मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे ‘मिक्समॅच’

    दिनांक : 29-Jun-2022
Total Views |
मुंबई आणि परिसरात पावसाने म्हणावा तसा जोर अद्याप पकडलेला नसला तरी आतापर्यंत बरसलेल्या पावसातच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पालिकेच्या ‘मिक्समॅच’ कामांची चांगलीच पोलखोल झाली आहे. तेव्हा, मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची कारणे, सद्यस्थिती आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
 

mumbai 
 
 
पावसाळा आला रे आला की, शहरी भागांमध्ये रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य हे दृष्टीस पडतेच. खरंतर रस्ता काम म्हणजे सर्व ठिकाणी नागरिकांना चांगल्या रस्त्यांची अपेक्षा असते. परंतु, गेले २-२५ वर्षे महाराष्ट्राच्या महानगरांमधील रस्ते खड्ड्यांनी कोलमडलेले दिसतात. पण, महापालिकांना अद्याप यावर शाश्वत असा उपाय सापडलेला नाही. म्हणूनच अजूनही विविध ‘खड्डा मिक्स’चे प्रयोग सुरू आहेत.
 
मुंबईत सध्या तीन प्रकारचे रस्ते तयार होतात. वाहनपथासाठी अस्फाल्ट काँिंक्रट व सिमेंट काँक्रिटचे रस्ते. तिसरा प्रकार म्हणजे पदपथ. महानगरपालिकेचे म्हणणे पडते की, मुंबईत पाऊस फार मोठ्या तीव्रतेने पडतो. तसेच वाहनपथांवर अमर्याद संख्येने वाहने धावत असतात. यामुळे रस्त्यांवरील पृष्ठभाग उखडून त्यावर खड्डे पडतात. महानगरपालिकेने यावर उपाय म्हणून अस्फाल्ट काँक्रिटच्याऐवजी सिमेंट काँक्रिटचा पर्याय वापरायचे ठरविले. परंतु, हा पर्याय रस्त्याचा खर्च दुप्पट वा तिप्पट पटींनी वाढवितो. ही महानगरपालिकेची मते तज्ज्ञमंडळींनी मान्य केली, तर पहिले कारण - तीव्र पाऊस हा कमी करणे आपल्या हातात नाही. फक्त पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता मात्र वाढवता येऊ शकते. वाहनांच्या अवास्तव संख्येवर योग्य ते बंधन अथवा नियंत्रण पालिका आणू शकते. त्यामुळे योग्य तो निर्णय घेणे रस्ता-तज्ज्ञ मंडळींच्या हाती आहे. पण, सध्या रस्ता बांधकामासंबंधी मुंबईत काय स्थिती आहे, ते जाणून घेऊया.
 
रस्ता बांधकामाची सद्यःस्थिती
 
गेल्या वर्षभरापासून रखडलेली रस्त्याची कामे शेवटी एप्रिल २२२ पासून सुरू करण्यात आली आहेत. आता पावसाळ्यात रस्त्यावर पडणार्‍या खड्ड्यांची चिंता सतावू लागली आहे आणि खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.गेल्या वर्षीपासून मुंबईत रस्ताबांधणीची कामे रखडली आहेत. एप्रिल २२१ मध्ये पहिल्यांदा १२ कोटींच्या निविदा या कामासाठी मागविल्या होत्या. कंत्राटदारांनी त्यामध्ये उणे ३ ते ४ टक्के दराने निविदा भरलेल्या होत्या. या निविदांवरून मोटा वादंग उठला. कमी दराच्या बोली देऊन कामाची गुणवत्ता कशी राखली जाणार, असा सवाल उपस्थित झाल्यानंतर अखेरीस या निविदा रद्द करून डिसेंबर २२१ मध्ये २२ कोटींच्या फेरनिविदा काढण्यात आल्या. १८ ते २२ टक्के कमी दराने आलेल्या या निविदा स्वीकारून अखेर यंदाच्या एप्रिल महिन्यांपासून ही कामे सुरू करण्यात आली आहेत.
 
