खान्देश

खान्देशासाठी खुश खबर; रबर बलून बंधाऱ्यास केंद्राची मान्यता

खान्देशच्या सिंचन क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविणारा आणि शेतकरी बांधवांच्या जिव्हाळाचा प्रश्न असलेल्या सात बलून बंधाऱ्यांना तातडीने मान्यता प्रदान करण्यात यावी यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी गेल्या पंधरवाड्यात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्रसिंग शेखावत,जल आयोगाचे अध्यक्ष आर के जैन, जलशक्ति मंत्रालयाचे प्रधान सचिव यू.पी.सिंग यांच्याकडे केलेल्या भक्कम पाठपुराव्याला आज अखेर यश मिळाले असून आज जल आयोगाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत सात बलून बंधाऱ्यांना मंजुरी मिळून गिरणा खोरे समृद्ध होण्याचा मार्ग मोकळा ..

पाळधी येथे आढळला १० फुटी अजगर; सर्पमित्राने दिले जीवदान !

सोमवार रोजी पहुर परिसरातील शेतकरी फकीरा नथ्थु घोंगडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये मोटार ठेवायच्या जागेवर बसलेल्या अजगराचे दर्शन शेतकरी फकीरा घोंगडे यांना घडले. सदर अजगराचे अगडबंब रूप पाहील्यानंतर त्यांनी तात्कळ पाळधी येथील नाना माळी या सर्पमिञाला बोलविले. त्यांनी या अजगरास पकडून सुरक्षित स्थळी सोडले. ..

साडे सात लाख चोरीचा मुद्देमाल फिर्यादीस पुन्हा सुपूर्द

जळगाव येथे २७ सप्टेबर रोजी झालेल्या घरफोडीत चोरट्यानी लाखो रुपयाची मुद्देमाल व रोकड लंपास केली होती. त्या प्रकरणी जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला यश आले होते. सदर चोरीतील चोरट्यांना पकडून त्यांच्याकडील मुद्देमाल पोलिसानी हस्तगत केला होता. हा मुद्देमाल पोलिसांनी नेहेते कुटुंबियांना परत केला आहे. त्यामुळे नेहेते कुटुंबीय सुखावले आहे...

जामनेरच्या राहुल चव्हाण यांची जलसंसद युवा पुरस्कारासाठी निवड

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील राहुल चव्हाण यांची दिल्ली येथे या महिन्यात वितरित होणाऱ्या मराठवाडा जलसंसद पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या जलविषयक अतुलनीय कार्याबद्दल ९ डिसेंबर रोजी त्यांना केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ..

वाढदिवसाच्या दिवशी झाला अपघात, जखमीची मृत्यूशी झुंज

शहरातील बनोटीवाला फार्म हाऊस पुढे दि.५ रोजी सायंकाळी भडगांवहून मोटरसायकलवर भडगांव येथील आपल्या घरी येत असताना त्याचा अपघात झाला. घरी नातेवाईक व आई वडील वाढदिवस असल्याने वाढदिवस साजरी करण्यासाठी वाट पाहत होते. परंतु, घरी अपघाताचीच बातमी पोहचल्याने महाजन कुटुंबीयांवर शोक कळा पसारली. ग्रामस्थांना हि या घटनेने धक्का बसला. ..

कोअर कमिटीच्या बैठकीसाठी भाजप पदाधिकारी जळगावात

जळगावात आज विभागीय कोअर कमिटीच्या निमित्ताने भाजपचे [प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शहरात दाखल झाले आहेत. भाजपकडून पक्षातील नाराज असलेल्या नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मनधरणी साठी हा सारा आटापिटा सुरु असल्याची चर्चा आहे...

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक रद्द करा; मुस्लीम मंचाची मागणी

बहुचर्चित व वादग्रस्त नागरिकत्व कायद्या दुरुस्ती विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने ते विधेयक संसदेत येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने भाजप सरकार आपल्या संख्याबळाच्या आधारावर तो लोकसभा व राज्यसभेत सुद्धा मंजूर करून घेऊ शकते, म्हणून त्यास जळगाव जिल्हा मुस्लिम मंचातर्फे रद्द करण्याची मागणी करण्यात आली...

