जीवनमान

देशात रक्तपेढ्यांची संख्या ३२६३ तर राज्यात ३४०

मुंबई: राज्यातच नव्हे तर देशभरात वाढते अपघात चिंतेची बाब आहे.  विविध आजारात व अपघातात रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. असे असताना देशात केवळ ३२६३ इतक्याच रक्तपेढ्या असल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.  मंत्री अश्विन कुमार यांनी दिलेल्या माहितीमध्ये देशभरात ३२६३ इतक्या रक्तपेढ्या कार्यरत असून त्यापैकी महाराष्ट्रात ३४० रक्तपेढ्या कार्यरत आहेत. देशातील ७१ जिल्ह्यांमध्ये आणि जिल्ह्यांच्या ठिकाणी ..