मुंबईत ८१५ रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. त्यापैकी एकूण ४५ कामे सुरू आहेत. शहर विभाग १५६ पैकी ६४; पश्चिम उपनगर ३६४ पैकी २२९ कामे; आणि पूर्व उपनगर २९५ पैकी १५७ कामे. ही कामे सुरू असतानाच पावसाळापूर्व आपत्कालीन कामे म्हणून खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. त्यावरून पालिकेवर सातत्याने टीकेची झोड उठवली जाते. वांद्रे पूर्व व पश्चिम, अंधेरी पूर्व व पश्चिम, गोरेगाव उत्तर व दक्षिण, कांदिवली, बोरिवली व दहिसर अशा विविध ठिकाणी ही दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत व त्यासाठी ३६ कोटी खर्च केले जाणार आहेत.
 
रस्तेबांधणीने अद्याप वेग घेतलेला नाही. रस्तेकामाचे दोन हजार कोटींचे प्रस्ताव डिसेंबरमध्ये मंजूर झाले. रस्त्याच्या बाजूने भूमिगत वाहिन्या व उपयोगिता सेवांसाठी बांधल्या जाणारे चर (वाहिन्यांसाठी) सल्लागाराचे काम पूर्ण न झाल्याने रस्तेबांधणी पूर्णपणे सुरू झालेली नाही.
 
खड्डे बुजविण्याकरिता महापालिकाकोणते मिश्रण वापरते?
 
महापालिका अलीकडे खड्डे बुजविण्याकरिता लवकर घट्ट होईल असे मिश्रण वापरते. ‘अल्कोमिक्स’ खड्डे भरण्याकरिता व पृष्ठभागाचे काम सिमेंट काँक्रिटमध्ये बसविण्याकरिता वापरले जाते. हे काम चर्चगेट येथील बॅरिस्टर रजनी पटेल रोडकरिता यशस्वीरित्या वापरले गेले. हीच पद्धत आता पुढील कामाकरिता वापरली जाणार आहे.
 
पालिकेने विविध प्रकारचे मिक्सर, खड्डे बुजविण्याकरिता वापरले ते असे : -
 
हॉटमिक्स - ९५ टक्के स्टोन, सॅन्ड व ग्रेव्हल हे सामान क्रुड ऑईलमधील अस्फाल्ट सिमेंटमध्ये मिसळून द्यायचे. कोल्ड मिक्स - एमल्सिफाईड बिट्युमेन फोम्ड बिट्युमेनमध्ये थंड तापमानात.एकोग्रिन टेक्नॉलॉजी ऑस्ट्रिया वा इस्रायलमधून- टायर क्रंब रबर थंड तापमानात अस्फाल्टमध्ये मिसळून द्यायचे.अल्कोमिक्स - विशाल ठोंबरे यांनी शोधलेले हे मिक्स. खड्ड्यांकरिता कटर मशीनने चौकोनी आकार करणे. दगड व माती साफ केल्यानंतर मिक्स खड्ड्यात ओतायचे. हे करायला अर्धा तास व वाहतूक सुरू होण्यासाठी दोन ते चार तास लागतात.
 
महापालिका दरवर्षी दोन हजार कोटी रुपये रस्त्यांकरिता खर्च करते. हा खर्च अर्थसंकल्पाच्या बाहेरचा असतो. शहरामध्ये दोन हजार किमी लांबीचे रस्ते आहेत व त्यापैकी ९९३ किमी रस्ते हे आता काँक्रिटचे आहेत. या काँक्रिटच्या रस्त्यांना ३ वर्षे आयुष्य असते. पुढील पाच वर्षांत एकूण १,९७७ किमी लांबीचे काँक्रिटचे रस्ते बांधले जाणार आहेत. यातून मुंबईचे रस्ते खड्ड्यांविना दिसतील. अस्फाल्ट काँक्रिटच्या रस्त्यांकरिता एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर विशाल ठोंबरे यांनी शोधलेले ‘अल्ट्राथिन व्हाईट टॉपिंग टेक्नॉलॉजी’ वापरली जायची. आता त्यांनीच शोध लावलेले द्रव्य ‘अल्कॉमिक्स’ वापरले जाणार आहे.
 