राष्ट्रीय छात्र सेने मार्फत प्लास्टिक विल्हेवाट मोहीम

राष्ट्रीय छात्र सेनेच्या एडिशनल डायरेक्टर जनरल (ADG) मुंबई यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी,अधिकारी दिनाक १ ते १५ डिसेंबर १९ हा स्वच्छता पंधरवडा साजरा करीत आहेत. या पंधरवड्यात स्वच्छते बाबत विविध उपक्रम राबविण्याचे काम सुरू असून यातून समाज प्रबोधन व्हावे हा देखील एक उद्देश आहे. या कार्यक्रमानुसार येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि पि आर हायस्कूल मधील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट यांनी आज सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. ..

भावी पिढीसाठी मृदा संवर्धन गरजेचे- आ. मंगेश चव्हाण

जागतिक मृदा दिनानिमित्त पंचायत समिती DRDA हॉल येथे कृषी विभाग चाळीसगाव तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मंगेशदादा चव्हाण होते. पुढच्या पिढी साठी मृदा संवर्धन गरजेचे आहे . आरोग्यासाठी साठी चांगल्या मातीतील सकस धनधान्य निर्माण होऊ शकते. आपण सारे मातीतील लोकं आहोत. मातीच्या आरोग्यासाठी आपण सारे मिळून काम करूया, असे आपल्या भाषणा दरम्यान त्यांनी मनोगत व्यक्त केले. ..

घरकुल योजनेचा थंड कारभार, २१०० कामे कधी होणार पूर्ण?

तालुक्यातील बेघर नागरीकांसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा (डी.आर.डी.ए) मार्फत सन २०१९ ते २०२० दरम्यान एकूण २ हजार १०० घरकुलांचे उद्यीष्ट आले असून विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यात दिरंगाई झाली असून येथील कर्मचा-यांच्या मनमानी कारभारामुळे ही लाभार्थी कंटाळले आहेत तरी या समस्येकडे गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे...

चोरीचे फोन विकताना चोरट्यांना रंगेहात पकडले ; पोलिसांची बहादुरी

पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून १८ मोबाईल फोन चोरल्याचे काबुल करण्यात आले आहे. दहिवद येथील दोन इसम हे काही महागडे टच स्क्रीन मोबाईल चोरुन लपुन विक्री करीता ग्राहक शोधत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने स.पो.नि. पाटील यांनी पथक तयार करुन सदर व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला व चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या...

रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यु

तालुक्यातील निंभोरा स्टेशन नजीक धावत्या रेल्वे गाडीतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ..

जळगावात 7 व 8 डिसेंबरला रंगणार ‘पुरुषोत्तम करंडक’

येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी जळगाव ही शैक्षणिक संस्था निव्वळ खान्देशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून स्वतंत्र ओळख प्राप्त केलेली संस्था आहे. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी आपला अमृत महोत्सव साजरा करीत आहे. याच महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्रीय कलोपासक पुणे आणि के.सी.ई. सोसायटी संचलित आणि मु.जे. महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव पुरस्कृत कान्ह ललित कला केंद्र जळगावतर्फे पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा 2019 - 20 चे दि. 7 व 8 डिसेंबर रोजी होत ..

अखेरीस वॉटरग्रेसने जीपीएस व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम मनपात केली सुरू

19 अटींपैकी फक्त 3 अटी शर्तींची पूर्तता, त्रुटींच्या नोटिसांचा धडाका..

