संपादकीय

थंडी, अवकाळी पाऊस आणि आम्ही!

नागपूर-विदर्भात अचानक थंडीची लाट आली आहे. लोकांना हुडहुुडी भरली आहे. जिकडेतिकडे या थंडीचीच चर्चा आहे. थंडीसोबतच अवकाळी पाऊसही आला आहे आणि या पावसाने रबी पिकांचीही नासाडी केली आहे. ..

खुनशी सरकार!

जनतेचे हित ध्यानी घेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे सोडून बदल्याचे राजकारण केले जात असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. प्रत्यक्षात तीन पक्षांनी आपल्या वचन, शपथनाम्यातून जनतेला दिलेल्या शब्दांना पाळण्याची आणि जागण्याची ‘हीच ती वेळ’ असताना, हे सरकार मात्र, केवळ खुनशी राजकारणात व्यग्र आहे...

घराणेशाहीची छाप असलेले मंत्रिमंडळ!

संपूर्ण राज्याला ज्याची प्रतीक्षा होती, ती घटना अखेर घडली. गंगेत घोडं न्हालं! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना मूठमाती देत, परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपद उधार घेतलेल्या उद्धव ठाकरे यांनी अखेर परवा सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या विस्तारावर पूर्णपणे घराणेशाहीची छाप असल्याचे स्पष्ट झाले आहे...

पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

देशातील युवकांना अराजकता, जातीयवाद आणि घराणेशाहीची प्रचंड चीड असून, असे प्रकार त्यांना मान्य नसल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले. 2019 च्या शेवटच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी यांनी या विधानातून देशातील राष्ट्रवादी युवकांची एकप्रकारे प्रशंसा करत अन्य युवकांना आत्मपरीक्षणाची संधी उपलबध करून दिली आहे...

चीन-अमेरिका वादाला नवीन फोडण्या!

आजच्या चीनमधील शिझियांग (सिकियांग) राज्यात-प्रांतात गत 2,500 वर्षांत डझनावारी राज्ये-साम्राज्ये जन्माला आली, फुलली, फळली व शेवटी लयाला गेली. याहीपेक्षा मागे जातो म्हटले, तर महाभारतात या सिकियांग प्रदेशाला तुषार-तुखार हे नाव दिलेले दिसते. दिग्विजययात्रेत अर्जुनाने हा भाग िंजकल्याचाही उल्लेेख आहे. ..

ऋतुचक्राच्या फेर्‍यांत अडकलेले वर्ष...

खर्‍या अर्थाने हे वर्ष निसर्ग, पर्यावरणाचे वर्ष आहे. आता हे वर्ष सरत आलेले आहे. अगदी आमचे वाचक सकाळच्या थंडीत गरम चहासोबत हा लेख वाचत असतानापासून अगदी 40/44 तासांवर हे वर्ष अखेरच्या वळणावर उभे आहे. या वर्षाचा ताळेबंद मांडायचा झाला, तर तो ऋतूंच्या पाटीवरच मांडावा लागणार आहे. यंदाच्या वर्षात ऋतूंनी माणसांची मस्ती उतरविली आहे...

2019 - मोदी-शाह यांचे वर्ष!

2019 हे वर्ष- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या यशाचे वर्ष म्हणून नोंदले जाईल. या वर्षाच्या मध्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी-शाह यांच्यामुळे भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. त्या सार्‍या यशाचे श्रेय या दोन्ही नेत्यांना आहे. 2018 संपता संपता भाजपाला राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. ..

नागरिकत्व (सुधारणा) कायदा बौद्ध समुदायाच्या हिताचा

1987 मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार बांग्लादेशातील पोलिसांनी मनमानी करत चकमा बौद्ध कार्यकर्त्यांना बंदी बनवले व त्यांच्यावर अनन्वित अत्याचार सुरू झाले. या अत्याचारांनी अनेक बौद्ध कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. महिला व बौद्ध तरुणींचे शारीरिक बलपूर्वक शोषण झाले. बौद्ध भिख्खूंची हत्या करण्यात आली. बौद्ध विहारांची लूट करून त्यांना उध्वस्त केले गेले. परिणामी हजारो बौद्ध नागरीकांनी भारतामध्ये प्रवेश केला व भारताचे शरणार्थी म्हणून जीवन जगण्यास सुरुवात केली. ..