खड्ड्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ महामार्ग पूर्व शीव ते माजिवडा २३,५५ किमी लांबीचा काँक्रिटचा करून घेणार आहे व त्याकरिता ३२९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच, महामार्ग पश्चिम लांबी २५.३३ किमी हाही काँक्रिटचा केला जाणार आहे. त्याचे स्थूल मूल्य ६३३ कोटी रुपये येणार आहे.
 
पदपथ मोकळे होणार
 
मुंबईतील पदपथांवर फेरीवाल्यांसह अन्य लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना चालणे दुरापास्त होऊन बसले आहे. मुंबई महापालिकेने ही समस्या सोडवावी, अशी दीर्घ काळाहून केलेली त्यांची मागणी अजून प्रलंबित आहे. शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पदपथे मात्र आक्रसताना दिसतात. अतिक्रमणे रोखण्याकरिता साहाय्यक आयुक्तांसह विभागातील अभियंते पदपथावर जाऊन आठवड्यात एक दिवस जाऊन पाहणी करतील. त्याचवेळी पदपथामध्ये बदल करून पादचार्‍यांना सहज चालता येईल, अशी व्यवस्था होईल.
 
महापालिकेने आता पदपथांचे सुधारणा प्रकल्प डिसेंबरमध्ये हाती घेतले आहेत व वडाळा आणि चेंबूर येथील चार पदपथापासून हा प्रयोग सुरू होणार आहे. या कामात देखभालीचा खर्च कमी करण्यासोबत ते ४ ते ५ वर्षे टिकतील, अशा पद्धतीने बांधकाम केले जाणार आहे. या चार पदपथांच्या प्रयोगी बांधकामावर ५१ कोटी खर्च होणार आहे. या प्रकल्पाचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला तसेच प्रमुख इंजिनिअर राजेंद्र कुमार तळकर हेही उपस्थित होते.
 
नवीन पदपथांमुळे पादचार्‍यांना चालण्याची सुविधा होणार; पदपथांचे आयुष्य ४ ते ५ वर्षे राहणार; कमीतकमी खर्चामध्ये परिरक्षण होणार; आधुनिक पथदिवे, आधुनिक बाके व कचरापेटी ठेवणार; फुलझाडे व सभोवताली वृक्षसंरक्षण उपाययोजना करणार; आधुनिक बसथांबे बांधणार.नरिमन पॉईंट, चर्चगेट, कुलाब्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची स्वच्छता मोहीमसुद्धा पालिका हाती घेणार. या रस्त्यांवर पाण्याची फवारणी करून ते स्वच्छ ठेवले जाणार आहेत. पादचारी वाहतुकीला अडगळ ठरणारे साहित्य हटवून पदपथे मोकळी केली जाणार आहेत. या कामाला मार्च महिन्यांपासून सुरुवात झाली आहे.
 
रस्त्यांविषयी अधिक माहिती
 
सुरक्षित रस्त्यांकरिता ३४२ अभियंत्याना प्रशिक्षण देणार - जागतिक स्तरावरील दर्जाचा अनुकरणीय प्रयत्न होणार आहे. ‘ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह’ आणि ‘ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपिस’ यांच्या साहाय्याने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 
वाहतुकीस बंद असलेल्या रस्त्यांची माहिती गुगल मॅपवर मिळणार. यातून वाहनचालकांची मनस्तापापासून सुटका होणार.
 
प्लास्टिकपासून रस्ते प्रयोग करणे यापुढे बंद होणार. प्लास्टिक वर्गीकरणाची यंत्रणा उभारणे महापालिकेला अवघड ठरत आहे.
 
खोदलेले चर बुजवणार कोण?
 
पावसाळा जवळ आल्याने मंजुरीचा निर्णय पालिका प्रशासनाच्या हाती आहे. रस्ते दुरुस्तीवर आता ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे. यंदा हाती घेतलेल्या ७८८ रस्त्यांपैकी १२८ रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र, ४२३ रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत आहेत व ही कामे पावसाळ्यानंतर हाती घेतली जाणार आहेत. उर्वरित २१८ रस्त्यांच्या दुरूस्तीला पावसाळ्यानंतर मुहूर्त लाभणार आहे. या दुरूस्तींना प्रायोगिक तत्वांवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यातून नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.