जे कायम नवीन असतं ते 'महापुराण'

पुराण म्हणजे जुनं नव्हे. पुराण म्हणजे पुरा-अवि-नवं. हे कितीही जुनं असलं तरी सतत नवीनच रहायला हवं म्हणून पुराण आहे. देव कितीतरी प्राचीन असले तरी ते आपल्यासाठी कायम नवीन प्रसन्नित असतात. जे कधीही जुने न वाटता कायम नवीन असतं त्याला महापुराण म्हणतात, असे स्वामी श्री श्रवणानंदजी सरस्वतीजी महाराज यांनी सांगितले...

आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी- अभाविपची मागणी

नंदुरबार: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेतर्फे हैद्राबाद स्थित पशुवैद्यक डॉक्टर प्रियंका रेड्डी हिच्यावर बुधवारी सायबराबाद येथे झालेल्या अमानुष बलात्कार व हत्येविरोधात शहरात संवेदना कँडेल मार्च (मूक मोर्चा) काढण्यात आला. या संवेदना रॅली मध्ये शहरातील नागरिक व परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.    अभाविप नंदुरबार जिल्हा संयोजक निलेश हिरे यांनी ह्या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला व ह्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी ..

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न

जळगाव: शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजेश जाधव उपस्थित राहिले होते. तसेच विवेकानंद प्रतिष्ठानचे सह कोशाध्यक्ष पुनम मानूधने, प्रशासकीय अधिकारी दिनेश ठाकरे, क्रीडा प्रमुख सूर्यकांत पाटील, एन सी सी चे हवालदार हेमा राम तसेच मुख्याध्यापक अमित सिंग भाटिया आणि प्राथमिक विभागाचे प्रमुख डॉ. विनोद पाटील व समन्वयिका ..

पिंपळकोठा गोळीबार प्रकरणातील एक आरोपी ताब्यात

तालुक्यातील पिंपळकोठा येथे पिल्लुक देवीच्या यात्रोत्सवादरम्यान दोन गटात वाद निर्माण होऊन थेट गोळीबार होण्याची घटना घडली होती. त्या गुन्ह्यातील एक फरार आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित आरोपी शोधण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. ..

डॉक्टर प्रियांका रेड्डी अत्याचार प्रकरणी जागरूक मुस्लीम मंचतर्फे निषेध

जळगाव शहरातील जागरूक मुस्लिम मंच तर्फे तसेच शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन माननीय मुख्यमंत्री तेलंगणा राज्य, तसेच माननीय अमित शहा केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांना प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर बेडसे यांच्यामार्फत निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची माग्निकेली आहे. ..

धुळ्यात भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू

धुळ्यामध्ये पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. मजुरांना घेऊन जाणारी पिकअप व्हॅन उस्मानाबादकडे जात असतांना ही घटना घडली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ..

आंतरमहाविद्यालयीन क्रिक्रेट स्पर्धेत रायसोनी महाविद्यालय विजयी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव क्रीडा विभागाची आंतर महाविद्यालयीन क्रिक्रेट स्पर्धा मु.जे. महाविद्यालयात सुरु असून ता. २८ रोजी रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या संघाने सहजपणे धनाजी नाना समाजकार्य महाविध्यालयाच्या संघाला नमवत विजेतेपद पटकावले. ..

महिलांनी संघटित होऊन कार्य केल्यास त्या खाजगी आयुष्यात सुद्धा यशस्वी होतात- अॅड.शुचिता हाडा

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी जाणाऱ्या महिला संघास निरोप..

जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली

२६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्लयात ३४ परदेशी नागरिकांसह १९७ जण मृत्युमुखी पडले होते...

कुपोषण मुक्तीसाठी व्हाउचर योजनेस प्रारंभ सुरू

नंदुरबार जिल्हा : गर्भवती मातांसाठी सक्षम पाऊल..

