श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी

    दिनांक : 02-Aug-2022
Total Views |
जळगाव : नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते.या दिवशी नागाची पूजा केली जाते व त्यांचा आशीर्वाद घेतला जातो आणि मित्रांनो असेच करत राहिल्याने आशीर्वाद आपणास मिळतो.
 


Nagpanchami 
 
 
हा सण साजरा करण्या मागील परंपरा
 
आज पण नागपंचमी विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत . श्रावण महिन्याला सणांचा महिना असे म्हणतात या महिन्यात येणारा पहिला अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी श्रावण महिन्याच्या नागपंचमीला पंचमी असेही म्हणतात. नाग या प्राण्याबद्दल भावना समाजात जवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नागदेवता ची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.
 

varul 
 
 
वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. या दिवशी गावातील स्त्रिया एकत्र मिळून पारंपारिक वेषभूषा करून वारूळा जवळ जाऊन नागदेवतेची पूजा करतात.किंवा पाटावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढून त्याला दूध लाह्या आघाडा दूर्वा हळद, कुंकू अक्षदा वाहून पूजा करतात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून वाचवला जावो हे उपवास करण्यामागे एक कारण आहे.
 
या सणाला विशिष्ट पदार्थ बनवितात 
 
या सणाला विशेष गव्हाची खीर आणि गव्हाच्या कणके पासून वाफवून कान्होले बनविले जातात . काही लोक पुराणाचे पावटे देखील बनवितात . हे पदार्थ बनविण्यामागे एक कारण आहे. पूर्वापार चालत आलेली अशी समजूत आहे कि, नागपंचमीला चुली वर तवा ठेवत नाहीत . त्यामुळे पोळी हि शेकून न बनविता भिजविलेल्या कणकेला पोळीसारखी लाटून तिचे चार पूड एकत्र करून म्हणजे खणाच्या आकाराची तिची घडी करून तिला दाथरवर वाफवली जाते महाराष्ट्रातील खान्देशात यालाच कान्होले असे म्हणतात. तसेच या दिवशी कुठलीही भाजी कापत नाहीत .वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो.

khir 
 
 
 
आपल्या संस्कृतीमध्ये नागाची पूजा अनेक प्रकारे केली जाते शिवशंकर आपल्या गळ्यामध्ये नाग धारण करतात. भगवान विष्णूंचा तर नाग हि शेष आहेत कारण ते नागाच्या शेष शय्येवर पहुडले आहेत. गणपती तर आपल्या कमरेला नाग बांधतात. तर या नागाची उत्पत्ती कशी आहे. तर पुराणकथांत प्रमाणे नाग हे काश्यप आणि कद्रू यांचे पुत्र आहेत यातील आठ नाग प्रसिद्ध आहेत आठ नागांची नावे अशी
 
पहिला अनंत, दुसरा वासुकी, तिसरा पद्म, चौथा महापद्म, पाचवा तक्षक, सहावा कारकोटक, सातवा शंख आठवा कुलिक किंवा कालिया तर हे जे नाग आहेत हे नाग लोकांना त्रास द्यायला लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडा कडून मारले जाल म्हणूनच करून हा सापाला खातो. 
 
सापामुळे उंदरांची संख्या आटोक्यात राहते तो शेतकऱ्याचा मित्र देखील आहे. नागपंचमी सणाचा समाजात जनजागृती करणे हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखं खऱ्या अर्थाने साजरा झाला असे म्हणता येईल.
 
नाग पंचमी सणाबद्दल थोडक्यात माहिती
 
या सणाची सुरुवात हि खूप प्राचीन काळापासून झालेली आहे राजा परीक्षित नावाचा एक राजा होऊन गेला.एकदा हा राजा परीक्षित जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला असताना त्याला खूप तहान लागली होती. तेव्हा त्याला समोर एक झोपडी दिसली आणि तिथे त्यान पाहिलं शेजारी एक एक आश्रम होता तिथे तो गेला तो आश्रम एका ऋषींचा होता.  तिथे ऋषी तपश्‍चर्या करीत बसले असताना या राजाने ऋषींना पिण्यास पाणी मागितले. मात्र तपश्चर्येला बसले ऋषींनी राज्याकडे लक्ष दिले नाही. यामुळे राजाला अतिशय राग आला.  आणि राजाने ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला एक साप टाकला आणि जवळच त्या ऋषींचा पुत्र तिथे शेजारी होता. त्याने पाहिलं व त्याला अत्यंत राग आला आणि त्याने राजाला शाप दिला.  हे राजा तुला सातव्या दिवशी दक्षक नावाच्या सपाकडून तुला सर्पदंश होईल आणि त्यातच तुझा मृत्यू होईल.
 