तुमचा उभा धिंगाणा संविधानाला धरून आहे?

विरोधी पक्ष आणि विरोधक बेंबीच्या देठापासून कितीही बोंबलत सुटले असले, तरी केंद्रातले मोदी सरकार देशातील जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेत आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमुळे काँग्रेसया प्रमुख विरोधी पक्षासह राज्याराज्यांतील विविध प्रादेशिक पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ..

वेळीच सुधरा, अन्यथा...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली म्हणून त्यांच्याचसारखे वागले पाहिजे असे नाही. आपले वडील दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं त्यांनी आठवावीत, बाळासाहेब अशा वेळी काय भूमिका घ्यायचे ते आठवून बघावे म्हणजे योग्य भूमिका घेणे उद्धव ठाकरेंना सुकर होईल. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत जी भूमिका घेतली, जी ध्येयधोरणं स्वीकारलीत, हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला, त्याचा विसर एवढ्या लवकर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीमुळे ..

झारखंडचे निकाल...

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपासाठी धक्कादायक म्हणावे लागतील. सध्या निवडणूक निकालाचा जो कल काल सकाळी दिसला, तो कायम राहिल्याने झारखंडच्या रूपात भाजपाला आणखी एक राज्य गमावावे लागले आहे. याआधी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. या मालिकेत आता झारखंडमध्येही भाजपाचा पराभव झाल्याचे दिसते आहे...

युरोपियन युनियनमधून बाहेर पडा : स्पष्ट जनादेश!

डिसेंबर 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ब्रिटनमधील पक्षोपपक्षांनी मिळविलेल्या जागा, मतांची टक्केवारी व ठोकळमानाने मतसंख्या पुढीलप्रमाणे आहे. ब्रिटिश पार्लमेंटमधील सर्व म्हणजे एकूण 650 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. बहुमतासाठी 326 जागा मिळणे आवश्यक आहे. तरुणाईच्या ट्विटरवरील ट्विवट्विवाटाला सपशेल चूक ठरवून बहुसंख्य प्रौढ मतदारांनी हुजूर पक्षाच्या (कॉन्झरव्हेटिव्ह) पदरात भरपूर जागांचे दान टाकले आहे. एवढेच नव्हे, तर मजूर (लेबर) पक्षाच्या अनेक पारंपरिक बालेकिल्ल्यातदेखील मतदारांनी त्या पक्षाच्या उमेदवारांची ..

कर्जमाफीची सुगी आणि बरेच काही...

विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा सोपस्कार आटोपला आहे. अर्धवट सरकार चार दिवस नांदले आणि गेले. हा ‘इव्हेंट’ पार पडला तो अर्थात प्रशासनाच्या इतक्या वर्षांच्या अनुभवामुळेच. अगदी वैदर्भीय भाषेतच सांगायचे झाल्यास, बाकी तामझाम चांगला होता. म्हणजे नेहमीच्या पठडीतला होता. लहान मुलंही भावला-भावलीच्या लग्नाचा खेळ खेळायची; तेव्हा त्यात मोठीही नकळत सामील व्हायची आणि मग माहोल अगदी खर्‍या लग्नासारखा उभा राहायचा...

मी नवा आहे! मी नवा आहे!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, त्यांचे पिताश्री म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आणखी एक ‘शब्द’ दिल्याचे गुरुवारी विधानसभेत उघड झाले. ‘शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन’ हा पहिला शब्द दिला होता, हे आधीच कळले होते. आता ‘भाजपाची पालखी कायम वाहणार नाही,’ असा दुसराही शब्द दिल्याचे समजले. ..

शेतकर्‍याच्या हाती काही लागेचिना!

या ‘भारुडा’च्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान, राजकीय अपरिहार्यतेतून एकत्रित आलेल्या तीन पक्षांच्या या सरकारच्या एकूणच अगतिकतेचा पाढा वाचून दाखवीत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मागील काळात भाजपासोबत सत्तेत असताना शिवसेनेने ‘शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा’, ‘कर्जमाफी नाही कर्जमुक्ती करा’, ..

