कोरोना योध्यांसाठी आनंदाची बातमी... मानधन तत्वावरील वैदकीय कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश !

    दिनांक : 13-Sep-2022
Total Views |
पुणे: कोरोना महामारीच्या जिवघेण्या साथीत महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयात मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या, नर्सेस आणि इतर काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आता पिंपरी-चिंचवड महापालिका कायमस्वरूपी सेवेत रुजू केल जाणार आहे.
 

yodha 
 
उच्च न्यायालयाने (High Court) दिलेल्या आदेशानुसार आणि राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील जवळपास 687 मानधन तत्वावरील वैदकीय कर्मचाऱ्यांना या मोठा फायदा होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मानधन तत्वावरील कामगारांबद्दल दिलेला निर्णय, हा यापुढे कत्राटी किंवा मानधन तत्वावरील कामगारांच्या न्यायालयीन लढ्यात एक अतिशय महत्त्वाचा माईल स्टोन निर्णय ठरेल, अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तसेच ज्येष्ठ कामगार नेते यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.