इकडे या शापाने राजा परीक्षित खूप घाबरला व्यापक झाला त्याने घरी येऊन आपल्या राजवाड्यात येऊन हि सर्व माहिती आपल्या कुटुंबियांना दिली.  त्यांना एक मुलगा होता या मुलाने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी एक मोठा यज्ञ सुरु केला. यज्ञ सुरु झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व नाग येऊ लागले आणि स्वतःला झोकून त्या यज्ञ मध्ये जीव देऊ लागले.  त्यानंतर सर्व नाग आस्तिक ऋषींना शरण गेले आणि त्यानंतर आस्तिक ऋषींनी राजाच्या मुलाला सर्व काही जे झाले त्याबद्ल सांगितले. हि सर्व बाब लक्षत घेऊन त्यानंतर परिस्थिती समजावून सांगितली म्हणूनच हा शाप त्याला मिळालेला आहे. त्यानंतर राजाच्या मुलाने क्षमा मागून त्या दिवसापासून नाग देवांची पूजा करण्यास सुरुवात केल्याने त्या दिवसापासूनच नागपंचमी श्रावण महिन्यातील शुभ दिवस म्हणून साजरा केला जातो.
 
नागाचे गाव म्हणून शिराळ्याची जगभर प्रसिद्धी 
 
महाराष्ट्रात नव्हे तर देशात सांगलीच्या 32 शिराळ्याची एक वेगळी ओळख आहे. नागांचे गाव म्हणून शिराळ्याची प्रसिद्धी जगभर आहे. शिराळा गावामध्ये नागाला नेहमीच पूज्य मानले जाते. गावातील प्रत्येक घरात नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा होते. आता ती प्रतीकात्मक स्वरूपात होते. मात्र, या गावात जिवंत नागांची पूजा करण्याची एक प्रथा होती. घरोघरी नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा केली जात असे. त्यामुळे शिराळा नगरीत नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागराजाचे वास्तव्य असायचे. प्रत्येक महिला नागराजाला भाऊ मानून, त्याच्यासाठी उपवास करते आणि नागपूजेनंतर उपवास सोडतात
 
 
.
shirala
 
 
 
शिराळा गावाचा ऐतिहासिक वारसा 
 
शिराळ गावात नागपंचमीच्या दिवशी होणाऱ्या जिवंत नावाच्या पूजेमुळे शिराळा हे जग प्रसिद्ध आहे. पण, या जिवंत नागांच्या पूजेलादेखील ऐतिहासिक वारसा आहे. शिराळा गावात आलेल्या गोरक्षनाथ महाराजांनी आपल्या चमत्कारातून नाग प्रकट केला. त्यानंतर घरोघरी नागांची पूजा होऊ लागली. गावातील महाजन कुटुंबाच्या दारामध्ये गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागणीसाठी पोहोचले होते. तो दिवस नागपंचमीचा होता.
 
दारात पोहचलेल्या गोरक्षनाथ महाराजांनी दीक्षा मागण्यासाठी अनेक वेळा हाक दिली. मात्र, आतून कोणीच लवकर आले नाही.नवनाथांपैकी गोरक्षनाथांनी आपल्या दैवीशक्तीने केला चमत्कार : काही वेळाने घरातील महिला आल्या. त्यावेळी गोरक्षनाथ महाराजांनी त्यांना एवढा उशीर का लागला, याची विचारणा केली. त्यावेळी महिलांनी मातीच्या नागांची पूजा करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर गोरक्षनाथ महाराजांनी त्याच ठिकाणी आपल्या दैवशक्तीतून जिवंत नाग प्रगट केला. आणि जिवंत नागाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर शिराळा नगरीत घरोघरी जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली, अशी आख्यायिका आहे. नागपंचमीच्या दिवशी गावातून जिवंत नागांची मिरवणूकसुद्धा काढण्याची प्रथा त्यानंतर सुरू झाली. शिराळा नगरीतील नागपंचमी पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून भाविकसुद्धा मोठ्या संख्येने दाखल होत असत. शेकडो वर्षे ही परंपरा जोपासली गेली.
 
जिवंत नागाच्या पूजेची शिराळकर ग्रामस्थांची मागणी
 
मात्र 2006 साली प्राणिमित्र व इतर सामाजिक संघटनांनी जिवंत नागांच्या पूजेवर बंदी आणण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर वन्यप्राणी कायद्यानुसार न्यायालयाने जिवंत नागांच्या पूजेवर निर्बंध घातले. त्यानंतर शिराळा नगरीमध्ये जिवंत नागांच्या पूजेची परंपरा खंडित झाली. आजसुद्धा शिराळकर जिवंत नागांचे पूजा करण्याच्या परवानगीची मागणी वारंवार करीत आहेत. सध्या नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांच्याऐवजी प्रतीकात्मक नागांची पूजा करून शिराळकर साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी करतात.