मनोरंजन

वयाच्या 95 व्या वर्षी अयोध्येत

‘रामायण’ हे भारतीय संस्कृतीतील महाकाव्य. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली ही रामकथा शतकानुशतके लोकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श राजा, उत्तम योध्दा, एकपत्नी, एकवचनी, एकबाणी असलेला राम हा खरोखरच एक आदर्श मानव होता...

‘तारक मेहता’...मधील बबिताजी यंदा बिग बॉसमध्ये

‘बिग बॉस’ या शोचा 14 वा सीझन लवकरच सुरु होणार असून त्यात यावर्षी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’या मालिकेतील बबिता जी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता यंदाच्या बिग बॉसमध्ये दिसणार आहे. आता यात कोणकोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार याची चर्चा सुरु झालीय. ..

‘वॉरिअर आजी’ला रितेशचा मदतीचा हात!

लॉकडाऊमध्ये अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. कारण अनेकांच्या नोकर्‍या गेल्यात तर कुणाचे व्यवसाय बंद झालेत, तर कुणाला वेतन कपातीचा फटका बसला. हातावर पोट असलेल्यांचे तर अधिक हाल आहेत. त्यामुळे पोट भरण्यासाठी रस्त्यावर कसरतीचे खेळ करणार्‍या ८५ वर्षीय शांताबाई पवार या आजीबाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अभिनेता रितेश देशमुखने त्यात तिच्या पत्त्यासह तिला मदत करण्याचे आवाहन केले आहे...

टेस्टी ‘रबड़ी गुलाबजाम’

आपल्यासाठी नेहमीच बनवण्याचे आणि खाण्याचे नवनवे प्रयोग करून आपल्यासमोर चांगल्या आणि टेस्टी रेसिपी आणत असतो. आजही एक झक्कास आणि टेस्टी रेसिपी आपल्यासाठी आणली आहे- ती आहे ‘रबड़ी गुलाबजाम’. हे बनवण्यासाठी वेळही कमी लागतो आणि गुलाबजाम पण टेस्टी होतात...

अजय देवगनच्या ‘भूज’ मधील सोनाक्षीचा दमदार लूक !

अजय देवगनच्या ‘भूज: द प्राईड ऑफ इंडिया’ बद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमातील सोनाक्षी सिन्हाचा फर्स्ट लूक पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. परंतु, लॉकडाऊनमुळे त्याचे रिलीज पुढे ढकले असून निर्मात्यांनी सिनेमा ओटीटी फ्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय. आता तो डिजनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल. ‘भूज’ सिनेमातील अजय देवगन आणि संजय दत्त यांचा लूक यापूर्वी रिलीज करण्यात आला होता. आता सोनाक्षी सिन्हाचा लूक समोर आलाय...

ज्ञानयज्ञाला लागले कोरोनाचे ‘ग्रहण’

शिक्षणाला वयाची मर्यादा नसते असे म्हटले जाते, ते खरे आहे. कारण असाच एक अनुभव ठाणे जिल्ह्यातील फांगणे या गावात दिसून येतो. येथे आहे चक्क ‘आजीबाईची शाळा’. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी योगेंद्र बांगर यानी अत्यंत परिश्रम घेतले आहे. जगभरात तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, सध्या डिजीटल युगाकडे वाटचाल सुरू आहे. योगेंद्र बांगर यांनी कुठल्याही कारणांमुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या, तसेच शिक्षण घेता न आलेल्या आजीबाईंना साक्षर करण्याचा विडा उचलला. मोतीराम गणपत दलाल ट्रस्टचे दिलीप दलाल यांच्या सहकार्याने ..

