विचारविमर्श

लोकनायक, लोकशाही आणि संघ

 देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विरोधी विचाराची मंडळी संघावर वेगवेगळे विषय घेऊन आग पाखड करण्याचा प्रयत्न सतत करत असतात. दोन वेळा पूर्णतः व एकदा अंशतः संघाचा थेट गळा घोटण्याचा प्रयत्न झाला .पण संघ या सगळ्याला पुरून उरला एव्हढेच नव्हे तर प्रत्येक वेळी नवी झळाळी घेऊन बाहेर पडला.  मग संघावर वेगवेगळे आरोप करण्याचे सत्र सुरु राहिले. कधी गांधी हत्येचा आरोप,, तर कधी 42 च्या स्वातंत्र्य लढयात,संघाचा सहभाग नव्हता, कधी जातीयवादी ,भगवे आतंकवादी असे साम्यवादी पठडीतलें नवनवीन आरोप लादण्याचे ..

कोरोनाचे आर्थिक आव्हान !

  - रवींद्र दाणीएका राजदरबारातील एक घटना ! राज्यात मोठी चोरी झाली. तपासानंतर चोराला पकडून राजासमोर उभे करण्यात आले. चोराने चोरी कबूल केली. राजाने त्याला शिक्षा सुनावली. शिक्षेचे दोन पर्याय ठेवले. शंभर कांदे खाणे वा शंभर फटके ! चोराने विचार केला, शंभर फटके खाणे फार वेदनादायक होईल. चोराने शंभर कांदे खाण्याचा पर्याय निवडला. 10-15 कांदे खाल्ल्यावर चोर म्हणाला. नाही महाराज ! आता मला कांदे खाणे शक्य नाही. मला फटके मारा ! काही फटके खाल्ल्यावर चोर म्हणाला, महाराज ! फटके फार वेदनादायक ..

गुलामगिरीविरोधी आंदोलनाचे लोण पोहोचले युरोपमध्ये इंग्लंडमध्ये पुतळे पाडण्यास सुरुवात

 अमेरिकेतील मियामिपोलीस शहरात जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकी अमेरिकी नागरिकास त्याच्या किरकोळ गुन्हयाबाबत मानेवर गुडघा ठेवून ठार मारण्याच्या विरोधातील आंदोलन जगात पसरत चालले आहे. ‘कोविड 19’ चा प्रसार अधिक की हे आंदोलन मोठे असे वाटावे, एवढा त्याचा विस्तार होत आहे. त्याची इंग्लंडमध्ये जी प्रतिक्रिया उमटत आहे, त्याचा भारताशीही संबंध आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणून सोळाव्या शतकातील गुलामांचा व्यापारी आणि रॉयल आफ्रिकन कंपनीचे अधिकारी एडवर्ड कोल्स्टन यांचा पुतळा जमावाने पाडला व तो नाल्यात फेकून ..

श्रीलंकेचे भारताशी नवे संबंध

श्रीलंकेच्या नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विजयी झाल्यानंतर अगदी दोन आठवड्यांत परराष्ट्र दौरा आणि पहिल्या विदेश दौर्‍यासाठी भारताची केलेली निवड खूप काही सांगून जाणारी आहे. ..

अब्दुर रहमान यांच्या नौटंकीचा अन्वयार्थ!

खरंच कठीण आहे बुवा या देशाचं. इथल्या कथित पुरोगाम्यांचं. विशषेत: मुस्लिम समाजातील कथित धुरीणांचं. सत्तेत भाजपा आली की, लागलीच त्यांना इथे असुरक्षित काय वाटू लागते, आमीरखानच्या बायकोला इथे कायद्याचे राज्य उरले नसल्याचा साक्षात्कार काय होतो, शासकीय पुरस्कार परत करण्याची अहमहमिका काय सुरू होते, सारेच अफलातून आहे...

नागरिकता विधेयक : भ्रमच जास्त

या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या नागरिकता संशोधन विधेयकाचे (सीएबी िंकवा सिटीझनशिप अॅमेंडमेंट बिल) एकाच वाक्यात वर्णन करायचे झाल्यास हेतू शुद्ध असला तरीही सर्वाधिक गैरसमज निर्माण करणारे विधेयक असेच करावे लागेल. या विधेयकासंबंधी विविध नेत्यांच्या वक्तव्यांवरून भाजपा किंवा गृहमंत्री अमित शाह हा खटाटोप कशासाठी करीत आहेत, असा प्रश्न माझ्याही मनात निर्माण झाला होता...