आंदोलनाआड अस्तित्वलढा!

नागरिकता कायद्यावरून देशात विरोधाचे सूर उमटत आहेत. विविध ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनांना प्रारंभ झाला असून, या कायद्याच्या विरोधात अनेक जण रस्त्यांवर उतरले आहेत. रस्त्यावर उतरणार्‍यांमध्ये विशेषतः कॉंग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पार्टी, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय जनता दल, मुस्लिम लीग, एआयएमआयएम आदी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे वरकरणी दिसत असले, तरी यामागे काम करणारी डोकी लक्षात घेतली पाहिजे...

श्रीलंकेचे भारताशी नवे संबंध

श्रीलंकेच्या नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विजयी झाल्यानंतर अगदी दोन आठवड्यांत परराष्ट्र दौरा आणि पहिल्या विदेश दौर्‍यासाठी भारताची केलेली निवड खूप काही सांगून जाणारी आहे. ..

कळलेले आणि आकळलेले...

सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी परवा दोन विधाने केलीत, एक दिल्लीच्या जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जो उच्छाद मांडला आहे, त्या संदर्भात आहे आणि दुसरे, माहितीच्या अधिकाराच्या संदर्भात एका याचिकेवर सुनावणी करताना त्यांच्या प्रमुखत्वाखालील खंडपीठाने निर्णयाप्रत येताना केलेल्या सुनावणीदरम्यान दिलेले वक्तव्य म्हणण्यापेक्षा मांडलेली निरीक्षणे आहेत. ..

अब्दुर रहमान यांच्या नौटंकीचा अन्वयार्थ!

खरंच कठीण आहे बुवा या देशाचं. इथल्या कथित पुरोगाम्यांचं. विशषेत: मुस्लिम समाजातील कथित धुरीणांचं. सत्तेत भाजपा आली की, लागलीच त्यांना इथे असुरक्षित काय वाटू लागते, आमीरखानच्या बायकोला इथे कायद्याचे राज्य उरले नसल्याचा साक्षात्कार काय होतो, शासकीय पुरस्कार परत करण्याची अहमहमिका काय सुरू होते, सारेच अफलातून आहे...

नागरिकता विधेयक : भ्रमच जास्त

या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या नागरिकता संशोधन विधेयकाचे (सीएबी िंकवा सिटीझनशिप अॅमेंडमेंट बिल) एकाच वाक्यात वर्णन करायचे झाल्यास हेतू शुद्ध असला तरीही सर्वाधिक गैरसमज निर्माण करणारे विधेयक असेच करावे लागेल. या विधेयकासंबंधी विविध नेत्यांच्या वक्तव्यांवरून भाजपा किंवा गृहमंत्री अमित शाह हा खटाटोप कशासाठी करीत आहेत, असा प्रश्न माझ्याही मनात निर्माण झाला होता...

हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी

There is a point at which even justice does injury. सोफोकल्स या विचारवंताचे हे वचन हैदराबाद एन्काऊंटरला नेमके लागू होणारे आहे. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस चकमकीत ठार झाले. एक न्याय झाला. मात्र, तरीही या न्यायाने काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि बहुधा यामुळेच सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी या एन्काऊंटरची चौकशी करण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली असून, सेवानिवृत्त न्यायाधीश न्या. विकास शिरपूरकर या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना सहा महिन्यांत आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयास ..

दीड दिवसांचे माहेर

हुर्डा पार्टी, यात्रा, जत्रा, ऊरुस अन्‌ काय काय संभावना केले जाणारे विधिमंडळाचे नागपूरचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. दरवर्षीच या अधिवेशनाची अशीच काहीशी चर्चा होत असते. नागपूर करारात ठरल्यानुसार तितक्या कालावधीत हे अधिवेशन सहसा होतच नाही. त्यामुळे उगाच उपचार म्हणून नागपुरात सरकार का हलविले जाते आणि त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा तो खर्च विदर्भाचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी का वापरला जात नाही, असा सवाल (परखड!) विचारला जातो. ..

अस्वस्थतता असू द्या, अविचार नको!

