कम्युनिस्ट, फुटीरतावाद्यांचा विखारी प्रचार हाणून पाडून सामाजिक ऐक्यासाठी विवेक विचार मंच सक्रिय

    दिनांक : 14-Feb-2022
Total Views |
राज्य संयोजक सागर शिंदे यांचे 'तरुण भारत' भेटीत प्रतिपादन
 
जळगाव : कम्युनिस्ट, फुटीरतावाद्यांच्या विखारी प्रचारापासून युवकांना दूर ठेवा. त्यांना एखाद्या घटनेचे वा विधानाचे सत्यस्वरूप कळावे म्हणून विवेक विचार मंच प्राधान्याने युवकांसाठी आणि युवकांमध्ये काम करणारी संघटना आहे. कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर महाराष्ट्रात आणि बाहेरही जे प्रकार घडले, जो हिंसाचार झाला ते लक्षात घेता आमची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे लक्षात आले. ४ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या मंचाने या कालावधीत सत्य शोधनाचे जे काम केले ते नवा उत्साह देणारे आहे. असे प्रतिपादन विवेक विचार मंचचे राज्य संयोजक सागर शिंदे यांनी केले.


Sagar Shinde1 
 
नुकतीच त्यांनी 'तरुण भारत' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळी सहकार्‍यांशी बातचीत करतांना मंचच्या आजवरच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. यावेळी माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सह सचिव विभाकर कुरंभट्टी, तरुण भारतचे निवासी संपादक दिनेश दगडकर आणि व्यवस्थापक मनोज महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
 
2018 च्या कोरेगाव भीमा येथील जातीय हिंसाचाराबद्दल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या काही विधानांच्या पार्श्वभूमीवर त्यांना समन्स बजावण्याची विनंती फेब्रुवारी 2020 मध्ये, ’विवेक विचार मंच’ या सामाजिक गटाचे राष्ट्रीय संयोजक सागर शिंदे यांनी आयोगासमोर एक अर्ज दाखल केला होता. त्या अनुषंगाने आयोगाने शरद पवार यांना साक्ष नोंदविण्यासाठी बोलावले आहे, असेही ते म्हणाले. शिंदे यांनी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देऊन सांगितले कि, त्या पत्रकार परिषदेत पवार यांनी आरोप केला होता की, उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमा आणि आजूबाजूला वेगळे वातावरण निर्माण केले होते. त्याच पत्रकार परिषदेत पवार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांची भूमिका संशयास्पद असून, त्याची चौकशी व्हावी, असा आरोपही पवार यांनी केला होता. ही विधाने आयोगाच्या चौकशीच्या कामकाजात उपयुक्त ठरू शकते. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी मुंबईला कार्यालयात त्यांचे म्हणणे नोंदविण्यासाठी हजर राहण्यास सांगितले असल्याची माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली.
 

Sagar Shinde2 
 
पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमाला 1818 च्या लढाईच्या वर्धापन दिनी युद्ध स्मारकाजवळ काही गटांमध्ये हिंसाचार झाला होता. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर पसरले होते. त्याचा फायदा घेत डाव्या विचार सरणीच्या अनेक नेत्यांनी समाजातील तरुण वर्गाची दिशाभूल करणारी विधाने प्रसार माध्यमातून दिली होती. त्यामुळे जणू आगीत तेल पडून हिंसाचार अधिक उसळला होता. त्याची झळ अकारण अनेकांना बसली होती. यासर्व घटना लक्षात घेऊन फॅक्ट फाइंडिंग करून सत्य सर्वांसमोर यावे म्हणून मंच अधिक क्रियाशील करण्यात आला. पदाधिकार्‍यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन अधिक वेगाने सत्य शोधन अभियान राबविले. त्यातून अनेक घटनांचे सत्य स्वरूपही सर्वांसमोर मांडता आले. असे ही त्यांनी सांगिलेत.