तुझे आहे तुजपाशी, पण जागा चुकलाशी...!

आपले अनैतिक संबंध कसे नैतिक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी, अनैतिक कृत्य करणार्‍यांकडून वाटेल ते दाखले आणि वाटेल तो संदर्भ देऊन, तो कसा योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. वर्षानुवर्षे असेच चालत आले आहे. राज्यातील राजकारणातली परिस्थिती काहीशी अशीच झालेली दिसते. राजकीय अनैतिकतेचा कळस यावेळी गाठला गेला असल्याने, आपण केलेल्या अनैतिक कृत्यांवर पांघरुण घालण्याचा प्रकार आता, निवडणूकपूर्व करार पायदळी तुडवून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमवेत नव्या घरोब्याच्या आणाभाका घेणार्‍या शिवसेनेकडून केला जात ..

याला म्हणतात लोकसंख्येचा बोनस!

पुण्यात मुख्यालय असलेली बजाज फायनान्स नावाची शेअर बाजारात नोंद असलेली ही कंपनी सध्या चर्चेत आहे वस्तूंना मागणी नाही, अशी सर्वत्र स्थिती असताना या कंपनीला मागणीचा अजिबात प्रश्न नाही. अनेक कंपन्या मागणी आणि नफ्यासाठी धडपडत असताना या कंपनीने त्याचे नवनवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. या कंपनीने गेल्या काही वर्षांत किती झेप घेतली, हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच तिने ते ज्या मार्गाने हे साध्य केले आहे, ते अधिक महत्त्वाचे आहे. भारतीय नागरिकांना नेमके काय हवे आहे, हे शोधायचे असेल तर त्याकडे लक्ष दिले पाहिजे. ..

विचारधारेला तिलांजली!

विचारधारा सोडणार्‍यांची साथ भविष्यात जनताही सोडते, हेही लक्षात घेतले पाहिजे. कारण, विचारधारा हा राजकारणाचा आत्मा समजला जातो. ज्या राजकीय पक्षांचा निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे वा होतो आहे, त्यांनी आपली चूक कुठे होते आहे, हे नेमकेपणाने समजून घेणे गरजेचे आहे...

व्यावसायिकता व कार्यकर्तेपणा यांचा सुरेख समन्वय

   रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि १९९० पासून हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे बराच काळ अध्यक्षपद भूषविणार्‍या बाळकृष्ण पुरुषोत्तम तथा राजाभाऊ जोशी यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख.   काल रात्री राजाभाऊ जोशी गेल्याची बातमी आली. सात-आठ वर्षांपूर्वी त्यांच्यावर हृदयरोगासाठी शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून त्यांच्या हालचाली मंदावल्या होत्या. त्यांना कमी दिसू लागले होते. ते पुण्याला असल्यामुळे त्यांच्या भेटीगाठीही कमी झाल्या होत्या. अधूनमधून ..

आम्हाला पराक्रमाची भूक आहे...!!!

   चप्पा चप्पा खंडहर हो,गली गली शमशान हो,इतना बारुद उडा डालो,पूरा पाक कब्रिस्तान लगे।  या सर्व भावना सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या सामान्य माणसाच्या आहेत. तसा भारतीय माणूस वृत्तीने हिंसक नसतो. तो मुंगीलादेखील मारताना दहा वेळा विचार करील. परंतु, तोच जेव्हा सहनशीलतेच्या कडेलोटाच्या टोकाला पोहोचतो तेव्हा त्याचे तेज प्रकट होते. शंकराचा तिसरा नेत्र उघडला जातो. ती वेळ आता आलेली आहे. जनभावनांची दखल शासनाने घेतली पाहिजे. शांतीचे पाठ घरी ठेवले पाहिजेत. आता प्रवचन करायचेच झाले तर ते क्षात्रशक्तीच..

‘संगमी श्रोतेजन नाहती...’

महाराष्ट्राचं सांस्कृतिक पालनपोषण घडवण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या पुलं-गदिमा-बाबुजी या तिघांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर वाईसारख्या गावात होतो, यासाठी ‘त्रिवेणी साहित्य संगमा’चे आयोजक असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं अभिनंदन करणं गरजेचं ठरतं...