अग्रलेख

न ‘कचर’ता...

वो आदमी नही मुक्कमल बयान हैं; झोलें मे उसके एक नया संविधान हैं... हिंदीतले कालजयी कवी दुष्यंतकुमार यांनी त्या काळात असे जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल म्हटले होते. संविधानचा अर्थ श्लेषात्मक घ्यावा, म्हणजे एका नव्या जगाची, नव्या भारताची संकल्पना त्यांच्याकडे आहे, असे दुष्यंतकुमारांना म्हणायचे होते. नेमके तेच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत म्हणता येते. सुनियोजित, नेमके आणि दृढनिश्चयी, डोळस अशी त्यांची प्रत्येक कृती असते. त्यांनी, त्यांना देश कसा घडवायचा आहे, त्याची नीट योजना आखली आहे ..

अभिव्यक्ती आणि नियंत्रणाचेही तारतम्य...

अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या संदर्भात नियमित चर्चा झडावी, असे काहीतरी होत असते. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये, या मताचे सगळेच असतात. मात्र, याबाबत ‘आपला तो बाब्या अन्‌ दुसर्‍याचा तो बंड्या,’ असेच भूमिकांचे ध्रुवीकरण सोयिस्कर रीत्या केले जात असते. आमची ती निकोप अभिव्यक्ती आणि दुसर्‍याने केले तर ते चारित्र्यहनन असते. आताचा मुद्दा मात्र एकदम अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीवर नेण्यासारखा अजिबातच नाही. इतके मात्र नक्की की, अभिव्यक्त होताना तारतम्य ठेवलेच पाहिजे, तसेच त्यावर नियंत्रण ठेवतानाही ..

अटींशिवाय भारताचे अर्थसाह्य...

2016 मध्ये भारत आणि मॉरिशस दरम्यान 35.30 कोटी डॉलर्सचे (2500 कोटी रुपये) विशेष आर्थिक पॅकेज देण्याबाबत जो करार झाला, त्यांतर्गत मॉरिशस देशात भारत पाच पायाभूत संरचनांच्या उभारणीस अर्थसाह्य करणार होता. त्यापैकी एक म्हणजे मॉरिशसच्या सर्वोच्च न्यायालयाची इमारत. या देखण्या इमारतीचे गुरुवारी आभासी माध्यमातून उद्घाटन झाले. त्या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विकासात्मक कामांना सहकार्य करताना भारत कुठल्याही उघड-गुप्त अटी घालत नाही. विकासात्मक सहकार्यात भागीदारांचा सन्मान राखणे, या अत्यंत ..

राजकारण कलुषित करताहेत राहुल!

कॉंग्रेसचे माजी अपयशी अध्यक्ष राहुल गांधी चीनचे नागरिक आहेत की भारताचे, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. भारत-चीन सीमेवर ज्या प्रकारचा तणाव सध्या अनुभवास येत आहे, त्या पृष्ठभूमीवर राहुल गांधी यांच्याकडून येत असलेली वक्तव्ये लक्षात घेता, त्यांना स्वदेशापेक्षा चीनवरच जास्त भरवसा असल्याचे दिसते आहे...

पुराचे गंभीर संकट...

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, देशाच्या काही भागातील पूरस्थितीच्या बातम्या पाहायला आणि वाचायला मिळतात. ‘नेमेचि येतो पावसाळा’प्रमाणे ‘दरवर्षीच येतो पूर,’ असे म्हटले तर ते चूक ठरू नये. देशाच्या अनेक भागाला दरवर्षीच पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो, पण त्यातही आसाम आणि बिहार या दोन राज्यांतील पूरस्थिती नेहमीच अतिशय गंभीर असते. शेकडो लोकांचा यात बळी जातो, तर लाखो नाही, तर कोट्यवधी लोकांना पूरस्थितीचा फटका बसत असतो. यातून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होते, हा आणखी वेगळा भाग. या वर्षीपण आसाम आणि बिहारमधील ..

तो तुझा प्रवेश संपला...

