अखेर मंकीपॉक्स संशोधन यशस्वी ठरलं

    दिनांक : 26-May-2022
Total Views |
ब्रिटन : कोरोनाच्या थैमानाननंतर सद्य परिस्थितीत अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचा फैलाव हा वेगाने  होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असता या दरम्यान एक दिलासा देणारी माहिती मिळाली आहे. ती अशी की सध्या या आजारावर औषध सापडलं आहे. या आजारात अँटीव्हायरल औषधे आराम देऊ शकतात, असं लॅन्सेटच्या अभ्यासातून समोर आलं आहे.
 

res
 
 
अँटीव्हायरल औषधे मंकीपॉक्स रोगातून लवकर बरे होण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. ही औषधे लक्षणे कमी करू शकतात आणि आजारातून लवकर बरे होण्यास मदत करतात. हा रिसर्च लिव्हरपूल युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट, ब्रिटन येथे करण्यात आला आहे.ब्रिटनमध्ये 2018 ते 2021 दरम्यान युनायटेड किंग्डममधील मंकीपॉक्सच्या 7 रुग्णांवर संशोधन  करण्यात आले. या 7 रुग्णांपैकी 3 रुग्ण पश्चिम आफ्रिकेतून आले होते आणि उर्वरित चार रुग्णांमध्ये संसर्ग एकातून दुसऱ्यामध्ये पसरला होता. रुग्णांवर दोन औषधांचा वापर करण्यात आला. ही औषधे Brincidofovir आणि Tecovirimat आहेत. पहिल्या औषधाचा वापर करूनही रुग्णांना फारसा फायदा झाला नाही. हे औषध तीन रुग्णांवर वापरले गेले. औषध घेतल्यानंतर या रुग्णांच्या लिव्हरच्या एन्झाइमची पातळीही थोडीशी खालावली. जरी सर्व रुग्ण काही वेळाने बरे झाले. 2021 मध्ये, युनायटेड किंगडममधील एका रुग्णामध्ये दुसरे औषध Tecovirimat वापरले गेले, हा रुग्ण लवकर बरा झाला आणि दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोकाही कमी झाला.