आणखी एक हिंदू लक्ष्य!

    दिनांक : 08-Aug-2022
Total Views |
धर्मांध मुस्लिमांकडे एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याची धार्मिक ग्रंथांत सांगितलेली शेकडो कारणे असतात. त्यांची मानसिकताच ‘गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा,’ या नार्‍याभोवती फिरत असते. विशेष म्हणजे, इस्लामी कट्टरपंथीयांकडून खुदा वा पैगंबराच्या अपमानाच्या नावाखाली जीवंत माणसाला मारून टाकण्याचे प्रकार आजचे नाहीत, तर त्याचा इतिहास इस्लामच्या जन्मापासूनचा आहे.
 
 

NUPUR1 
 
 
 
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि राजस्थानातील शिवण व्यावसायिक कन्हैयालाल तेली यांचे समर्थन केल्याच्या रागातून नगरच्या कर्जतमध्ये गुरुवारी धर्मांध मुस्लिमांच्या जमावाने प्रतीक पवार या हिंदुत्वनिष्ठ युवकावर जीवघेणा हल्ला केला. ‘तेरा भी उमेश कोल्हे करना पडेगा’ असे म्हणत प्रतीक पवारला तलवार, हॉकी स्टीकने जबर मारहाण करतानाच इस्लामी कट्टरपंथीयांनी ‘काफिर को जिंदा नहीं छोडना हैं’च्या घोषणाही दिल्या. नंतर प्रतीक पवार मरून गेल्याचे समजून धर्मांध मुस्लिमांच्या टोळक्याने त्याच्यावर अक्षरशः थुंकून तिथून पळही काढला. तत्पूर्वी प्रतीक पवारच्या प्रकरणाआधी अमरावतीत दि. २१ जून रोजी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांचीही इस्लामी कट्टरपंथीयांनी हत्या केली होती. त्यानंतर दि. २८ जून रोजी उदयपूरमधल्या कन्हैयालाल तेली यांचाही धर्मांध मुस्लिमांनी निर्घृण खून केला होता. तथापि, उमेश कोल्हे यांची हत्या आधी होऊनही त्याचा तपास पुढे सरकत नव्हता, तर कन्हैयालाल तेली यांच्या खुनाचे कारण हल्लेखोर मुस्लिमांकडूनच ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून समोर आल्यानंतर अमरावती प्रकरणाचा उलगडा होऊ लागला.
 
तोपर्यंत अमरावतीचे प्रकरण पोलिसांकडून दाबण्याचाच प्रयत्न सुरू होता. आताचे अहमदनगरचे प्रकरणही दडपून टाकण्याचेच उद्योग पोलिसांकडून सुरू होते. पण, अहमदनगर जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे झालेला सारा प्रकार सांगितला आणि पोलीस कामाला लागले. यावरुन इस्लामी कट्टरपंथीय तर अमानुष असल्याचे स्पष्ट होतेच, पण पोलीसही त्यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न करतात, हेही दिसून येते. त्याचीही काही कारणे आहेत, ती पुढे येतीलच. पण, नितेश राणेंनी आमदार म्हणून या विषयाला जाहीरपणे वाचा फोडली, त्यामुळे त्यांचे आधी अभिनंदन केले पाहिजे. अन् फडणवीसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतल्याने राज्यात मुस्लीम लांगूलचालनालाच कारभार समजणारे महाविकास आघाडीचे नव्हे, तर नव्याने स्थापन झालेले हिंदुत्वनिष्ठ सरकार प्रतीक पवारसह सर्वच हिंदूंना न्याय देईल, असे वाटते.
 