हे जग एक रंगभूमी आहे आणि आपण सारे त्यावरचे काम करणारे नट आहोत. आमची भूमिका संपली की, आम्हाला एक्झिट घ्यावीच लागते. प्रख्यात नाटककार शेक्सपिअर यांचं हे तितकंच माहिती असलेलं वाक्य आहे. ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ चित्रपटात हे वाक्य थोडं फिल्मी करून वापरलं होतं- ‘‘कौन, कब और कैसे मरेगा... कोई नही जानता!’’ नटाने त्याचा प्रवेश संपला की रंग पुसून बाजूला व्हायचे असते. आता कोरोनामुळे सार्‍या जगाला प्रत्येक वेळ मृत्यूचीच िंचतने सुचत आहेत. मृत्यूच्या विचारछायेत सगळेच वावरत असतानाच्या काळात काळजी घेणे, सावधता ..

अविश्वसनीय ड्रॅगन!

गलवान खोऱ्यातून सैन्य माघारी घेऊन चीनने भारतापुढे गुडघे टेकले, असा निष्कर्ष काढण्याची शाई वाळते न वाळते तोच चीनने सीमेवर ४० हजार सैनिक तैनात करून भारताविरुद्ध पुन्हा एकदा षड्डू ठोकले आहेत. गलवान प्रकरणात भारताने मुत्सद्दीक पातळीवरही यश मिळविले होते. एकीकडे आपल्या सैनिकांनी प्रत्यक्ष रणांगणावर शौर्य गाजविले आणि दुसरीकडे भारतीय मुत्सद्यांनी चर्चेच्या टेबलावर योग्य भूमिका मांडल्याने चीनला रक्तरंजित संघर्षानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करायची तयारी दर्शवावी लागली होती. पण, चीन कुठल्याही भूमिकेबाबत ..

एका ऐतिहासिक स्वप्नाची पूर्तता

5 ऑगस्टची नोंद देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली जाईल, यात आता शंका उरली नाही. यावर्षी 5 ऑगस्टला अयोध्येत राममंदिराच्या निर्माण कार्याचे भूमिपूजन होत आहे. या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मोदी यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एक इतिहास घडणार आहे. याआधी गतवर्षी 5 ऑगस्टला जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 370 तसेच 35 ए कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय संसदेने घेतला होता. ..

दु:ख कशाचे? आनंदच!

60 गंभीर गुन्हे नावावर असलेला, आठ पोलिसांना ठार करणारा गुंड विकास दुबे मारला गेला! त्याने 8 पोलिसांना मारले आणि पोलिसांनी त्याचा बदला घेतला. बस्स. एवढीच बातमी आहे आणि ती तेवढीच हवी. आता त्याला फाटे फोडणारे फोडत बसतील. आम्ही मात्र कुठल्याही संशयाला थारा देता कामा नये. याची अनेक कारणे आहेत. किती म्हणून सांगायची?..

‘फेअर’चे ‘अफेअर!’

 कधी माणसांना आवश्यक... अत्यावश्यकच वस्तूंची निर्मिती हव्या त्या प्रमाणात केली जात असे. म्हणजे वस्तूंमध्ये काही स्पर्धा नव्हती. त्यामुळे जाहिरातही नव्हती. माणसाचे जग विस्तारत गेले म्हणजे त्याच्या गरजांचाही विस्तार झाला. गरजा भागविण्यासाठी मग तो गावाबाहेर पडला. कारण, गाव त्याच्या गरजा भागविण्यास अपुरे पडू लागले. उद्योग सुरू झाले आणि मग त्यात माणसाला नको असलेल्या वस्तू भरमसाट प्रमाणात निर्माण केल्या जाऊ लागल्या. वस्तूंमध्येच स्पर्धा लागली. त्यातून मग जाहिराती निर्माण झाल्या. गरजांना वस्तू ते वस्तूंसाठी ..

बहिष्कारास्त्राचे जाणते पाऊल!

 नदीचा उगम एका झर्‍यातून होतो. या छोट्याशा झर्‍याकडे पाहिले, तर तो पुढे छोट्या नाल्यात आणि त्याहीपुढे नदीत परिवर्तित होईल, असे जाणवत नाही. पण, प्रत्यक्षात तसे होते आणि हीच नदी पुढे महानदी होऊन समुद्राला जाऊन मिळते. जसे नदीच्या बाबतीत तसेच ते आंदोलनाच्या बाबतीतही खरे आहे. रामजन्मभूमीचे आंदोलन घ्या. प्रारंभी घंटानादाने झालेली आंदोलनाची लहानशी सुरुवात पुढे गंगापूजन, श्रीरामशिलापूजन, रथयात्रा आणि अखेरीस कारसेवेच्या महाआंदोलनापर्यंत गेली. आणि यानंतरच्या न्यायालयीन लढ्यामुळे श्रीरामजन्मभूमीवर ..

