अधिवेशनात गुलाबराव पाटलांचे आक्रमक भाषण; ‘आम्ही बंड नाही तर…उठाव केलाय'
मुंबई : आम्ही बंड केला नसून उठाव केला आहे. एकनाथ शिंदे सुरतला गेले होते, ते गेल्यानंतर आम्ही २० आमदार होतो, साहेबांकडे गेलो होतो. 'असं असं शिंदे साहेब म्हणत आहे. त्यांचं ऐकून तरी घ्या', त्यावेळी तुम्हाला जायचं जायचं तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण असं होत नाही, असा खुलासाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी केला. तसंच, 'या चार कोंडाळ्यांनी आमच्या उद्धव ठाकरेंना बावळट केलं, त्यांची लायकी नाही, निवडून येण्याची, आमच्या मतावर ते खासदार होत आहे, महिलांना वेश्या म्हणता, हे कोण सहन करणार आहे, ..