गरिमा यादव...ब्युटी क्वीन ते लेफ्टनंट

हरियाणाची रहिवासी असलेली गरिमा यादव.. तशी कॉलेज स्टुडंट...दिसायला अत्यंत सुंदर म्हणून सहजच सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला....त्यात विजयी झाली... मग पुढच्या... अजून पुढच्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेत गेली अन् प्रत्येक स्पर्धेत विजयी होत गेली.... आता तिला इटलीला आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायला जायची संधी मिळाली होती.... जय्यत तयारी सुरू होती.... अन्..... नेमकी त्याच दरम्यान सीडीएस परीक्षा होती. ..

‘मास्क’ला हिंदीत काय म्हणतात?

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे यातून बचावासाठी सध्या सर्वजण मास्क आणि सॅनेटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, मास्कला हिंदीमध्ये काय म्हणतात? माहित नसेल तरी काळजीचं कारण नाही. कारण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मास्कचं हिंदी भाषांतर शोधून काढलं आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात...

रिंकूचे चाहते म्हणतात... ‘रिंकू, तुला आमचा फुल्ल सपोर्ट’!

‘सैराट’च्या घवघवीत यशानंतर रिंकू राजगुरू या छोट्या शहरातून आलेल्या अभिनेत्रीने मागे वळून पाहिलेच नाही. ती वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, मालिका करून तिचं अभिनय कौशल्य दाखवत आहे. मात्र रिंकूची विशेष चर्चा होते ती तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर! सैराटमधून पदार्पण केलेली रिंकू आणि आता इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो पोस्ट करणारी रिंकू यामध्ये बराच फरक आहे. तिचे इन्स्टाग्रामवरील सेल्फी, बोल्ड अंदाजातील फोटो, लॉकडाऊनमध्ये शूट केलेले व्हिडीओ यामुळे रिंकू कायम चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती इन्स्टाग्रामवर ..

सुशांतचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार मित्र

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अचानक एक्झिटमुळे त्याचा जिवलग मित्र संदीप सिंह याला मोठा धक्का बसला असून त्या पार्श्वभूमीवर संदीपने सुशांतचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘वंदे भारतम’हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संदीप या चित्रपटातून सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. ..

अभिनेता राणा दग्गुबातीच्या भावी पत्नीने मास्कसह केले प्री-वेडिंग फोटोशूट...

ब्लॉगबस्टर चित्रपट ‘बाहुबली’मधील भल्लाल देव ही भूमिका साकारून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलेला साऊथचा अभिनेता राणा दग्गुबाती लवकरच विवाहबंधनात अडकणार असून मिहीका बजाजसोबत तो लग्नगाठ बांधेल. कोरोना व्हायरसच्या सावटामुळे अनेक कलाकारांनी आपले लग्न पुढे ढकलले आहे. मात्र दग्गुबाती आणि मिहीकाने साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन लग्न उरकायचेच ठरवले आहे. ..

अंतरा मेहता : महाराष्ट्राची पहिली महिला फायटर पायलट!

सर्वत्र कोरोनाचे संकट पसरलेले असताना अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर दुसरीकडे या संकटकाळात आपल्यासमोर नागपुरातून एक चांगली बातमीही आली आहे. महाराष्ट्राला पहिली महिला लढाऊ वैमानिक मिळाल्याची. त्यांचे नाव आहे अंतरा मेहता. नागपूरच्या अंतरा यांची भारतीय हवाई दलात ‘फायटर पायलट अर्थात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झालीय. या पदावर गेलेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला आहेत. ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून निवड झालेल्या या वर्षीच्या तुकडीतील देशातील त्या एकमेव महिला अधिकारी आहेत. ..

‘महाभारत’मधील इंद्रदेव आता राहतोय वृद्धाश्रमात !

सध्या लॉकडाऊन असल्याने दूरदर्शनवर बी.आर. चोपडा यांच्या महामेगा ‘महाभारत’ सिरियलचे पुन्हा प्रसारण करण्यात येत असून या ऐतिहासिक सिरियलमध्ये काम करणारे सर्वच कलाकार यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. आज अशाच एका पात्राबद्दल म्हणेजच सतीश कौलबद्दल जाणून घेऊया... हे तेच सतीश कौल आहेत जे पंजाबी चित्रपटातील अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जातात...