3 हजार जळगावकर धावले स्वत:च्या आरोग्यासाठी

   जळगाव, 24 नोव्हेंबरसागर पार्कचे मैदान, पहाटे चारची वेळ आणि स्पीकरवर आवाज येतो ’ हॅलो जळगावकर.... टाटा एआयजी खान्देश रनसाठी तयार आहात ना...’ त्याच्या प्रत्त्युत्तरात उत्तर येते. ‘हो...य...’ ‘चला तर मग थोडा वार्मअप करू या..’ आणि सुमारे 3 हजार जळगावकर रेकार्डप्लेअरच्या तालावर वार्मअप करू लागतात! वार्मअप होताच घोषणा होते 21 किमी रनअप साठी स्पर्धकांनी जावे.....निमित्त होते जळगाव रनर्स गृपने आयोजित केेलेल्या ‘टाटा एआयजी खान्देश रनचे’  जळ..

शिक्षकांची सेवानिवृत्तीनंतरही कार्यमग्नता भूषणावह - खा. उन्मेश पाटील

सेवानिवृत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संस्थेचे जेष्ठतम सेवानिवृत्त शिक्षक सदस्यांचे सत्कार संपन्न..

जळगाव विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरण्यासाठी सोय करावी

उडाण योजनेअंतर्गत दिलेले वाहतूक मार्गावरील विमान वाहतूक व्यवस्था काही ना काही बहाणे दाखवून रद्द करत आहेत. असे सांगत खा. रक्षा खडसे यांनी केंद्र सरकार कडे जळगाव विमानतळ येथे रात्रीच्या वेळी विमान उतरतील अशी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. ..

पिसावर ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिमा अनावरण

महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरणाचा सोहळा झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुकरमुंडाचे माजी सरपंच डॉ.विजय पटेल हे उपस्थित होते. प्रतिमा अनावरण पिसावरचे सरपंच अशोक लाश्या ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले...

वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभारा विरोधात शिवसेनेचे आंदोलन

शहरातील वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे रिक्षा चालक अडचणीत असल्याचे कळताच शिवसेना तालुका प्रमुख यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले...

थकबाकीपोटी फुले मार्केटमधील 16 गाळे ‘सील’

महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील अनाधिकृत कब्जेदार व थकबाकीदार असलेल्या 16 गाळेधारकांच्या गाळ्यांना गुरूवारी महापालिकेच्या महसूल विभागाचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी पंचनामे करून सील लावले. या कारवाईमुळे अनाधिकृत कब्जेदार थकबाकीदार गाळेधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई सुरु असतांना दोन्ही व्यापारी संकुलात स्मशान शांतता पसरली होती. या कारवाईबाबत गाळेधारक आपापसात याबाबत काहीतरी केले पाहीजे असल्याची चर्चा करतांना दिसत होते.2012 पासून महात्मा फुले व सें..

पहूर ग्रामीण रुग्णालयातील सेवा एक महिन्यांपासून ठप्प, रूग्णांचे हाल

पहूर ता.जामनेर दि. १७- वैद्यकिय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे येथील ग्रामीण रूग्णालयाची सेवा गेल्या एक महिन्यांपासून बंद असल्याने गोर- गरीब रुग्णांचे मोठया प्रमाणात हाल होत आहेत . दरम्यान जिल्हाधिकारी डॉ . अविनाश ढाकणे यांनी भेट देवून आठवडा उलटला तरी एकही डॉक्टर हजर न झाल्यामुळे त्यांची भेट निष्फळ ठरली आहे ...

राज्यस्थरीय तेली सामाज मेळाव्यात 1905 वधुवरांनी दिला परिचय

राज्यस्थरीय तेलिसमाज वधुवर पालक परिचय मेळाव्यात 1905 वधू वरांनी मान्यवरांच्या उपस्थितीत परिचय दिला.  येथील पुष्पमती गुळवे हायस्कूल च्या प्रांगणात आयोजित राज्यस्थरीय वधुवर पालक परिचय मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याचे उद्घाटन आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरण्गाव चे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक सुरेश चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे नगरसेवक राजेंद्र चौधरी युवराज करंकाळ जिवन चौधरी माजी महापौर विष्णू भंगा..

