रशियाच्या हल्ल्यात 13 युक्रेनी नागरिक ठार

    दिनांक : 10-Aug-2022
Total Views |
 

rassia 
 
 
 
कीव :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनला 1 अब्ज डॉलरची लष्करी मदत जाहीर केल्यानंतर रशियाने मध्य युक्रेनवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात नागरिकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. रशियन हल्ल्यात किमान 13 नागरिक ठार झाले आहेत," वृत्तसंस्था एफपीने निप्रॉपेट्रोस्क प्रदेशाच्या गव्हर्नरच्या हवाल्याने म्हटले आहे. प्रत्यक्षात अमेरिकेने युक्रेनला अधिक लष्करी मदत जाहीर केली होती. रॉकेट, दारुगोळा आणि इतर शस्त्रांचा सर्वात मोठा पुरवठा अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून थेट युक्रेनच्या सशस्त्र दलांना दिला जाईल.