय होताना दिसतोय, ऑनलाईन शिक्षणाबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला असला तरी यासंदर्भात कर्नाटक राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ..

लॉकडाऊन: ४९४ कर्करोग शस्त्रक्रिया

मुंबई : कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये बहुतांश रुग्णालय बंद होते. त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. याचा मोठा फटका जगभरातील कर्करोगग्रस्तांना बसत असताना मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे आणि त्यांच्या टीमने तब्बल ४९४ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. टाटा हॉस्पिटलच्या या कार्याची दखल जगातील आघाडीचे सर्जिकल जर्नल असलेल्या ’ऍन्नल्स ऑफ सर्जरी’ या ..

बापाच्या मृत्यूनंतरही मुलानं उकळली ८ वर्षे तब्बल ९२ लाखांची पेन्शन

रोहतक : वडीलांचे निधन झाल्यानंतर आठ वर्षे त्यांच्या नावावर पेन्शन घेऊन ९२ लाख उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडीलांच्या नावावर बोगस कागदपत्र देऊन मुलाने पेन्शन उकळली. आठ वर्षे मुलगा पेन्शन घेत असल्याचा सुगावा अधिकार्‍यांना देखील लागला नाही. ज्यावेळी अधिकार्‍यांना हा फसवणुकीचा प्रकार समजला तोपर्यंत आरोपी मुलाने सरकारला ९१.६१ लाख रुपयांचा चुना लावला होता. या संपूर्ण प्रकरणाबाबत ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांच्या तक्रारीवरून सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या ..

जीएसटी रिटर्न फाईलवर विलंब शुल्क नाही

नवी दिल्ली : जीएसटीचे विक‘ी रिटर्न फाईल करायला विलंब झाला असेल, तरी कोणतेही विलंब शुल्क न आकारण्याचा निर्णय घेत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी आज शुक‘वारी देशभरातील व्यापार्‍यांना मोठा दिलासा दिला आहे...

तोयबाचे अमली पदार्थ, शस्त्रास्त्र तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त

श्रीनगर/चंदीगड : काश्मिरातील दहशतवाद पोसण्यासाठी लागणारा पैसा अमली पदार्थांच्या तस्करीतून उभारायचा आणि सजग सुरक्षा दलामुळे काश्मिरातील हालचालींवर निर्बंध येत असल्याने येथील दहशतवादी कारवायांसाठी आवश्यक शस्त्रांची तस्करी पंजाबमधून करण्याचा लष्कर-ए-तोयबाचा प्रयत्न उधळण्यात आला. काश्मीरमध्ये तीन, तर पंजाबमध्ये दोन अतिरेक्यांना अटक झाल्याने लष्कर-ए-तोयबाचे अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र तस्करीचे रॅकेट आज गुरुवारी उद्ध्वस्त झाले आहे...

कोरोनाच्या समूह संसर्गाबाबत ICMRची दिलासादायक माहिती

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अशातच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) एक दिलासादायक माहिती दिली आहे. देशात अजून सामुदायिक संसर्ग झाला नसल्याचे ICMR कडून सांगण्यात आले आहे...

आत्मनिर्भर होण्याची वेळ आली

जगाचा विश्वासू भागीदार होण्याची आणि जगाला नवी दिशा दाखविण्याची क्षमता भारतात असल्याचे कोरोना संकटाच्या काळात स्पष्ट झाले आहे. आता आम्ही आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता असून, ती वेळ देखील आली आहे. दुसर्‍या देशांवर अवलंबून राहणे आपल्याला कमी करावे लागणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी केले. पंतप्रधान मोदी यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (आयसीसी) 95 व्या वार्षिक सत्राला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले...

लोकलसाठी व्होकल होण्याची हीच खरी वेळ

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचे सावट पसरले आहे. भारतातही कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान या संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाला संबोधित केले. यावेळी लोकलसाठी व्होकल होण्याची हीच खरी वेळ आहे, असे मत पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केले...

कोरोनाबाधितांमध्ये भारत पाचव्या स्थानावर

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत 9,971 नवे रुग्ण सापडल्यामुळे देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 2 लाख 46 हजार 628 झाली आहे. यामुळे जगातील सर्वाधिक कोरोना प्रभावित देशांच्या यादीत भारत पाचव्या स्थानावर आला आहे...

तेल विहिरीची आग अजूनही धुमसतच

तिनसुकिया : मागील 15 दिवसांपासून आगीने धुमसत असलेल्या ऑईल इंडिया कंपनीच्या बाघजन येथील नैसर्गिक वायू विहिरीच्या परिसरात दोन अग्निशमन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती कंपनी सूत्रांनी आज दिली. घटनास्थळ हे राजधानीपासून पूर्वेला 500 किमी अंतरावर आहे...