शिवजयंतीनिमित्त‘शिवदौड’

   शिरपूर, १८ फेब्रुवारीमराठा व्यापारी संघटनेतर्फे शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला ‘शिवदौड’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. शहरातील पित्रेश्‍वर कॉलनी मैदानापासून सकाळी ७.३० वा. मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धा सुरू होईल. उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार चंद्रशेखर देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, मुख्याधिकारी अमोल बागुल, निरीक्षक संजय ..

जिल्हाधिकार्‍यांची भुसावळ तहसीलला भेट

कार्यालयीन कामकाजाचा आढावा  भुसावळ, १८ फेब्रुवारीनव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सोमवारी भुसावळ तहसील कार्यालयातील विविध कामकाजांचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात उपस्थित होते.  जिल्हाधिकारी यांनी कामकाजाचा आढावा घेताना प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी नुकतीच जाहीर केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थी शेतकर्‍यांच्या याद्या तत्काळ संगणकावर लोड करून पुढील कार्यवाही ..

‘जिवंतपणी’च केले उत्तरकार्य

  जळगाव, १८ फेब्रुवारीहिंदूच्या जीवनात आध्यात्माचा प्रभाव आहे. परलोकाची आस त्यातूनच लागून असते. कर्मकांडाचा प्रभाव असल्याने मृत्यूनंतर १३ व्या दिवशी उत्तरकार्य करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात संन्यासी संन्यास घेतानाच त्यांचे उत्तरकार्य उरकून घेत असतात. परंतु ज्यांच्या पश्‍चात वारस नाही, अशांना त्यांच्या उत्तरकार्याची चिंता सतावत असते.धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील जमुनाबाई चिंधू चौधरी (६५) या महिलेने जिवंतपणीच उत्तरकार्याचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. जमुनाबाई या ..

राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेतून वाद उद्भवण्याची शक्यता

डॉ. गोविंद गारे यांच्या पुस्तकात आर्यांबद्दल वादग्रस्त मजकूर  पेपर २ मध्ये पान नं. ३४ वरील तो उतारा.  जळगाव, १७ फेब्रुवारीसंपूर्ण महाराष्ट्रात रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत पेपर २ मधील पान नं. ३४ वरील ‘खैंबरखिंडीमार्गे बाहेरुन आलेल्या आर्यांमुळे भारतातील मूळनिवासी प्रजा आर्यांच्या त्रासामुळे डोंगर दर्‍यात निघून गेली, त्यामुळे आदिवासी लोकांचे अजूनही हाल चालू आहेत’ अशा आशयाच्या उतार्‍यामुळे आता नवीन वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.  भारतातील ..

स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ, राष्ट्रीय सुरक्षा मंचातर्फे ‘अब की बार आरपार’ मोर्चा २२ रोजी

   जळगाव, १७ फेब्रुवारीपुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. त्याअनुषंगाने भारतीय सैनिकांच्या व सरकारच्या पाठबळासाठी शुक्रवार, २२ रोजी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ व राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा मंचचे जिल्हाप्रमुख अनिल सोनवणे, शहर कार्यावाहक राजेश ज्ञाने, रा. स्व. संघाचे कार्यकर्ते कवी कासार आदी ..

भूमिपूजन सोहळा अविस्मरणीय, ऐतिहासिक होणार : आ. उन्मेश पाटील

   चाळीसगाव, १७ फेब्रुवारीशहरातील सिग्नल चौकात नगरपालिकेच्यावतीने उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या जागेचा तिढा गल्ली ते दिल्ली सत्ता आल्याने मार्गी लागला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या जागेच्या तिढ्याबाबत आग्रह धरला होता. अखेर तो सुटला असल्याने २० रोजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आ. उन्मेश पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.  कोल्हापूरचे युवराज ..

भाजपातर्फे धरणे आंदोलन, शहिदांना भावपूर्ण श्रध्दांजली

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट पसरली असून, जळगाव जिल्हा भाजपा महानगरतर्फे रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली...

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाची डोकेदुखी वाढणार ?

शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्री गाठणार भुसावळ, १७ फेब्रुवारीरावेर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक रविवारी दु ४:०० वाजता भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. याबैठकीत आगामी लोकसभा निवडणूक बाबत चर्चा करीत असतांना सर्वां..

मतदान टक्केवारी वाढीसाठी युवकांची भूमिका महत्त्वाची : सिद्धेश्वर लटपटे

  जामनेर, १४ फेब्र्रुवारीआगामी काळात देशात कोणी नेतृत्व करावे, यासाठी देशाची महत्त्वाची लोकसभा निवडणूक आहे, त्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आगामी काळात युवकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत सिद्धेश्वर लटपटे यांनी अभाविपच्या बक्षीस वितरण समारंभात व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर अभाविपचे पूर्व कार्यकर्ते रवींद्र झाल्टे, जिल्हा संयोजक प्रमोद सोनवणे, तालुका प्रमुख मनोज जंजाळ, कार्यक्रम प्रमुख शुभम मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या ..

गरुड महाविद्यालयात ‘राष्ट्रीय जीएसटी’ परिषद

राष्ट्रीय स्तरावरील संशोधकांचा सहभाग, शोधनिबंध संकलन स्मरणिकेचे प्रकाशन   शेंदुणी, ता. जामनेर १४ फेब्रुवारीयेथील गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथे जीएसटी या विषयावर राष्ट्रीय परिषद झाली. जीएसटीचे विषयक राष्ट्रीय स्तरावरील संशोधकांनी यात सहभाग घेतला. महाविद्यालयीन गीत जीवन राठोड प्रतीक्षा गुजर व काजल चव्हाण यांनी गायिले. प्रास्ताविक परिषदेचे सचिव डॉ.वसंत पतंगे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते शोधनिबंधांचे संकलन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर दी शेंदुर्णी सेकं. एज्यु.चे अध्यक्ष ..

शैक्षणिक क्षेत्रात पी.बी.पाटील यांचे कार्य उल्लेखनीय : चिमणराव पाटील

पारोळा, १४ फेब्रुवारीकै. तात्यासाहेब रु. फ. पाटील शिक्षण मंडळाचे माजी सचिव व बोळे येथील महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. बी. पाटील यांचे संस्थेच्या विस्तारात मोलाचे योगदान असून संस्थेच्या सर्व शाळांमध्ये शिस्त, परिपाठ संकल्पना, नावीन्यपूर्ण उपक..

मेहतर समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन

मेहतर वाल्मीकी, सुदर्शन समाजबांधवांसह सफाई कामगार संघटनांचे पहिले सामाजिक राज्यस्तरीय महाधिवेशन भुसावळ येथे येत्या २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे..

आशा फाउंडेशनतर्फे विनामूल्य सूत्रसंचालन कार्यशाळा

   जळगाव, १४ फेब्रुवारीआशा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ‘उन्नतीसाठी दस्तक’ या महिलांच्या स्वप्न साकारणार्‍या उपक्रमांतर्गत २० ते २८ फेब्रुवारीदरम्यान विनामूल्य सूत्रसंचालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या महिलांना विशेषतः गृहिणींना या संधीचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आशा फाउंडेशन, प्लॉट नं. ११/अ, महाबळ कॉलनी, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक गिरीश कुळकर्णी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.  या उपक्रमांतर्गत प्रथम महिलांची ..

विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी व्यसनांपासून दूर राहावे

‘युवारंग युवक महोत्सव’ उद्घाटनप्रसंगी ना. गिरीश महाजन यांचा सल्ला   जळगाव, १४ फेब्रुवारीसर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली असून जिद्द व मेहनतीशिवाय यश प्राप्त होणे शक्य नाही. त्यामुळे ज्योतिषावर विश्वास न ठेवता परिश्रम करा आणि व्यसनांपासून दूर राहा, असा सल्ला वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन करताना कलावंत विद्यार्थ्यांना दिला.  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाला गुरुवार, ..

रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजवरून ‘खाकी’त जुंपली

जळगाव रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून यात सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यावरून लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलात चांगलीच जुंपली असल्याचे चित्र आहे...

आर.आर.विद्यालयाच्या शिक्षकाला मारहाण

   जळगाव, १४ फेब्रुवारीशहरातील विजयनगरात दोन ते तीन तरुणांनी आर.आर. विद्यालयाचे शिक्षक गिरीश रमनलाल भावसार (वय ४५) यांची दुचाकी थांबवून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली. दरम्यान भावसार यांच्या नाकाला जबर मार लागला आहे.  खोटेनगर येथे वास्तव्यास असलेले गिरीश भावसार हे आर.आर.विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून ८ वी व १० वीतील मराठी, समाजशास्त्र विषय शिकवितात. ते नेहमीप्रमाणे शाळेतून आपल्या दुचाकीने (एम.एच. १९, ए.क्स. -८०५७) गावात जात होते. दरम्यान, ..

सर्व बहुजनांनी एकत्र येण्याची गरज - ऍड. प्रकाश आंबेडकर

  मुक्ताईनगर, १४ फेब्रुवारीलुटारू व नफेखोर शासन उंचविण्यासाठी तसेच लोकांचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी वंचितांना न्याय व सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी सर्व बहुजनांनी एकत्र येण्याची गरज आहे त्यासाठीच वंचित बहुजन आघाडीची निर्मिती करण्यात आली असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित सत्तासंपादन मेळाव्याप्रसंगी केले.  येथील एस. एम. कॉलेज शेजारील बर्‍हाणपूर रोडलगत ..

अमळनेर मतदारसंघात विकासकामांसाठी १० कोटी

आ. शिरीष चौधरी यांची माहिती, विविध ठिकाणी होणार कामे   अमळनेर, १३ फेब्रुवारीयेथील मतदारसंघात अमळनेर व पारोळा तालुक्यातील गावांमध्ये विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला असून यामुळे विकासाचा अनुशेष भरून निघणार आहे. आता पुन्हा मतदारसंघातील ग्रामपंचायत, रस्ता कॉंक्रिटीकरण, गटार, सभागृह, सभामंडप, स्मशानभूमी, प्रवेशद्वार, शौचालय आदी विकासकामांसाठी १० कोटी ६० लाख एवढा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ. शिरीष चौधरी यांनी दिली आहे.   यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री ..

‘मेरा परिवार, भाजपा परिवार’ भालोदला अभियान जल्लोषात

   फैजपूर, १३  भारतीय जनता पार्टीचे पूर्वघोषित राष्ट्रीय अभियानांतर्गत मेरा परिवार भाजपा परिवार हा उपक्रम १२ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्या घरावर दर्शनी भागात भारतीय जनता पार्टीचे ध्वज व स्टिकर लावायचा आहे.   या अभियानांतर्गत यावल तालुक्यात भालोद येथे आ. हरिभाऊ जावळे यांनी आपल्या निवासस्थानी पक्षीय ध्वज लावून उपक्रमाची जल्लोषात सुरुवात केली. याप्रसंगी आ. जावळे सपत्नीक कल्पना जावळे, सुमन जावळे, कृषिभूषण नारायण चौधरी, भाजपा ..

न्हावीत मोबाईल टॉवर ‘सील’

महसूल विभागाची कारवाई; सात दिवसांच्या वाढीव मुदतीनंतरही थकबाकीच   न्हावी, ता. यावल, १३ फेब्रुवारी परिसरातील मोबाईल टॉवर कंपन्यांना ७ दिवसांची वाढीव मुदत देऊनही ७३ हजार ३६० रुपयांची महसूलची बाकी न भरल्याने वोडाफोन, एअरटेल, इंडस टॉवर या मोबाईल कंपन्यांचे टॉवर पुन्हा १३ रोजी महसूल विभागाने सील केले. त्यामुळे परिसरातील मोबाईल नेटवर्क नॉट रिचेबल आहे.  न्हावी परिसरात ५ मोबाईल टॉवर असून त्यापैकी मुदतीत केवळ एक मोबाईल टॉवरने बिनशेती सारा तसेच अनधिकृत दंड रक्कम भरणा केला होता. उर्वरित ..