धर्मांध मुस्लिमांकडे एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याची धार्मिक ग्रंथांत सांगितलेली शेकडो कारणे असतात. त्यांची मानसिकताच ‘गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा,’ या नार्‍याभोवती फिरत असते. विशेष म्हणजे, इस्लामी कट्टरपंथीयांकडून खुदा वा पैगंबराच्या अपमानाच्या नावाखाली जीवंत माणसाला मारून टाकण्याचे प्रकार आजचे नाहीत, तर त्याचा इतिहास इस्लामच्या जन्मापासूनचा आहे. गेल्या १४०० वर्षांत धर्मांधांच्या मानसिकतेत जराही बदल झालेला नाही आणि त्यांच्यात स्वतःहून वा त्यांच्या धर्मीयांकडून त्यात बदल करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असेही नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेच कारवाई केली पाहिजे. जम्मू-काश्मीरमध्ये धर्मांध मुस्लीम दहशतवाद्यांनी हिंदूंना वेचून वेचून ठार मारले, तर त्याच्या विरोधात केंद्र सरकार तत्काळ कृती करते. तोच हिंदूंना लक्ष्य करुन संपवण्याचा उद्योग उमेश कोल्हे, कन्हैयालाल तेली, प्रवीण नेट्टारु आणि इतरही कित्येकांबाबत देशभरातही घडलेला आहे. त्यातला मृत्यूशी झुंज देणारा प्रतीक पवार आणखी एक हिंदू. त्या सर्वच प्रकरणांची दखल घेत केंद्र सरकारने हिंदूंंना दिलासा देण्याचे काम केले पाहिजे.२०१४ आधीची सरकारे हिंदूविरोधीच होती. त्यांनी हिंदूविरोधीच कामे केली व हिंदूविरोधकांना पोसण्यातच धन्यता मानली. पण, आताचे सरकार आपल्याला न्याय देईल, अशी अपेक्षा समस्त हिंदूंना आहे. कारण, जम्मू-काश्मीरला लागू असलेले ‘कलम ३७०’ व ‘३५ अ’ हटवणे असो वा अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी श्रीराम मंदिर उभारणीचे काम असो वा ‘सीएए’सारखे निर्णय असो, ते विद्यमान केंद्र सरकारनेच घेतलेले आहेत. म्हणूनच काम करणार्‍याकडून हिंदूंसाठी काम होण्याची अपेक्षा हिंदू जनता व्यक्त करत आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, सरकार काम करत असतानाच, हिंदूंनीही जागृत होणे आवश्यक आहे. पण, तसे होताना दिसत नाही. सारीकडे इस्लामी कट्टरपंथीयांनी उच्छाद मांडलेला असताना अजूनही लाखो हिंदू धर्मनिरपेक्षतेच्या, सहिष्णुतेच्या, उदारतेच्या कल्पनांत रममाण झालेले आहेत. चारही बाजूंनी धर्मांध मुस्लीम हिंदूंवर शत्रू समजून तुटून पडत असताना लाखो हिंदूंना मात्र गंगा-जमुनी तहजीबचेच गोडवे गायचे आहेत. त्यातून हिंदू सदैव गाफीलच राहतो आणि इस्लामी कट्टरपंथीय अल-तकियाच्या आधारे ‘दार-उल-हरब’ला ‘दार-उल-इस्लाम’ करण्याच्या आपल्या उद्दिष्टाकडे मात्र नियोजनबद्धपणे वाटचाल करतो. नुपूर शर्मांचे वक्तव्य त्यांच्यासाठी केवळ निमित्त ठरत असते, त्यातून ते आपले ध्येय काय आहे, हे दाखवून देत असतात. ते पाहता हिंदूंनी वेळीच सावध होऊन धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, उदारतेच्या सुविचारांपेक्षाही वास्तवाची जाणीव करुन घ्यावी, एकजुटीने उभे ठाकावे, तरच धर्मांधांना जरब बसू शकेल, अन्यथा नाही.
 
महत्त्वाचे म्हणजे, यंदा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण, याच वर्षात धर्मांध मुस्लिमांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. इस्लामी दहशतवाद, इस्लामी कट्टरपंथी, इस्लामी घुसखोरीशी देश झुंज देत आहे. नुकतेच नेपाळ सीमेलगतच्या उत्तर प्रदेशातील ११६ गावात मुस्लिमांची लोकसंख्या ५० पेक्षा अधिक टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले. बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, राजस्थानसह आसामच्या सीमावर्ती भागातही अशीच परिस्थिती आहे. याव्यतिरिक्त मुस्लिमांनी देशभरात ठिकठिकाणी आपले पॉकेट्स तयार केलेत, जिथे जायला पोलीसही घाबरतात. सुरुवातीला पोलीस मुस्लिमांनी केलेल्या हल्ल्याचे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात, त्याचे एक कारण हेदेखील आहे. बिहार व झारखंडच्या सरकारी शाळांत ‘शरिया कायदा’ लागू करुन रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी देण्याचा, शाळांच्या नावात उर्दूचा समावेश करण्याचा उद्योग केला गेला. इतकेच नव्हे, तर २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्यासाठी मुस्लीम युवकांना हत्यारांचे प्रशिक्षण दिले जात आहे. धर्मांध मुस्लिमांकडून स्वातंत्र्याआधी जशी स्थिती होती, तशी पुन्हा एकदा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उमेश कोल्हे, कन्हैयालाल तेली, प्रवीण नेट्टारुंच्या हत्या आणि प्रतीक पवारवरील हल्ला त्याच षड्यंत्राचा भाग आहे. त्याच्या विरोधासाठी सरकार तर काम करेलच, पण हिंदुंनीही प्रत्येक गाव, शहर, जिल्ह्यात इस्लामी कट्टरपंथी मानसिकतेचा विरोध केला पाहिजे. त्यासाठी संघटना कोणतीही असो, पण हिंदूंनी हिंदूंच्या बरोबर उभे राहण्याला आधी प्राधान्य देणे आवश्यक आहे.