वाढदिवसालाच कोरोनामुळे डीएमकेचे आमदार जे. अनबालागन यांचे निधन

कोरोनाने हातपाय पसरले असताना दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. अशातच डीएमकेचे आमदार जे. अनबालागन यांचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला आहे...

नक्षलग्रस्त भागात कमांडो सुनैना पटेलने केले टीमचे नेतृत्व

नक्षलग्रस्त भागात दंतेश्वरी फायटर टीमचे नेतृत्व करणार्या कमांडो सुनैना पटेल यांनी गर्भवती असूनही नक्षलवाद्यांकडून आघाडी घेतली सुट्टी न घेता एन-47 आणि 10 किलोची बॅग उचलून नियमित पेट्रोलिंगवर उभ्या राहिल्या. दंतेवाड्यातून एक आनंदाची बातमी आली की, कमांडो सुनैना पटेल यांनी एका मुलीला जन्म दिला. आई व मुलगी दोघेही स्वस्थ व सुखरूप आहेत. ..

२०१९ मध्ये एकूण ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू

भारतात गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये एकूण ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया (WPSI) या स्वयंसेवी संस्थेने एक रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ..

सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख कोटींवर

वसुलीच्या स्तरावर केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख कोटींवर गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय बिकट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारसाठी दिलासा मिळाला आहे. ..

"नवीन ध्येय स्थापित करण्यासाठी योग्य वेळ" - राष्ट्रपतींच्या देशवासियांना शुभेच्छा

"नवीन ध्येय स्थापित करण्यासाठी योग्य वेळ" - राष्ट्रपतींच्या देशवासियांना शुभेच्छा ..

२८ वे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सांभाळला पदभार

लेफ्टिनेंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 28 वें लष्करप्रमुखानी म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी माजी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची जागा घेतली आहे...

CAA विरोधातील आंदोलनात ओसामा बिन लादेन प्रकटला

CAA च्या विरोधात दिल्लीत जमलेल्या मुस्लीम समुदायातील एका तरुणाने आपले नाव "ओसामा बिन लादेन" सांगितल्यामुळे सोशल मीडियात संतापजनक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देतान या तरुणाने आपले नाव अमेरिकेने ठार केलेल्या क्रूर दहशतवादी ओसामा बिन लादेन याचे नाव सांगितले. त्यामुळे CAA च्या विरोधातील खरे कारण काय ? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करीत आहे. ..

अमिताभ बच्चन फाळके पुरस्काराने सन्मानित

महानायक अमिताभ बच्चन यांना चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला...

झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची सोमेन सोरेन यांनी घेतली शपथ

झारखंडमध्ये रविवारी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हेमंत सोरेन यांना रांचीतील मोरहाबादी मैदानात राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोरेन यांच्याव्यतिरिक्त काँग्रेस आणि आरजेडीच्या आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली...

सर्व समाजाला सुख, शांती प्रदान करणारा 'धर्म विजय' हवा - डॉ. मोहन भागवत

आपल्याला असुरी विजयही नको आणि कोणाचे सुख हिरावून मिळणारा राजसी विजयही नको; आपल्याला सर्व समजाला सुख, शांती, समाधांन देणारा व सर्वांना आपलेसे करणारा धर्म विजय हवा आहे. इतरांच्या सुखात आपले सुख मानून त्यांच्या दु:खाचे निवारण करणे व तसे आचरण करणे म्हणजे धर्म विजय आहे. आपणास तो विजय अपेक्षित आहे. असे स्पष्टीकरण डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी केले...

रेल्वे बोर्डाची फेररचना करण्याचा भारतीय रेल्वेचा निर्णय

भारतीय रेल्वेने आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी रेल्वे बोर्डाची फेररचना करण्याचा महत्वपूर्ण असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. रेल्वेतील आठ विभागांचे एकत्रिकरण करीत, आता इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस अशी नवी व्यवस्था आकाराला आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत रेल्वे बोर्डाची फेररचना करण्याचा निर्णय घेण्यात आला...

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीसाठी केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. माहितीनुसार , यासाठी ८७०० कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. एनपीआरअंतर्गत १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२०पर्यंत नागरिकांचा डेटाबेस तयार करण्यासाठी जनगणनेची तयारी आहे...

महिलांचा अपमान केल्याप्रकरणी शशी थरूर यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्याविरोधात केरळमधील तिरुवनंतपुरम येथील स्थानिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. आपल्या पुस्तकातून महिलांचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयाने हे वॉरट जारी केलं आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. ..