रघुवंशी विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थ्यांकडून ३८ उपकरणे सादर

 नंदुरबार : येथील कै. मोहनसिंग कन्हैयालाल रघुवंशी प्राथमिक विद्या मंदिरात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ३८ उपकरणे सादर केली.  प्रदर्शनाचे उद्घाटन नंदुरबार पं.स. गटशिक्षणाधिकारी ड..

जैन इरिगेशनला ९१.५ कोटींचा करपश्चात नफा

२०१८-१९ तिसर्‍या तिमाहीचे लेखापरिक्षण न केलेले निकाल जाहीर  जळगाव, १३ फेब्र्रुवारीभारतातील कृषी व सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या तिसर्&#..

भुसावळ न.प.च्या सभेत १५ मिनिटात १५ विषय मंजूर

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाणीटंचाई व पाणीपुरवठ्यासह विविध विकासकामांच्या १५ विषायांना १५ मिनिटांच्या चर्चेत मंजुरी देण्यात आली...

रसिकांचा भरभरून प्रतिसाद;‘एपिक’ मोबाईल फोटो प्रदर्शनाचा आज समारोप

   जळगाव, १३ फेब्रुवारीजैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त मोबाईलने काढलेल्या फोटोंचे ‘एपिक’ या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाचा समारोप उद्या (ता. १४) होत आहे. या प्रदर्शनाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. रसिकांनी निवडलेल्या पाच मोबाईल छायाचित्रकारांना समारोपाच्या वेळी गौरविण्यात येणार आहे. समारोपाचा कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात संध्याकाळी साडेसहाला जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे आणि जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या उपस्थितीत होणार आहे.  ..

जिल्हाधिकारी कार्यालयात बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात वाहनतळाची व्यवस्था असूनही वाहनतळ सोडून अन्य जागी वाहने उभी करणार्‍या वाहनधारकांनी विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध कामांसाठी जिल्हाभरातून अनेक नागरिकांसह अन्य अधिकारी..

भुसावळात ट्रकचालकाला मारहाण : ३६ हजार लुटले

 भुसावळ, १३ फेब्रुवारीजामनेर रोडवरील डॉ. भिरुड हॉस्पिटलसमोर ट्रकसमोर दुचाकी आडवी लावून ट्रकचालकास बेदम मारहाण करत त्याच्याजवळील ३६ हजार ५०० रुपये जबरदस्तीने नेल्याची घटना बुधवार, १३ रोजी घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ट्रकचालक इम्रान मोहंमद ग..

गोलाणी मोबाईल चोरी प्रकरणातील मोबाईलसह संशयित ताब्यात

   जळगाव, १३ फेब्रुवारीशहरातील गोलाणी व्यापार संकुलात ११ फेब्रुवारीच्या रात्री ८.३० ते १२ च्या सकाळी ५ वाजेदरम्यान माऊली मोबाईल या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने दुकानातून १ लाख ६५ हजार ४०० रुपये किमतीचे १३ मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  या गुन्ह्यात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील अज्ञात इसमाचा शोध घेत असताना शहर पो.स्टे.चे पोउनि राजकुमार हिंगोले, पो.हे.कॉ. विजयसिंग पाटील, पो.ना. विकास महाजन, प्रितम पाटील यांना मिळालेल्या ..

एरंडोलला जमावाकडून पोलिसांना मारहाण

आठ संशयितांना ५ दिवस पोलीस कोठडी, गावात तणावपूर्व शांतता एरंडोल, १३ फेब्रुवारीगायींची अवैध वाहतूक प्रकरणी विखरण रिंगणगाव रस्त्यावर मंगवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांच्यासह अन्य पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी आठ संशयिता..