सध्या महाराष्ट्रात पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या बातम्या गाजत आहेत. या दोन्ही नेत्यांविषयी अशा बातम्या पेरल्या जात आहेत की, ते भाजपा सोडण्याचा निर्णय करतील. एकनाथराव खडसे यांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीला निवडणुकीत पाडण्यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी प्रयत्न केला. तसेच पंकजा मुंडे यांना पराभूत करण्यासाठी काही भाजपा नेते कारणीभूत आहेत. हे नेते कोण आहेत, याची माहिती त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना दिली आहे. ..

नागरिकत्व विधेयकाची स्वागतार्ह मंजुरी!

अखेर नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा मार्ग मोकळा झाला. जणूकाय सरकार या देशाविरुद्ध पाऊल उचलायला निघाले असल्याच्या थाटात त्या विधेयकाला मांडताक्षणीच विरोध सुरू झाला होता. संसदेत विरोधी बाकांवर बसलेल्यांनी सरकारला फक्त विरोधच करायचा असतो, अशा कुठल्याशा अफलातून, विचित्र कल्पनेतून राजकारण करायला निघालेल्या तमाम राजकीय पक्षांच्या धुरंधरांनी देशहित खुंटीला टांगून चालवलेली राजकारणाची तर्‍हा, दुर्दैवीच खरीतर! ..

धाकटा भाऊ अध्यक्ष, मोठा पंतप्रधान!

एप्रिल 2019 मध्ये श्रीलंकेची राजधानी कोलंबो व अन्यत्र ख्रिस्ती प्रार्थनास्थळे आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये अनेक साखळी बॅाम्बस्फोट घडविण्यात आले. नॅशनल तौहीत जमात या गटावर संशय असला, तरी इतक्या मोठ्या पातळीवर स्वत:च्या भरवशावर विध्वंस घडवून आणण्याची या गटाची क्षमता नाही. ..

जबाबदार कोण? उपाय काय...?

मध्य दिल्लीतील फिल्मिस्तान भागातील अनाज मंडीत एका कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना मनाला चटका लावणारी होती. आपल्या देशात अशा घटना वारंवार घडतात, घटना घडल्यानंतर दु:ख व्यक्त केले जाते, मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना नुकसानभरपाईची घोषणा केली जाते, लोक मोर्चे काढतात, निषेध करतात, मग आगीसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले जाते आणि हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते. ..

महाराष्ट्रातील सत्तांतराचे चक्र

राजकीय घटनाक्रम फार विचित्र असतो. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी- आपल्यासमोर महाराष्ट्रात व केंद्रात सहकार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तो आपण स्वीकारला नाही, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला. ..

न्यायाला विलंब म्हणजे...

न्याय हा तातडीने मिळत नाही, तसेच तो सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेला असल्याची जी खंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली, ती अतिशय योग्य आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावनाच याप्रकारे कोविंद यांनी व्यक्त केली आहे. न्याय हा देऊन चालत नाही तो मिळाला असल्याचे वाटले पाहिजे. पण, आपली विद्यमान न्यायव्यवस्था यात कमी पडत आहे...

‘सेक्युलर’मुळे होणारा घोळ...

42 वर्षीय बिंदू अम्मीनी या महिलेने शबरीमलै येथील स्वामी अय्यप्पा मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केला. परंतु, तो अय्यप्पा भाविकांनी हाणून पाडल्यानंतर अम्मीनी थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्या आणि आपल्याला या मंदिरात प्रवेशासाठी पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली. 5 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सांगितले की, 2018 सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या निर्णयाच्या आधारे अम्मीनी मंदिरात प्रवेश करण्यासाठी पोलिस संरक्षण मागत आहेत, तो निकाल काही अंतिम ..

हैदराबाद चकमकीच्या आनंदाचा अन्वयार्थ!

गेला पंधरवडाभर गाजलेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांकरवी एन्काऊंटरमध्ये मारले गेल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली अन्‌ या लोकशाहीप्रधान देशातील कथित शहाणे अन्‌ वास्तवात जगणार्‍यांच्या विचारशैलीतील दरी कधी नव्हे एवढी उघड झाली. चार आरोपी आणि पोलिसांदरम्यान घडलेली फिल्मी स्टाईलची चकमक खरी असेल, याबाबत शंका मनात असूनही त्या नराधमांना झालेली हीच शिक्षा योग्य असल्याची भावना एकीकडे, पिसाळलेल्या कुत्र्यांना असेच संपवायचे असते असे मानणारा वर्ग एकीकडे, तर झालं ते योग्य नव्हतं, कायद्याला ..