चीनची दर्पोक्ती आणि भारताचा इशारा!

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आवश्यकता पडली तर शस्त्र चालवण्याची मोकळीक भारताने आपल्या लष्कराला दिल्यानंतर, चीनचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच असे काही केले तर भारताला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा चीनने ग्लोबल टाइम्स या आपल्या मुखपत्रातून दिला आहे. लडाखमधील गलवान खोर्‍यातील भारत आणि चीन यांच्यातील झटापटीच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या लष्कराला गोळी चालवण्याच्या दिलेल्या पूर्ण स्वातंत्र्यामुळे चीनची पाचावर धारण बसल्याचे या धमकीतून दिसते आहे. हातात शस्त्र नसताना भारतीय जवानांनी दिलेल्या ..

भाषा : मोदींची आणि कॉंग्रेसची...

भाषा साडेबारा मैलांवर बदलते, असे म्हणतात. वास्तवात ती माणसागणिक बदलते, असाच अनुभव आहे. त्याचा वेश, परिवेश, वाट्याला आलेले जगणे आणि त्याच्यावरचे भाषिक संस्कार यावरून भाषा बदलत जाते. त्यामुळे भाषा समजून घ्यायची असेल, तर माणसे समजून घेण्याची गरज असते. ..

कुरकुरणार्‍या खाटेवरील वाघ !

सरकारमध्ये सहभागी असतानाही धोरणात्मक निर्णय घेताना आम्हाला विचारात घेतले जात नाही, अशी जाहीर नाराजी व्यक्त करणारे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतात आणि बाहेर येऊन सांगतात की, मुख्यमंत्र्यांबाबत आमची नाराजीच नव्हती. काही विषय समोरासमोर चर्चेचे असतात आणि म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. जनतेचे काही प्रश्न आम्ही मांडले आणि आमचे समाधान झाले. काँग्रेसच्या नेत्यांचे हे घूमजाव किंवा ही सारवासारव, सध्या सरकारचे पालखीचे भोई बनलेल्या काही पत्रकारांना पटली असली, तरी ..

चीनविरुद्ध अर्थयुद्धच हवे!

‘नव्या युगाची नवी अस्त्रे, शत्रुशी लढण्या अर्थशस्त्रे...’ हा नवा नारा आता सर्वत्र लावला जातो आहे. विकसित देश अण्वस्त्रसंपन्न झाल्याने आणि अण्वस्त्रांचे तसेच युद्धाचे दुष्परिणाम जग जाणून चुकल्याने, आता प्रत्यक्ष युद्ध करण्यासाठी सारेच कचरू लागले आहेत. कसेही करून युद्ध टाळून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याकडे जगाचा कल दिसत आहे. तरीदेखील शेजारी देशच नव्हे, तर त्यांचे मित्रदेशसुद्धा एकमेकांवर गुरकावत असतात, एकाचा राग दुसर्‍यावर काढत असतात. प्रसंगी याचा भडका उडतो आणि मग दोन्हीकडच्या सैन्यांना एकमेकांसमोर ..

आपण नक्कीच जिंकू!

कोरोना नावाचा एक अतिसूक्ष्म विषाणू, मात्र त्याने सार्‍या भारतातच नव्हे, तर जगात हलकल्लोळ माजवून ठेवला आहे. चीनमध्ये 2019 सालच्या डिसेंबर महिन्यापासून पसरलेल्या या विषाणूने प्रत्यक्षात 2020 सालच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून जगातही पाय पसरणे सुरू केले होते. भारतातही त्याने आधी चोरपावलाने प्रवेश केला आणि नंतर मात्र तो शिरजोर झाला. त्याला जास्त शिरजोर होता येऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आणि तो जाहीरही केला. कधी नव्हे ते विमानांपासून रेल्वेपर्यंतची संपूर्ण वाहतूक ..

हीच निर्णायक वेळ!

सीमेवरील तणाव हा चीनने वाढविला आहे. जाणीवपूर्वक वाढविला आहे. सोमवारी गलवान खोर्‍यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जी झटापट झाली, त्यात भारताचा एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झालेत. त्याचप्रमाणे चीनचे पाच सैनिकही मारले गेल्याची बातमी दोन देशांमधील तणाव आणखी वाढविणारी आहे. सीमेवर गोळीबार झाला नसतानाही, आपले तीन सैनिक शहीद कसे झालेत आणि चीनचे पाच मारले कसे गेलेत, हा प्रश्नच आहे. ..