‘आर्या आंबेकर’चे रूप फॅन्सना पाडतेय प्रेमात...

आर्या ही गायनासोबतच अभिनयामध्येही चमकणारी कलावंत गायिका.तिचे नाव घेताच आपल्यासमोर येतेय ते तिचे सुमधूर गायन आणि आकर्षून घेणारे सौंदर्य. आर्या आपल्या या कलागुणांमुळे प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. आजपर्यंत आर्याने अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स् तसेच मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांसाठीसुध्दा गाणी गायिली आहेत.आर्या नेहमीच आपल्या फॅन्समुळे चर्चेत असते. ती वेगवेगळ्या स्टाईलमधील फोटो शेअर करते. याचप्रकारे आर्याने नुकतेच तिच्या दिलखेचक रूपातील साडीवर काढलेले फोटो सोशल मीडियावर ..

अभिषेक बच्चन दिसणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर

सध्या अभिषेक बच्चन वेब सीरीज ‘ब्रीथः इन टू द शॅडोज’मधून डिजिटल प्लॅटफार्मवर येण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्या या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये अभिषेक बच्चन अत्यंत इंटेंस लूकमध्ये दिसेल. या वेब सिरीजमध्ये अमित साध पुन्हा एकदा सीनियर इन्स्पेक्टर कबीर सावंतच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत. 10 जुलैला ही सिरीज रिलीज होणार असून यात नित्या मेनन आणि सयामी खेरसुध्दा एका वेगळ्या अंदाजात दिसतील. ..

अभिनेता सौरभ गोखलेची पत्नी आहे उत्तम अभिनेत्री

Is-an-excellent-actress..

मुस्लीम बांधवाने बनविली स्पर्श न करता वाजणारी घंटा

कोरोनाचे संकट, त्यापासून बचाव होण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, कोणत्याही बाहेरच्या वस्तूंना स्पर्श न करणे यासारखे अनेक उपाय पाळणे नागरिकांना भाग पडले आहे. अनलॉक वन मध्ये 8 जूनपासून अनेक राज्यात धार्मिक स्थळे खुली केली गेली असली तरी तेथेही हे नियम पाळणे बंधनकारक आहेच. मंदिरात जाऊन घंटा वाजवायची नाही हे थोडे विचित्रच. त्यावर स्पर्श न करता वाजणारी घंटा मध्यप्रदेशात पशुपतीनाथ मंदिरात बसविली गेली आहे..

बॉलिवूडचा ‘तारा’ निखळला, सुशांतसिंह राजपूतला चाहत्यांची श्रद्धांजली...

चार दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सलियानने मुंबईतील एका इमारतीच्या 12 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर 14 जून सुशांतनेही राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे . 34 वर्षांच्या सुशांत फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. छोटा पडदा ते चित्रपट हा सुशांतचा प्रवास अविश्वनिय होता. दिशा आपल्या होणार्‍या नवर्‍यासोबत मालाडच्या एका 14 मजली इमारतीमध्ये राहत होती. तिने आत्महत्या केल्यानंतर ..

आलियाच्या ‘गंगुबाई’चे लवकरच शूटिंग

देशात 30 जनूपर्यत लॉकडाऊन असून यात चित्रपटांना शूटिंग करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यात आता आलिया भट्टचा ’गंगुबाई काठियावाडी’ बहुचर्चित चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. यातील आलिया भट्टचा फर्स्ट लुक सर्वांनाच भावला आहे. तिच्या या नव्या लुकची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे...

