मावशींची भूमिका आज देखील कालसुसंगत

    दिनांक : 09-Jul-2022
Total Views |


नागपूर : mavshi Kelkar समोर असलेल्या कुठल्याही परिस्थितीत महिलांनी खचून न जाता कणखरपणे उभे राहावे. काळ बदलीतील तसे महिलांच्या समस्याही बदलत जातील.

 
 
 
mavashi

 

 
 
 
त्यासाठी त्यांनी कालसुसंगत असावे. असे स्पष्ट मत मावशी केळकरांनी मांडले व त्यासाठी तितक्याच जोमाने कामही केले. १०० वर्षांआधी त्यांनी मांडलेली महिला सक्षमीकरणाची भूमिका आजही तितकीच गरजेची आहे. व "राष्ट सेविका समिती" mavshi Kelkar ती भूमिका निभावते आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेसाठी डॉ. हेडगेवारांचे नाव जितक्या आदराने घेतले जाते. तितक्याच आदराने "राष्ट्र सेविका समितीच्या" स्थापनेसाठी मावशी केळकर यांचे नाव घेतले जाते. संघाच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन मावशी केळकर यांनी डॉ. हेडगेवारांच्या मदतीने १९३६ साली "राष्ट्र सेविका समितीची" स्थापना केली. मावशी (लक्ष्मीबाई) केळकर mavshi Kelkar राष्ट्र सेविका समितीच्या कामाशी अत्यंत एकनिष्ठ होत्या.
 

मावशी mavshi Kelkar म्हण्याच्या समिती आणि आपले नाते आई आणि अपत्याचे असावे. आई मुलांच संगोपन करण्यात जशी गुंतलेली असते. त्या प्रमाणे आपण स्वःताला समितीच्या आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या कामात गुंतवून घ्यायला हवे. त्यांचं हेच सूत्र त्यांनी नेहमी पाळले. पतीच्या निधनानंतर सहा अपत्ये आणि संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळत त्यांनी सेविका समितीच्या कामात स्वःताला वाहून घेतले होते. त्या काळात विधवांना कोणत्याही मंगलकार्यांत आमंत्रित केले जात नसे. मात्र मावशी रामायणावर प्रवचन द्यायच्या. विधवांनाही जगण्याचा हक्क आहे, हे समाजासमेार ठासून सांगायच्या आणि तसे वागायच्याही अस्वच्छ सवर्णापेक्षा स्वच्छ हरिजन केव्हाही घरातल्या किंवा शेतीतल्या कामात कामास ठेवावा हा निर्णय मावशींनी mavshi Kelkar घेतला. पुनर्विवाह केलेल्या स्त्रियांना त्या काळी वाळीत टाकले जायचे. घरच्या सण समारंभात मावशी त्यांना सवाषण म्हणून हळदी- कुंकवाला बोलवायच्या.

 

पश्चिम बंगाल मधील कुसुमबाला या एका विवाहित तरुणीला गुंडांनी पतीसमोर उचलू नेले. या घटनेचा मावशी केळकर mavshi Kelkar यांच्या मनावर गंभीर परिणाम झाला जो इतर कुठल्याही स्त्रीच्या मनावर होऊ शकतो. पण ती घटना तितक्या पूर्ती मर्यादित न राहता समाजातील इतर तरुणींच्या बाबतीत या प्रकारचे अत्याचार होऊ नये. महिलांनी सक्षम बनावे. हा विचार मावशींच्या मनात होता. संघात मावशीचे mavshi Kelkar मुलं सहभागी होते. त्यांची शिक्षा आणि शिस्त बघून तरुणींसाठीही असे प्रशिक्षण असावे, असे त्यांना वाटायचे. त्याचवेळी देशात महिलांशी संबंधित घडलेल्या हिंसक घटनांचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्या काळी महिलांसाठी बदल घडविणारी कुठलीही समिती कार्यरत नव्हती. सर्कशीत काम करणाऱ्या महिलेमध्ये असलेली शिस्त व कणखरपणा इतर स्त्रियांमध्येही असायला हवा. हा ऊद्देश समोर ठेऊन लक्ष्मीबाई (मावशी) केळकर mavshi Kelkar यांनी डॉ. हेडगेवार यांच्या मदतीने "राष्ट्र सेविका समितीची" स्थापना केली.

 


देशाची फाळणी झाली तेव्हा १९४७ मध्ये जेठी दिवाणी यांनी मावशींना mavshi Kelkar पत्र लिहिले की, इथल्या परिस्थितीशी लढण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे . सिंध प्रांतातील सेविकांनी दिलेल्या हाकेला साद देत. धैर्य आणि जिद्दीने सिंध प्रांतातील महिलांशी भेट घेण्यासाठी व त्यांना धीर देण्यासाठी देशातील तापलेल्या वातावरणातही त्यांनी कराची गाठले. १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानमध्ये सेविकांना एकत्र करून मावशींनी mavshi Kelkar त्यांना संबोधन केले. (धैर्य दिले) फाळणी दरम्यान पुरुषांना मारले जायचे. तेव्हा महिलानां सिंध प्रांतातील सेविकांच्या मदतीने त्यांच्या घरी संरक्षण देण्याचे कामही मावशी केळकरांनी फाळणी दरम्यान केले.

 

मावशी mavshi Kelkar मिशनरी शाळेत शिक्षण घ्यायच्या तिथे शिक्षक येशूची प्रार्थना करायला सांगायचे. मात्र घरी हिंदू देवी देवतांचे संस्कार झाले. एकदा प्रार्थनेदरम्यान येशूचे नाव न घेतल्याने त्यांना शाळेतून काढले. नंतर त्या एतद्देशीय शाळेत जायच्या. परंतु त्याकाळी महिला शिक्षणावर भर नसल्याने त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. मावशी mavshi Kelkar म्हणायच्या , मला उच्चशिक्षण घेता आले नाही. मात्र, जीवनशास्त्रात मी पारंगत आहे. तसेच समितीत येणार्‍या भगिनीच आपल्या सेविका नाहीत, तर ज्या समितीत येत नाहीत, त्याही आपल्या सेविका आहेत. मावशींचे हे उद्गार आज 'राष्ट्र सेविका समिती'ची प्रत्येक सेविका प्रत्यक्ष जगत आहे. अशा या वंदनीय लक्ष्मीबाई केळकरांचा mavshi Kelkar जन्मदिवस आज ९ जुलै रोजी दरवर्षी संकल्पदिन म्हणून साजरा केला जातो.

 
सारिका वंजारी