दिल्लीतील कोरोनाविरुध्दची लढाई

राजधानी दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्‌‌‌याने वाढत आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या 41 हजाराच्या वर तर मृतांचा आकडाही 1300 च्यावर गेला आहे. कोरोनाची राजधानी होण्यासाठी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आणि देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत काट्याची टक्कर सुरु झाली आहे...

आत्मनिर्भर होणे म्हणजे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवर जोर देत आहेत. त्यांच्या प्रत्येक संवादात या संकल्पनेचा उल्लेख असतो आणि त्याचे विविध पैलू ते उलगडत असतात. आधी त्यांनी ‘व्होकल फॉर लोकल’ असा नारा दिला होता. स्थानिक वस्तूंचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भारतीयांनी सक्रिय व्हावे, असा त्यात संदेश होता. आता परवा बोलताना ते म्हणाले- आत्मनिर्भर भारत अभियानाचा सरळ-साधा अर्थ आहे की, भारताने दुसर्‍या देशांवरील आपली निर्भरता कमीतकमी करावी. ..

पत्रकारितेतील ‘कर्मयोद्धा’!

वामनराव तेलंग... विदर्भाच्याच नव्हे, तर सार्‍या महाराष्ट्रातील साहित्य, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक गणमान्य व्यक्तिमत्त्व. तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह आणि विदर्भ साहित्य संघाचे विद्यमान कार्याध्यक्ष... अशा कितीतरी बिरुदावल्या त्यांना लावता येतील. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एका निःस्पृह व्यक्तिमत्त्वाला, निरपेक्ष वृत्तीने काम करणार्‍या ..

बेभरवशाचे शेजारी

निंदकाचे घर असावे शेजारी, अशी एक म्हण मराठीत आहे. अशा निंदकांचा कधी आपल्याला त्रास होतो तर कधी त्यांच्यामुळे आपल्याला आपल्यातली शक्ती ओळखून स्वत:चेे सामर्थ्य वाढविण्याचे बळ प्राप्त होते. असाच काहीसा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला जागतिक पातळीवर बघायला मिळत आहे...

एकशे तीस कोटींचा विचार...

हैदराबाद येथील भाग्यनगर येथे आयोजित ‘विजय संकल्प’ रॅलीत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे भाषण झाले. वृत्तपत्रांच्या सवयीप्रमाणे हे भाषण अनेकांच्या डोक्यावरून गेले. डोक्यावरून जाण्यासारखे या भाषणात काही नाही. ..

खुनशी सरकार!

जनतेचे हित ध्यानी घेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे सोडून बदल्याचे राजकारण केले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. प्रत्यक्षात तीन पक्षांनी आपल्या वचन, शपथनाम्यातून जनतेला दिलेल्या शब्दांना पाळण्याची आणि जागण्याची ‘हीच ती वेळ’ असताना, हे सरकार मात्र, केवळ खुनशी राजकारणात व्यग्र आहे...

मी नवा आहे! मी नवा आहे!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, त्यांचे पिताश्री म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आणखी एक ‘शब्द’ दिल्याचे गुरुवारी विधानसभेत उघड झाले. ‘शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन’ हा पहिला शब्द दिला होता, हे आधीच कळले होते. आता ‘भाजपाची पालखी कायम वाहणार नाही,’ असा दुसराही शब्द दिल्याचे समजले. ..

दीड दिवसांचे माहेर

हुर्डा पार्टी, यात्रा, जत्रा, ऊरुस अन्‌ काय काय संभावना केले जाणारे विधिमंडळाचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. दरवर्षीच या अधिवेशनाची अशीच काहीशी चर्चा होत असते. नागपूर करारात ठरल्यानुसार तितक्या कालावधीत हे अधिवेशन सहसा होतच नाही. त्यामुळे उगाच उपचार म्हणून नागपुरात सरकार का हलविले जाते आणि त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा तो खर्च विदर्भाचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी का वापरला जात नाही, असा सवाल (परखड!) विचारला जातो. ..

धाकटा भाऊ अध्यक्ष, मोठा पंतप्रधान!