अजब तुझे सरकार...

क्रिकेटच्या भाषेत असं म्हणतात, नवा फलंदाज आला की त्याला रुळायला वेळ द्यायला हवा. खेळपट्टीचा मूड आणि त्यानुसार बॉलचा स्विंग यावर त्याचे डोळे खिळायला हवेत... अर्थात, हे चोचले कसोटी क्रिकेटमध्ये चालून जाणारे होते. आताचा जमाना एक दिवसीयच नाही तर थेट वीस-वीसचा आहे. त्यामुळे फलंदाजाला सेट होऊनच खेळपट्टीवर यावे लागत असते. ही गतिमानता केवळ क्रिकेटच्या खेळातच आलेली आहे, असे नाही. ती जीवनाच्या सर्वच अंगात आलेली आहे. गती हे आजच्या जीवनाचे प्राणसूत्र आहे. तुम्ही गतीशी जुळवून नाही घेतले, तर तुमची दुर्गतीच होत ..

कर्मवीर सुधा मूर्ती...

अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीमुळे लोकप्रियतेचे शिखर गाठलेला, ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या या सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे आठवड्यातून एकदा ‘कर्मवीर’ व्यक्तीला बोलवण्यात येत असे. शेवटच्या कार्यक्रमात इन्फोसिस फाऊंडेशनच्या सुधा मूर्ती यांना पाचारण केले होते. या कार्यक्रमात सुधा मूर्ती व अभिताभ बच्चन यांच्यात जी प्रश्नोत्तरे झालीत, ती अत्यंत प्रसन्न, प्रेरणा देणारी आहेत. ..

'अधीर'पणामुळे होते लोकांचे 'रंजन!'

विरोधी पक्षनेतेपद हे संसदीय लोकशाहीतील महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. मग ते संसदेतील असो की राज्याच्या विधिमंडळातील. या पदावरील व्यक्तीने सरकारवर कडाडून टीका करणे समजण्यासारखे आहे. नव्हे, विरोधी पक्षनेत्याचे ते घटनात्मक कर्तव्यच म्हणावे लागेल. मात्र, सरकारवर टीका करताना ती औचित्याला धरून तसेच वस्तुनिष्ठ असली पाहिजे. ‘उचलली जीभ लावली टाळूला’ अशा प्रकारची टीका या पदावरील व्यक्तीला शोभणारी नसते. यातून संबंधित व्यक्तीच्या अधीरतेचे म्हणजे उतावीळपणाचे तसेच अप्रगल्भतेचे दर्शन घडते...

बस्तर हत्याकांडाच्या तथ्याचा अन्वयार्थ...

नक्षलवादाचे परिणाम या देशाने भोगलेले आहेत. बॅलेट नव्हे, बुलेटने प्रश्न सोडविण्यावर विश्वास असणार्‍यांचा उच्छादही या देशाने बघितलेला आहे. शांततेने नव्हे, तर िंहसेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याच्या मार्गामुळे झालेले देशाचे नुकसानही आपल्यासमोर आहे. हा िंहसेचा मार्ग नक्षलवादी चळवळीने आणि त्यात सहभागी नक्षल्यांनी सोडून द्यावा म्हणून गेल्या काही वर्षांत जोरकस प्रयत्नदेखील झाले असून, त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले आहे; पण या दरम्यान िंहसाचाराच्या इतक्या क्रूर आणि अंगावर काटे आणणार्‍या घटना घडल्या ..

घुसखोर आणि शरणार्थी

राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची आणि पुढील पाच वर्षांनंतर या देशात एकही घुसखोर शिल्लक राहणार नसल्याची केंद्रीय गृहमंत्र्याची हमी, ऊर अभिमानानं भरून यावा अशी आहे. पण, सार्‍याच बाबी राजकीय चष्म्यातून बघण्याची, जाती-धर्माच्या चाळणीतून चाळण्याची सवय जडलेल्या राजकारण्यांना त्यातील भल्याचा निचोड काढता येईल कसा? परिणाम हा की, देशहिताच्या या उपक्रमाविरुद्ध तुणतुणे वाजविणे त्यांनी सुरू ठेवले आहे...