माझे पुतळे जाळा, गरीबाची रिक्षा कश्याला जाळता ? - पंतप्रधान नरेंद्र मोदी

"मोदींना देशाच्या जनतेने निवडले हे जर तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही मोदींना नाव ठेवा, मोदींचा तिरस्कार करा. मोदीचा जेवढा विरोध करायचा तेवढा नक्की करा, जेवढा राग काढायचा तेवढा काढा, एवढच नाहीतर मोदीचा पुतळा जाळायचा असेल तर तो देखील जाळा, परंतु देशाची संपत्ती जाळू नका.” असे म्हणत गरिबाच्या झोपड्या, वाहने जाळू नका. गरिबांना मारून तुम्हाला काय मिळणार? असा संतप्त सवाल पंतप्रधान मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधाच्या मुद्यावरून काँग्रेस, विरोधीपक्षांसह हिंसाचार करणाऱ्यांना उद्देशुन केला आहे...

देशात मागील वर्षीपेक्षा यंदा साखर उत्पादन कमी

देशातील 406 साखर कारखाने 15 डिसेंबर अखेरीस सुरू झाले असून, यंदा 45.81 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तरप्रदेशने साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. एकूण उत्पादनापैकी जवळपास निम्मे उत्पादन उत्तरप्रदेशात झाले आहे. महाराष्ट्रात अवघे 7.66 लाख टन साखर उत्पादन झाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत ते 30 टक्केच असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली आहे. ..

१९८७ पूर्वी जन्मलेले सर्व भारतीयच !

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून रान पेटले असताना, 1987 च्या पूर्वी जन्मलेल्यांना भारतीय नागरिक समजले जाणार असल्याचे केंद्रातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. तसेच, ज्यांचे आई-वडील 1987 पूर्वी भारतात जन्मले असल्यास त्यांना प्रामाणिक भारतीय नागरिक मानले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली. ..

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळली

निर्भया बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. दोषी अक्षयची पुनर्विचार याचिका पहिल्याच दिवशी फेटाळली आहे. तीन आरोपींची पुनर्विचार याचिक याआधीच फेटाळण्यात आली होती. पटीयाला हाऊस न्यायालयात या दोषींना फाशी देण्यासंदर्भात याचिकेवर सुनावणी होणार आहे...

पोलिसाच्या वेशातील व्यक्ती संघ स्वयंसेवक नाही - दिल्ली पोलीस

नवी दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणानंतर सोशल मीडियात अफवांना ऊत आला असून अश्याच एका अफवेचा दिल्ली पोलिसांनी खोटारडेपणा समोर आणला आहे. ..

CAA च्या विरोधात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा

देशभरात काही शहरांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध होत असताना आंदोलकांना व निदर्शने करणाऱ्या लोकांना आपण कश्यासाठी निदर्शने करत आहोत, हेच ठाऊक नसल्याचे अनेक माध्यमांनी समोर आणले आहेत. ..

...तर कॉंग्रेसने पाकिस्तानी नागरिकांना नागरिकत्व देण्याचं जाहीर करावं

नरेंद्र मोदींनी झारखंडमधील बरहैत येथील सभेला संबोधित करताना, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यावर निशाणा साधला. आर्टीकल 370 वेळेसही काँग्रेसने असाच गोंधळ घातला होता. आर्टीकल 370 काढले तर करंट बसेल, वातावरण चिघळेल, देश सहन करणार नाही, असा संभ्रम निर्माण केला होता. मात्र, तुम्हीच पाहिलं, 370 हटविल्यानंतर आता काश्मीरमध्ये शांतता आहे. ..

विद्यार्थी चळवळीतील जिहाद्यांपासून सावध राहायला हवं - निर्मला सीतारमण

देशातील काही शहरात नागरिकत्व कायद्याला विरोध होत असून दिल्लीतील जामिया मिलीय विद्यापीठात जो हिंसाचार झाला त्यास अनुषंगून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी भाष्य केले आहे. विद्यार्थी चळवळींमध्ये शिरलेल्या जिहादी, नक्षलवादी आणि फुटीरतावाद्यांपासून जनतेनं सावध रहावं असं त्यांनी म्हटलं आहे...

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पेशावरमधील विशेष न्यायालयाने २००७ मध्ये पाकिस्तानात जारी करण्यात आलेली आणीबाणीच्या खटल्यामध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता...

पोस्टाचे खातेधारक आहात? मग वाचा ही खुशखबर...

पोस्टात पीपीएफ, सुकन्या समृद्धि आणि छोटया बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. पोस्ट विभागाने छोटया बचत योजनांमध्ये पैसे डिपॉझिट करण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. नव्या नियमानुसार खातेधारक नॉन होम पोस्ट ऑफिस ब्रांचमध्येही २५ हजार पेक्षा जास्त रक्कमेचा चेक जमा करु शकतात...