विशेष लेख

कोरोनाचा पहिला राजकीय बळी!

‘‘मी कुणालाही आवडत नाही!’’ हे विधान आहे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीचे! अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे! 3 नोव्हेंबर रोजी होणार्‍या राष्ट्रपती निवडणुकीत ट्रम्प हे कोरोनाचे बळी ठरण्याचे स्पष्ट संकेत आहेत. जेव्हा केव्हा कोरोनाचा इतिहास लिहिला जाईल- दोन राष्ट्राध्यक्षांची नावे काळ्याकुट्ट अक्षरांनी लिहिली जातील. एक म्हणजे राष्ट्रपती ट्रम्प आणि दुसरे नाव आहे ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोल्सोनारो! कोरोनात सध्या हे दोन देश आघाडीवर आहेत. त्याच वेळी दोन देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे नाव सुवर्णाक्षरांनी ..

लोकमान्य टिळक : एक समग्र विद्यापीठ

लोकमान्य टिळकांचा जीवन काळ २३ जुलै १८५६-१ ऑगस्ट १९२० हा आहे. निर्भिडसिंहगर्जनाकाराची आज शतक पुण्यतिथी. या पुण्यतिथीप्रित्यर्थ टिळकांच्या अतुलनीय व्यक्तिमत्वातील काही पैलू मांडण्याचा हा प्रयत्न. लोकमान्य टिळक समग्रपणे वाचण्याचा माझा प्रयत्न सुरू आहेच. पण आतापर्यंत ऐकलेली टिळकांवरील व्याख्याने आणि वाचलेली पुस्तके यातून टिळकांचे प्राचीन भारतीय संस्कृतीतील योगदान लक्षात घेण्यासारखे आहे...

अण्णाभाऊ साठे : मराठी साहित्यातील स्वयंप्रकाशित तारा

महाराष्ट्र भूमी अनेक साहित्यिकांची खाण आहे. याच मराठी साहित्यांच्या वैभवशाली प्रांगणात मराठी साहित्यिकांच्या ध्येयवादी वृत्तीच्या अनेक पणत्या होऊन गेल्या आहेत. अशाच मराठी साहित्याच्या मांदियाळीत उजळून उठणारी, आत्मतेजाने उठून दिसणारी, स्वयंप्रकाशित, स्वयंस्फूर्त, प्रकाशमान होणारी ज्वाला याच महाराष्ट्र भूमीत , मराठी साहित्याच्या प्रांतात होऊन गेली - त्या धगधगत्या ज्वालेचे नाव होते अण्णा भाऊ साठे...

चेकाळलेल्या चीनच्या चोरवाटा!

हे युग विस्तारवादाचे नाही, विकासवादाचे आहे, हे मोदी ठणकावून सांगत असताना, सीमावाद उकरून काढून आपल्या सीमा शेजारच्या देशात सरकवणे, प्राचीन इतिहासकाळातील दाखले पुढे करीत प्रदेशांवर, नव्हे, देशांवरच अधिकार सांगणे, समुद्रातील आणि उपसागरातील बेटांवर आपला अधिकार गाजवणे किंवा प्रसंगी कृत्रिम बेटेही तयार करणे आणि नवीन प्रदेश जिंकून सामील करून घेणे, असे चीनचे चार विस्तारवादी प्रकार, निदान दीड डझन देशांबाबत तरी नक्कीच सुरू आहेत...

भव्य मंदिर, भव्य भारत...

बाबरी ढाचा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील मोठे नाव असलेल्या एका थोर व्यक्तीशी संवाद करण्याचा योग आला. ते तसे वृत्तीने संघद्वेष्टे नव्हते. ते म्हणाले, बाबरी ढाचा पाडून संघाने आपले काम वीस वर्षे मागे नेले आहे. ते ज्या विचारात वाढले आणि जेवढा हिंदू त्यांना समजला, त्यावरून त्यांचे म्हणणे बरोबर होते. परंतु, आम्ही टिळक, डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजीपरंपरेत वाढलेले हिंदू असल्यामुळे संघाचा विचार वीस वर्षे मागे जाण्याऐवजी अनेक वर्षे पुढे गेला आहे. दोन विचारधारांच्या आकलनातील हा फरक आहे. तो समजून ..

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद : विद्यार्थी, राष्ट्रहित जोपासणारी जागतिक संघटना

९ जुलै १९४९ या ऐतिहासिक दिनी राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा व्यापक उद्देश्य घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. स्वातंत्रप्राप्तीनंतर युवकांना योग्य दिशा देण्यासाठी अभाविपची वाटचाल सुरु झाली. ज्ञान, शील, एकता या त्रिसूत्री मंत्रावर शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना आज ७२ व्या वर्षात अभाविप पदार्पण करीत आहे. छात्रशक्ति हिच खरी राष्ट्रशक्ती या विचारातून लाखो कार्यकर्ते अभाविप संस्कारात घडत आहेत...

पवार, पडळकर आणि कोरोना...

