शैक्षणिक

प्रत्यक्ष कृतीवर लक्ष केंद्रित करा -प्रमोद अत्तरदे

जळगाव : यशस्वी व्हायचे असेल तर स्वत:ला प्रश्‍न विचारा आणि नवनविन गोष्टी आत्मसात करण्याचा हव्यास विद्यार्थ्यांमध्ये असायला हवा असे प्रतिपादन अमेरिकेतील न्यूजर्सीतील उद्योजक प्रमोद अत्‍तरदे यांनी केले...

काय ? अल्पवयीन मुलाचे पॅनकार्ड बनवायचे आहे ! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही आज अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. ओळख पटवण्यासाठी आधार कार्डला अधिकृत मान्यता आहे. ..

एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये पदवीधरांना नावनोंदणी अनिवार्य नाही

देशभरातील जिल्ह्यांतील एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये पदवीधरांना नोंदणी करणे अनिवार्य करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही.रोजगाराशी संबंधित सेवांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने देशभरातील एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नोंदणी ऐच्छिक आहे...

'परीक्षा पे चर्चा 2022' या कार्यक्रमात सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाविषयी ट्वीट केले असून, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. या कार्यक्रमात आपल्याला देशातील ऊर्जावान युवकांशी संवाद साधण्याची, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यांच्या आकांक्षा समजून घेण्याची संधी मिळते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे...

रोजगार-व्यवसाय आणि व्यक्तिमत्त्व विकास

नोकरी असो वा व्यवसाय, व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यावर निश्चितपणे प्रभाव पडतो. अनेकांचे तर यशापयश त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. त्यासाठी अर्थातच आवश्यक असते ते व्यक्तिमत्त्व व्यवस्थापन व त्याचा विकास. हे काम कठीण असले तरी अशक्य मात्र नसते...

अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट : विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पाऊल!

भारतात 1986 नंतर पहिल्यांदाच शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरण (NEP) मध्ये प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत बरेच बदल केले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शिक्षण धोरणाच्या एक वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्‍वभूमीवर विविध नाविन्यपूर्ण योजनांची घोषणा केली, त्यातीलच एक योजना म्हणजे "अकॅडमिक बँक क्रेडिट (ABC)"...

११ वीच्या विद्यार्थांना दिलासा...सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र नसल्याने इयत्ता अकरावीत प्रवेश घेताना अडचण येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करून तात्पुरता प्रवेश घेण्याची सोय करण्यात आली आहे. स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही,अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अडचण येऊ नये यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर ..

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; अशी तपासा Merit List

पुणे : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर झाली. अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातील तब्बल 3 लाख 20 हजार 710 जागांसाठी 2 लाख 37 हजार 383 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. यातील अवघ्या 2 लाख 2 हजार 58 विद्यार्थ्यांनी कॉलेज पसंतीचे पर्याय भरले होते. शिक्षण संचालनालयाकडून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात असलेल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे...

10 वी आणि 12 वीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 10 वी फेरपरीक्षा 22 सप्टेंबरपासून तर 12 वी फेरपरीक्षा 16 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मुख्य परीक्षेत नापास, एटीकेटींसाठी फेरपरीक्षा होणार आहे. याचे शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे...

स्वयंप्रेरणा कौशल्यातून सफलता!

ती म्हणाली, मला माझ्या आयुष्यातून सुटका हवी होती- विजेच्या कमतरतेपासून, झोपताना रोज-रोज चावणार्‍या व आमच्या कानात गुरगुरणार्‍या डासांपासून, पोटभर जेवण न देऊ शकणार्‍या जीवनापासून ते पाऊस पडल्यावर घराला पूर येताना पाहण्यापर्यंत. तिची आई मोलकरीण व तिचे वडील गाडी खेचणारे मजूर होते. घराजवळ एक हॉकी अकॅडमी होती. ती खेळ पाहण्यात तासन्तास घालवायची. तिला खेळायची तळमळ होती. गरिबीतून बाहेर पडण्याचा मार्ग त्यातून मिळेल, असे तिला वाटत होते. दिवसाला 80 रुपये कमावणार्‍या वडिलांना, तिला हॉकी-स्टिक खरेदी करून देणे ..

नेट परीक्षा 6 ते 11 ऑक्टोबरदरम्यान

नवी दिल्ली : राष्ट्रीय चाचणी संस्थेने नेट परीक्षेची तारीख आज बुधवारी जाहीर केली असून, ही परीक्षा 6 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. कोरोनामुळे डिसेंबर 2020 सत्राच्या परीक्षा आयोजित करण्यात आणि जून 2021 च्या अर्जाच्या प्रक्रियेत विलंब झाला. त्यामुळे दोन्ही सत्रांच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यात येत आहेत. ..

यंदा निकालानंतरच्या पुनर्मूल्यांकनाची कोणतीही प्रक्रिया नाही

मुंबई : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. निकाल दहावी, अकरावीचे वार्षिक परीक्षेतील गुण आणि बारावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आला. परिणामी यंदा बारावी निकालानंतर गुणपडताळणी, छायाप्रती, पुनर्मूल्यांकन अशी कोणतीही प्रक्रिया होणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखवल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकन या सुविधा यंदा उपलब्ध नसतील. ..

GATE परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : GATE २०२२ चे पूर्ण वेळापत्रक जाहीर झाले असून यानुसार ३० ऑगस्ट २०२१ पासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होणार आहे. तर २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे. ग्रॅज्युएट ॲप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंगची परीक्षा IIT सहित इतर मोठ्या इंजिनीअरिंग संस्थांमध्ये एमटेक आणि पीएचडी कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी महत्वाची असते. सरकारी स्कॉलरशिप आणि अप्रेंटिसशिप्सच्या पात्रतेसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. अनेक सरकारी नोकऱ्या देखील गेटमधील गुणांच्या ..