कोल्हापुरी साज आणि चपलांमध्ये खुलले हिरकणीचे सौंदर्य

मराठी चित्रपटसृष्टीची हिरकणी सोनाली कुलकर्णी हिने आपल्या अभिनय, सौंदर्याच्या जोरावर अनेकांवर मोहिनी घातली आहे. यामुळे महाराष्ट्रात तिने स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सोनाली कुलकर्णी हिचा ‘अप्सरा आली’ या गाण्यावर अप्रतिम नृत्य आजही लोकांच्या स्मरणात आहे. नितळ त्वचा, निळे डोळे, कमनीय बांधा अशी सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीने नुकताच आपल्या कोल्हापुरी साजश्रृंगारातील फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. कोणालाही घायाळ करेल असा सोनालीचा कोल्हापुरी साज आणि चप्पल घातलेला लूक सध्या सोशल ..

कपिलदेवकन्या अमिया बॉलिवूडमध्ये

भारताला पहिलावाहिला वन डे विश्वचषक जिंकून देणारा टीम इंडियाचा माजी कप्तान कपिल देव याच्या या पराक्रमावर आधारित 83 नावाचा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार असतानाचा आणखी एक खास बातमी आली आहे. भारताच्या ऐतिहासिक विजयावर कबीर खान यांनी बनविलेल्या या चित्रपटातून कपिलदेव कन्या अमिया हिची बॉलीवूड एन्ट्री झाली आहे. अर्थात अमिया रुपेरी पडद्यावर दिसणार नाही तर तिने कबीर खान यांची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे. ..

आता अमिताभ बच्चन सांगणार गुगल मॅपवर मार्ग

बॉलिवूडचे महानायक म्हणून भारतात प्रसिद्ध असणारे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. भारतात तर त्यांचा एक प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे जो अक्षरशः त्यांच्या प्रेमातच आहे. अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयासोबत भारदस्त आवाजासाठी देखील प्रसिद्ध आहेत. वयाची पंचाहत्तरी ओलांडूनही त्यांनी अनेक आव्हानात्मक भूमिका निभावल्या आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दरवेळी वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका केल्या आहेत. आता ते त्यांच्या भारदस्त आवाजात नेटकर्‍यांना गुगल मॅपवरून पत्ता शोधायला मदत करणार आहेत. ..

केरळमधील मंदिराचे रक्षण करते शाकाहारी मगर - बबियाला !

असे म्हणतात की, भारत हा अशक्यप्राय आणि दुर्मीळ घटनांचा देश आहे. प्राचीन उपखंडात अनेक विचित्र आणि रहस्यमय घटना, प्रथा पाहायला किंवा ऐकायला मिळतात. दरम्यान, केरळच्या सुंदर बॅकवॉटर प्रदेशातून फिरताना जेव्हा याबद्दल माहिती मिळाली तेव्हा मन भरून आले . कारण आपण जगातील सर्वात क्रूर, मांसाहार करणारा प्राणी शाकाहारी आहारावर टिकून राहण्याची कल्पना तरी करू शकतो का ? विशेष म्हणजे, ते या मंदिराचे संरक्षणही करतात..

जळगावच्या 35 विद्यार्थ्यांनी उभारला ‘पानिपत’मधील ‘शनिवारवाडा’

विख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या सोबत अनेक दिग्गज आणि वरिष्ठ अनुभवी काम करत असतात. अशा मोठ्या व्यक्तींसोबत साह्य करण्यासाठी मुुंबई पुण्यातील अनेक विद्यार्थी वाट पाहत असतात. परंतु ‘पानिपत’ या चित्रपटातील शनिवारवाड्याचा सेट उभारण्यााठी त्यांनी जळगावच्या एनएफआयडीच्या विद्यार्थ्यांना संधी दिली...

तान्हाजी चित्रपटाचा मराठी ट्रेलर प्रदर्शित

शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ मावळे तानाजी मालुसरे यांच्या चरित्रावर आधारित अभिनेता अजय देवगणचा 'तान्हाजी - द अनसंग वारियर' या चित्रपटाचा हिंदीतील ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा मराठी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ..