एप्रिल 2019 मध्ये श्रीलंकेची राजधानी कोलंबो व अन्यत्र ख्रिस्ती प्रार्थनास्थळे आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये अनेक साखळी बॅाम्बस्फोट घडविण्यात आले. नॅशनल तौहीत जमात या गटावर संशय असला, तरी इतक्या मोठ्या पातळीवर स्वत:च्या भरवशावर विध्वंस घडवून आणण्याची या गटाची क्षमता नाही. ..

हैदराबाद चकमकीच्या आनंदाचा अन्वयार्थ!

गेला पंधरवडाभर गाजलेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांकरवी एन्काऊंटरमध्ये मारले गेल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली अन्‌ या लोकशाहीप्रधान देशातील कथित शहाणे अन्‌ वास्तवात जगणार्‍यांच्या विचारशैलीतील दरी कधी नव्हे एवढी उघड झाली. चार आरोपी आणि पोलिसांदरम्यान घडलेली फिल्मी स्टाईलची चकमक खरी असेल, याबाबत शंका मनात असूनही त्या नराधमांना झालेली हीच शिक्षा योग्य असल्याची भावना एकीकडे, पिसाळलेल्या कुत्र्यांना असेच संपवायचे असते असे मानणारा वर्ग एकीकडे, तर झालं ते योग्य नव्हतं, कायद्याला ..

अजब तुझे सरकार...

क्रिकेटच्या भाषेत असं म्हणतात, नवा फलंदाज आला की त्याला रुळायला वेळ द्यायला हवा. खेळपट्टीचा मूड आणि त्यानुसार बॉलचा स्विंग यावर त्याचे डोळे खिळायला हवेत... अर्थात, हे चोचले कसोटी क्रिकेटमध्ये चालून जाणारे होते. आताचा जमाना एक दिवसीयच नाही तर थेट वीस-वीसचा आहे. त्यामुळे फलंदाजाला सेट होऊनच खेळपट्टीवर यावे लागत असते. ही गतिमानता केवळ क्रिकेटच्या खेळातच आलेली आहे, असे नाही. ती जीवनाच्या सर्वच अंगात आलेली आहे. गती हे आजच्या जीवनाचे प्राणसूत्र आहे. तुम्ही गतीशी जुळवून नाही घेतले, तर तुमची दुर्गतीच होत ..

'अधीर'पणामुळे होते लोकांचे 'रंजन!'

विरोधी पक्षनेतेपद हे संसदीय लोकशाहीतील महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. मग ते संसदेतील असो की राज्याच्या विधिमंडळातील. या पदावरील व्यक्तीने सरकारवर कडाडून टीका करणे समजण्यासारखे आहे. नव्हे, विरोधी पक्षनेत्याचे ते घटनात्मक कर्तव्यच म्हणावे लागेल. मात्र, सरकारवर टीका करताना ती औचित्याला धरून तसेच वस्तुनिष्ठ असली पाहिजे. ‘उचलली जीभ लावली टाळूला’ अशा प्रकारची टीका या पदावरील व्यक्तीला शोभणारी नसते. यातून संबंधित व्यक्तीच्या अधीरतेचे म्हणजे उतावीळपणाचे तसेच अप्रगल्भतेचे दर्शन घडते...

घुसखोर आणि शरणार्थी

राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आणि पुढील पाच वर्षांनंतर या देशात एकही घुसखोर शिल्लक राहणार नसल्याची केंद्रीय गृहमंत्र्याची हमी, ऊर अभिमानानं भरून यावा अशी आहे. पण, सार्‍याच बाबी राजकीय चष्म्यातून बघण्याची, जाती-धर्माच्या चाळणीतून चाळण्याची सवय जडलेल्या राजकारण्यांना त्यातील भल्याचा निचोड काढता येईल कसा? परिणाम हा की, देशहिताच्या या उपक्रमाविरुद्ध तुणतुणे वाजविणे त्यांनी सुरू ठेवले आहे...

स्फुरण चढावं असं नवं काहीच नाही का?

आता पानिपतच्या लढ्यावर चित्रपट दाखल होतो आहे. मागोमाग अजय देवगणचा तानाजीवरचा चित्रपट येतो आहे. दोन टोकेच आहेत. एकदम गोलमाल रीटर्नसारखी फुहड विनोद किंवा मग पोर्नोग्राफिक विनोद ज्याला अगदी सेक्स कॉमेडी म्हणून आम्ही स्वीकारले आहे. ते दाखवायचे किंवा मग एकदम इतिहासात जायचे. पेशव्यांवरचा एक चित्रपट आला नि त्याची चर्चा झाली. मग पद्मावती आला. आता हे असे विकले जाते म्हटल्यावर तेच ते सुरू होते. एकाने सोयाबीन लावले तर सार्‍या गावाचे शेतकरी सोयाबीनचाच पेरा करतात, तसेच हेही. ..