स्फुरण चढावं असं नवं काहीच नाही का?

आता पानिपतच्या लढ्यावर चित्रपट दाखल होतो आहे. मागोमाग अजय देवगणचा तानाजीवरचा चित्रपट येतो आहे. दोन टोकेच आहेत. एकदम गोलमाल रीटर्नसारखी फुहड विनोद किंवा मग पोर्नोग्राफिक विनोद ज्याला अगदी सेक्स कॉमेडी म्हणून आम्ही स्वीकारले आहे. ते दाखवायचे किंवा मग एकदम इतिहासात जायचे. पेशव्यांवरचा एक चित्रपट आला नि त्याची चर्चा झाली. मग पद्मावती आला. आता हे असे विकले जाते म्हटल्यावर तेच ते सुरू होते. एकाने सोयाबीन लावले तर सार्‍या गावाचे शेतकरी सोयाबीनचाच पेरा करतात, तसेच हेही. ..

तुझे आहे तुजपाशी, पण जागा चुकलाशी...!

आपले अनैतिक संबंध कसे नैतिक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी, अनैतिक कृत्य करणार्‍यांकडून वाटेल ते दाखले आणि वाटेल तो संदर्भ देऊन, तो कसा योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. वर्षानुवर्षे असेच चालत आले आहे. राज्यातील राजकारणातली परिस्थिती काहीशी अशीच झालेली दिसते. राजकीय अनैतिकतेचा कळस यावेळी गाठला गेला असल्याने, आपण केलेल्या अनैतिक कृत्यांवर पांघरुण घालण्याचा प्रकार आता, निवडणूकपूर्व करार पायदळी तुडवून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमवेत नव्या घरोब्याच्या आणाभाका घेणार्‍या शिवसेनेकडून केला जात ..

औपचारिकच; पण...

नवे मुख्यमंत्री तर ठाकरेच आहेत. वाणीचा वारसा तर त्यांच्याकडे पिढिजात आहे. नेत्यांच्या अशा छान-छान बोलण्याने राज्याचे मात्र भले होत नाही. अर्थात हा ‘टिझर’ होता. खरा चित्रपट आता 16 डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात गांभीर्याने विचार करावे असे राज्यपालांचे भाषणच काय ते होते. अर्थात राज्यपालांनी नव्या सरकारचा जो काय कार्यक्रम ठरला आहे, तोच त्यांच्या भाषणात सांगितला. ..

गॅब्रिएल आर्मीच्या स्थापनेवरून वादंग

केरळमधील चर्च सध्या निरनिराळ्या वादात सापडल्याने त्यांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या गॅब्रिएल आर्मीकडेही संशयाच्या दृष्टीने बघितले जात आहे. काहींनी गॅब्रिएल आर्मीची गरज काय, असा सवाल उपस्थित केला आहे. या आर्मीचा कुठलाही जातीय अजेंडा नसून, कोणत्याही कॅथॉलिक व्यक्तीस गॅब्रिएल आर्मीमध्ये सहभागी होता येईल, असे चर्चकडून सांगण्यात येत आहे. ..

याला म्हणतात लोकसंख्येचा बोनस!

पुण्यात मुख्यालय असलेली बजाज फायनान्स नावाची शेअर बाजारात नोंद असलेली ही कंपनी सध्या चर्चेत आहे वस्तूंना मागणी नाही, अशी सर्वत्र स्थिती असताना या कंपनीला मागणीचा अजिबात प्रश्न नाही. अनेक कंपन्या मागणी आणि नफ्यासाठी धडपडत असताना या कंपनीने त्याचे नवनवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. या कंपनीने गेल्या काही वर्षांत किती झेप घेतली, हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच तिने ते ज्या मार्गाने हे साध्य केले आहे, ते अधिक महत्त्वाचे आहे. भारतीय नागरिकांना नेमके काय हवे आहे, हे शोधायचे असेल तर त्याकडे लक्ष दिले पाहिजे. ..

विचारधारेला तिलांजली!