जागतिकीकरणाच्या युगात स्वयंजाणीव जागृत करणारा 'निर्बान' चित्रपट

गोव्यात सुरु असलेल्या 50 व्या इफ्फीच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते बंगाली दिग्दर्शक गौतम हलदर यांची पत्रकार परिषद झाली. या महोत्सवात दाखवण्यात आलेल्या ‘निर्बान’ या बंगाली चित्रपटाच्या कथानकाविषयी त्यांनी माहिती दिली. ..

‘क्रोनोलॉजी’ हा चित्रपट पुरुष सत्ताक समाजातल्या महिलांच्या व्यथा मांडणारा चित्रपट

‘क्रोनोलॉजी’ हा चित्रपट महिलांवरच्या दडपशाही विरुद्ध आवाज उठवणारा आणि पुरुष सत्ताक समाजातल्या महिलांच्या व्यथा मांडणारा चित्रपट आहे. महिलांना ज्या ज्या अत्याचाराला सामोरे जावे लागते, त्या सगळ्यांविरुद्ध या चित्रपटातून निषेध नोंदवला आहे, असे चित्रपटाचे दिग्दर्शक अली आयदिन यांनी सांगितले. ..

सलमानला ‘लवयात्री’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. हे प्रकरण त्याची निर्मिती असणाऱ्या ‘लवयात्री’ चित्रपटाशी संबंधित आहे. ‘लवयात्री’ या चित्रपटाविरोधात गेले वर्षभर कोर्टात खटला सुरु होता. सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल देताना या चित्रपटाचे नाव, यातील गाणी व दृश्य यासंबंधी आता कोणालाही एफआयआर नोंदवता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. ..

राज्यस्थरीय तेली सामाज मेळाव्यात 1905 वधुवरांनी दिला परिचय

 ळाव्याचे उद्घाटन आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरण्गाव चे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक सुरेश चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे नगरसेवक राजेंद्र चौधरी युवराज करंकाळ जिवन चौधरी माजी महापौर विष्णू भंगाळे नामदेव चौधरी विजय चौधरी नगरसेवीका ज्योती तायडे मंगला चौधरी शोभा चौधरी निर्मला चौधरी सुनंदा चौधरी भगवान चौधरी रामचंद्र चौधरी संतोष चौधरी भगवान चौधरी संजय चौधरी के डी चौधरी डॉ मनिलाल चौधरी नंदू चौधरी सुरज चौधरी सुरज चौधरी अभिमन्यू चौधरी जे बी चौधरी आदी ..

'नोटबुक' चित्रपटाच्या निर्मात्यांकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांना २२ लाख रुपयाची मदत

'नोटबुक' चित्रपटाच्या निर्मात्यांकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांना २२ लाख रुपयाची मदत ..

पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी

   काश्मीरच्या पुलवामा मध्ये झालेल्या हल्ल्याचे परिणाम आता पाकिस्तानी कलाकारांवर होत आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA)ने चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकार व आर्टिस्टला भारतात काम करण्यास बंदी आणली आहे.  पाकिस्तानी कलाकारांवर बंदीची घोषणा करतो आहे. तरीदेखील जर कोणी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यासाठी जोर देत असेल तर असोसिएशनद्वारे त्यांच्यावर देखील बंदी आणली जाईल. त्यासोबत त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सर्वात आधी देश येतो आणि आम्ही देशाच्या बाजूने ..

विक्रांतचा डाव त्याच्यावरच उलटणार?

मुंबई : ‘तुला पाहते रे’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. विक्रांत आणि इशाच्या लग्नानंतर मालिकेने एक नवे वळण घेतले आहे. मालिकेतील विक्रांत सरंजामेचे खरे रुप नुकतेच प्रेक्षकांसमोर आले. विक्रांतचे इशावर खरे प्रेम नस..

‘रॉकी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

‘रॉकी’ सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रॉकी’ सिनेमाच्या निमित्ताने एक चांगला अॅक्शनपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘रॉकी’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत कोण आहे? याची अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना उत्सुकता होती. पिळदार शरीरयष्टी असलेला हा अभिनेता कोण?..