गॅब्रिएल आर्मीच्या स्थापनेवरून वादंग

केरळमधील चर्च सध्या निरनिराळ्या वादात सापडल्याने त्यांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या गॅब्रिएल आर्मीकडेही संशयाच्या दृष्टीने बघितले जात आहे. काहींनी गॅब्रिएल आर्मीची गरज काय, असा सवाल उपस्थित केला आहे. या आर्मीचा कुठलाही जातीय अजेंडा नसून, कोणत्याही कॅथॉलिक व्यक्तीस गॅब्रिएल आर्मीमध्ये सहभागी होता येईल, असे चर्चकडून सांगण्यात येत आहे. ..

ऐंशी तासांच्या सरकारचे कवित्व!

सुनील कुहीकर  विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतरचे सुमारे महिनाभराचे राजकीय नाट्य संपून राज्यात नवे सरकार स्थापन झाले. नव्या सरकारसमोर बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळाच्या गणिताचे फारसे कुठले आव्हान नाही. एकूणच महाराष्ट्रातील सरकार तरण्याचे, चालण्याचे संकेत पुरेसे स्पष्ट झालेले असतानाही, भाजपाने अजित पवारांच्या साह्याने स्थापन केलेल्या ऐंशी तासांच्या सरकारचे कवित्व मात्र काही केल्या अजुनही संपत नाहीय्‌. मोठ्या पवारांना विश्वासात न घेता अजित पवारांच्या शब्दावर विश्वास ठेवून ..

बाजवा बनले ‘शटलकॉक!’

बाजवा बनले ‘शटलकॉक!’..

उद्धव सरकार पुढील आव्हाने...

राज्य विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन महिना झाल्यानंतर, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी शिवतीर्थावर पार पडला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि देशभरातील भाजपेतर राज्यांमधील सरकारांच्या प्रतिनिधींनी आजच्या शपथविधीला आवर्जून उपस्थित लावली, नव्हे, तशी व्यवस्थाच केली गेली होती. 24 ऑक्टोबरच्या निवडणूक निकालांच्या परिणामांनंतर राज्यातील राजकारणाला जितकी वळणे आली तितकी कदाचितच इतरत्र कधी अनुभवायला आली असतील. सरकार ..

डॉ. फिरोज खान नियुक्तीचा वाद...

फिरोज खान यांची नियुक्ती संस्कृत भाषेतील साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र वगैरे शिकविण्यासाठी झालेली नाही. तसे असते तर कुणीच आक्षेप घेतला नसता. अलिगड मुस्लिम विद्यापीठात संस्कृत विभाग प्रमुख मुस्लिम व्यक्तीच आहे. कुणीही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. तिकडे, डॉक्टरेट असलेले फिरोज खान खंत व्यक्त करताना म्हणतात- सारे आयुष्य संस्कृत शिकण्यात गेले. त्याने मी मुसलमान आहे, असे मला कधीही जाणवले नाही. परंतु, आता या वादाने मला ती जाणीव करून दिली आहे. मनात प्रश्न येतो की, कोण बरोबर आहे? फिरोज खान व त्यांची ..

आम्ही भारतवासी एक आहोत...

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात आमचे 42 जवान शहीद झाल्यानंतर, संपूर्ण देशात दु:खाची आणि सोबतच संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. सरकारने पाकिस्तानला उघड शब्दांत सुनावले आहे की, तुम्ही फार मोठी चूक केली आहे, त्याची तेवढीच मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल...

अवमान ते अवधारणा...?

   १२ फेब्रुवारी रोजी सीबीआयचे अंतरिम संचालक नागेश्वर राव यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली. त्यांच्यासमवेत सीबीआयचे विधी अधिकारी भासूराम यांनाही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या न्यायपीठाने जबाबदार धरले. मौद्रिक दंडासह दिवसभर न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. दरम्यान, वकील प्रशांत भूषण यांनीही आपल्या एका ट्विटद्वारे न्यायालयाचा अवमान केल्याचे न्या. अरुण मिश्रांनी म्हटले आहे. अशा पार्श्वभूमीवर न्यायालयाचा अवमान आणि त्याविषयक ..