विचारधारा सोडणार्‍यांची साथ भविष्यात जनताही सोडते, हेही लक्षात घेतले पाहिजे. कारण, विचारधारा हा राजकारणाचा आत्मा समजला जातो. ज्या राजकीय पक्षांचा निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे वा होतो आहे, त्यांनी आपली चूक कुठे होते आहे, हे नेमकेपणाने समजून घेणे गरजेचे आहे...

ऐंशी तासांच्या सरकारचे कवित्व!

सुनील कुहीकर  विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतरचे सुमारे महिनाभराचे राजकीय नाट्य संपून राज्यात नवे सरकार स्थापन झाले. नव्या सरकारसमोर बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळाच्या गणिताचे फारसे कुठले आव्हान नाही. एकूणच महाराष्ट्रातील सरकार तरण्याचे, चालण्याचे संकेत पुरेसे स्पष्ट झालेले असतानाही, भाजपाने अजित पवारांच्या साह्याने स्थापन केलेल्या ऐंशी तासांच्या सरकारचे कवित्व मात्र काही केल्या अजुनही संपत नाहीय्‌. मोठ्या पवारांना विश्वासात न घेता अजित पवारांच्या शब्दावर विश्वास ठेवून ..

बाजवा बनले ‘शटलकॉक!’

बाजवा बनले ‘शटलकॉक!’..

उद्धव सरकार पुढील आव्हाने...

राज्य विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन महिना झाल्यानंतर, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी शिवतीर्थावर पार पडला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि देशभरातील भाजपेतर राज्यांमधील सरकारांच्या प्रतिनिधींनी आजच्या शपथविधीला आवर्जून उपस्थित लावली, नव्हे, तशी व्यवस्थाच केली गेली होती. 24 ऑक्टोबरच्या निवडणूक निकालांच्या परिणामांनंतर राज्यातील राजकारणाला जितकी वळणे आली तितकी कदाचितच इतरत्र कधी अनुभवायला आली असतील. सरकार ..

शिवसैनिकाला पालखीत बसवणार होतात ना?

महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना कौल दिला होता, त्या भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचेच सरकार सत्तेत येणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात अभद्र आघाडीचे सरकार सत्तारूढ होणार, हे स्पष्ट झाले आहे. आपल्या हयातीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला गाडण्याची भाषा केली होती. आयुष्याच्या अखेरपर्यंत बाळासाहेबांनी या दोन्ही विरोधकांना गाडण्यासाठी संघर्ष केला. त्या संघर्षात ते 1995 साली यशस्वीही झाले होते. त्यानंतर हयात असेपर्यंत त्यांनी कॉंग्रेस-आघाडीला ..

क्रिकेट आणि राजकारणात काहीही शक्य...

क्रिकेट आणि राजकारणात काहीही शक्य.....

डॉ. फिरोज खान नियुक्तीचा वाद...

फिरोज खान यांची नियुक्ती संस्कृत भाषेतील साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र वगैरे शिकविण्यासाठी झालेली नाही. तसे असते तर कुणीच आक्षेप घेतला नसता. अलिगड मुस्लिम विद्यापीठात संस्कृत विभाग प्रमुख मुस्लिम व्यक्तीच आहे. कुणीही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. तिकडे, डॉक्टरेट असलेले फिरोज खान खंत व्यक्त करताना म्हणतात- सारे आयुष्य संस्कृत शिकण्यात गेले. त्याने मी मुसलमान आहे, असे मला कधीही जाणवले नाही. परंतु, आता या वादाने मला ती जाणीव करून दिली आहे. मनात प्रश्न येतो की, कोण बरोबर आहे? फिरोज खान व त्यांची ..

डेबुजी ते गाडगेबाबा...

 माणसाला तो कितीही सामान्य असला आणि कुठल्याही अवस्थेत, कसाही जगत असला, तरीही त्याच्या जगण्याची दखल पुढच्या पिढ्यांनी घ्यावी असे वाटते. ही आदिम भावना आहे. त्यासाठी मग तो काय काय करत असतो. अगदी अश्मयुगात त्याने दगडांवर चित्रे काढली, आपल्या शिकारकथा कोरून ठेवल्या, नंतरच्या लोकांनी काव्यातून, महाकाव्यातून त्यांचे जगणे मांडून ठेवले. राजेराजवाड्यांनी बखरी लिहून घेतल्या... विचारवंतांनी ग्रंथ लिहिलेत, आत्मचरित्रे-चरित्रे लिहिलीत. संतांनी पोथ्या लिहिल्या. त्यांच्या आरत्या, देवळे, टोप्या, साधक, शिष्य, ..