भाजपाचे विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी जे आक्षेपार्ह उद्गार काढले, त्याचे समर्थन कुणीही करू शकणार नाही. किंबहुना त्यातल्या चुकीचा भाजपानेही निषेधच केलेला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्या उद्गारांना गैरलागू ठरवताना, त्यांच्याविषयी वा फडणवीसांच्या बाबतीत असे शब्द उच्चारले गेले; तेव्हा असे सर्व संस्कृतिरक्षक कुठे होते, हा केलेला सवालही योग्य आहे. कारण, शब्द वा भाषेची संस्कृती वा संयम फक्त एकाच बाजूपुरता मर्यादित असू शकत नाही. सार्वजनिक ..

कवि कुलगुरू कालिदास - एक रससिध्द कवि

कवि कुलगुरू कालिदास - एक रससिध्द कवि..

हे विरोधक आहेत की, अंतर्गत शत्रू?

सत्ताधारी पक्षाचे विरोधकच जर देशहित बाजूला ठेवून देशाच्या शत्रूंचा अजेंडा रेटत असतील तर यापेक्षा दुर्दैव तरी कोणते..? राजकारण करावे, खुशाल करावे. राजकारण तर आधीच इतके गढूळ झालेले आहे की वैचारिक मतभेदांची जागा केव्हाच वैयक्तिक शत्रुत्वाने घेतलेली आहे. मोदींची पत्नी, आई, डिग्री, सूट वगैरेंवर गलिच्छ वैयक्तिक राजकारण केले जाते, त्यावरही कोणाचा आक्षेप नसावा, कारण ही लोकशाही आहे...

नागरिकत्व (सुधारणा) कायदा बौद्ध समुदायाच्या हिताचा

1987 मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार बांग्लादेशातील पोलिसांनी मनमानी करत चकमा बौद्ध कार्यकर्त्यांना बंदी बनवले व त्यांच्यावर अनन्वित अत्याचार सुरू झाले. या अत्याचारांनी अनेक बौद्ध कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. महिला व बौद्ध तरुणींचे शारीरिक बलपूर्वक शोषण झाले. बौद्ध भिख्खूंची हत्या करण्यात आली. बौद्ध विहारांची लूट करून त्यांना उध्वस्त केले गेले. परिणामी हजारो बौद्ध नागरीकांनी भारतामध्ये प्रवेश केला व भारताचे शरणार्थी म्हणून जीवन जगण्यास सुरुवात केली. ..

हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी

There is a point at which even justice does injury. सोफोकल्स या विचारवंताचे हे वचन हैदराबाद एन्काऊंटरला नेमके लागू होणारे आहे. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस चकमकीत ठार झाले. एक न्याय झाला. मात्र, तरीही या न्यायाने काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि बहुधा यामुळेच सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी या एन्काऊंटरची चौकशी करण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली असून, सेवानिवृत्त न्यायाधीश न्या. विकास शिरपूरकर या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना सहा महिन्यांत आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयास ..

अस्वस्थतता असू द्या, अविचार नको!

सध्या महाराष्ट्रात पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या बातम्या गाजत आहेत. या दोन्ही नेत्यांविषयी अशा बातम्या पेरल्या जात आहेत की, ते भाजपा सोडण्याचा निर्णय करतील. एकनाथराव खडसे यांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीला निवडणुकीत पाडण्यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी प्रयत्न केला. तसेच पंकजा मुंडे यांना पराभूत करण्यासाठी काही भाजपा नेते कारणीभूत आहेत. हे नेते कोण आहेत, याची माहिती त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना दिली आहे. ..

‘सेक्युलर’मुळे होणारा घोळ...

42 वर्षीय बिंदू अम्मीनी या महिलेने शबरीमलै येथील स्वामी अय्यप्पा मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केला. परंतु, तो अय्यप्पा भाविकांनी हाणून पाडल्यानंतर अम्मीनी थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्या आणि आपल्याला या मंदिरात प्रवेशासाठी पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली. 5 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सांगितले की, 2018 सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या निर्णयाच्या आधारे अम्मीनी मंदिरात प्रवेश करण्यासाठी पोलिस संरक्षण मागत आहेत, तो निकाल काही अंतिम ..

औपचारिकच; पण...

नवे मुख्यमंत्री तर ठाकरेच आहेत. वाणीचा वारसा तर त्यांच्याकडे पिढिजात आहे. नेत्यांच्या अशा छान-छान बोलण्याने राज्याचे मात्र भले होत नाही. अर्थात हा ‘टिझर’ होता. खरा चित्रपट आता 16 डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात गांभीर्याने विचार करावे असे राज्यपालांचे भाषणच काय ते होते. अर्थात राज्यपालांनी नव्या सरकारचा जो काय कार्यक्रम ठरला आहे, तोच त्यांच्या भाषणात सांगितला. ..

क्रिकेट आणि राजकारणात काहीही शक्य...

क्रिकेट आणि राजकारणात काहीही शक्य.....

बत्तीस मण सुवर्णसिंहासन : एक राष्ट्रजागरण अभियान

छत्रपती शिवरायांची गणना भारतातील सर्वश्रेष्ठ राष्ट्रपुरूषात होते. निष्ठावंत, कर्तव्यनिष्ठ, असामान्य मुत्सद्दी, रणझुंजार, सेनानायक हे त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू आहेत. राष्ट्रीयत्वाच्या भावनेने ते भारलेले होते. त्यांनी समाजापुढे एक जीवनध्येय ठेवले जीवनात श्रेयस आणि प्रेयस काय व प्रसंगी प्राणार्पण करून ध्येय कसे जपावे ..