बत्तीस मण सुवर्णसिंहासन : एक राष्ट्रजागरण अभियान

छत्रपती शिवरायांची गणना भारतातील सर्वश्रेष्ठ राष्ट्रपुरूषात होते. निष्ठावंत, कर्तव्यनिष्ठ, असामान्य मुत्सद्दी, रणझुंजार, सेनानायक हे त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू आहेत. राष्ट्रीयत्वाच्या भावनेने ते भारलेले होते. त्यांनी समाजापुढे एक जीवनध्येय ठेवले जीवनात श्रेयस आणि प्रेयस काय व प्रसंगी प्राणार्पण करून ध्येय कसे जपावे ..

व्यावसायिकता व कार्यकर्तेपणा यांचा सुरेख समन्वय

   रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि १९९० पासून हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे बराच काळ अध्यक्षपद भूषविणार्‍या बाळकृष्ण पुरुषोत्तम तथा राजाभाऊ जोशी यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख.   काल रात्री राजाभाऊ जोशी गेल्याची बातमी आली. सात-आठ वर्षांपूर्वी त्यांच्यावर हृदयरोगासाठी शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून त्यांच्या हालचाली मंदावल्या होत्या. त्यांना कमी दिसू लागले होते. ते पुण्याला असल्यामुळे त्यांच्या भेटीगाठीही कमी झाल्या होत्या. अधूनमधून ..

आम्ही भारतवासी एक आहोत...

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात आमचे 42 जवान शहीद झाल्यानंतर, संपूर्ण देशात दु:खाची आणि सोबतच संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. सरकारने पाकिस्तानला उघड शब्दांत सुनावले आहे की, तुम्ही फार मोठी चूक केली आहे, त्याची तेवढीच मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल...

आम्हाला पराक्रमाची भूक आहे...!!!

   चप्पा चप्पा खंडहर हो,गली गली शमशान हो,इतना बारुद उडा डालो,पूरा पाक कब्रिस्तान लगे।  या सर्व भावना सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या सामान्य माणसाच्या आहेत. तसा भारतीय माणूस वृत्तीने हिंसक नसतो. तो मुंगीलादेखील मारताना दहा वेळा विचार करील. परंतु, तोच जेव्हा सहनशीलतेच्या कडेलोटाच्या टोकाला पोहोचतो तेव्हा त्याचे तेज प्रकट होते. शंकराचा तिसरा नेत्र उघडला जातो. ती वेळ आता आलेली आहे. जनभावनांची दखल शासनाने घेतली पाहिजे. शांतीचे पाठ घरी ठेवले पाहिजेत. आता प्रवचन करायचेच झाले तर ते क्षात्रशक्तीच..

‘संगमी श्रोतेजन नाहती...’

महाराष्ट्राचं सांस्कृतिक पालनपोषण घडवण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या पुलं-गदिमा-बाबुजी या तिघांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर वाईसारख्या गावात होतो, यासाठी ‘त्रिवेणी साहित्य संगमा’चे आयोजक असणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं अभिनंदन करणं गरजेचं ठरतं...

अवमान ते अवधारणा...?

   १२ फेब्रुवारी रोजी सीबीआयचे अंतरिम संचालक नागेश्वर राव यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली. त्यांच्यासमवेत सीबीआयचे विधी अधिकारी भासूराम यांनाही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या न्यायपीठाने जबाबदार धरले. मौद्रिक दंडासह दिवसभर न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. दरम्यान, वकील प्रशांत भूषण यांनीही आपल्या एका ट्विटद्वारे न्यायालयाचा अवमान केल्याचे न्या. अरुण मिश्रांनी म्हटले आहे. अशा पार्श्वभूमीवर न्यायालयाचा अवमान आणि त्याविषयक ..