मोहरमलाही धर्मांधांचा धुडगूस

    दिनांक : 13-Aug-2022
Total Views |
 
इस्लामी कट्टरपंथीयांचा बहुसंख्यांनी विरोध करण्याचे कारण त्यांनी स्वतःच आपल्या कृतीतून दिलेले आहे, इस्लामोफोबियाला कारणीभूत स्वतः धर्मांध मुस्लीमच आहेत.
 
 

moharam 
 
 
 
 
मुस्लीम धर्मीय मोहरमला दुःखाचा दिवस मानतात व दुःखातच ताजिया मिरवणुका काढतात. पण, यंदा मात्र देशाच्या वेगवेगळ्या भागात दुःखाचा दिवस असूनही धर्मांध मुस्लिमांनी दुसर्‍या समुदायाच्या प्रामुख्याने हिंदूंच्या विरोधात कुकृत्ये केली. म्हणजेच, दुःखाच्या दिवशीही त्यांनी इतरांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी नव्हे, तर दुःखात लोटण्यासाठीचे, यातना देण्याचेच उद्योग केल्याचे यावरून दिसून येते. या दिवशी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारसह अन्य ठिकाणी इस्लामी कट्टरपंथीयांनी राडा घातला, गोळीबार केला, हिंसाचार केला, इतकेच नव्हे, तर हिंदू मंदिरांची, हिंदू मूर्तींची नासधुसही केली. मात्र, मुख्य प्रवाहातील माध्यमांनी व त्यातही मराठी माध्यमांनी त्याची दखल घेतल्याचे दिसले नाही. पण, म्हणून धर्मांध मुस्लिमांनी उपद्रव केलाच नाही असे नव्हे, त्यांनी उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला.
 
इथे रस्त्याकडेला एक हनुमानाचे मंदिर असून, त्यातील मूर्तींची तोडफोड केल्याचे दिसून आले, तर कानपूरमध्येच मोहरमच्या पूर्वसंध्येला इस्लामी कट्टरपंथीयांकडून तिरंगा राष्ट्रध्वजाचा अपमान केला गेला. इथे तिरंग्यावर मशीद, चाँद-तारा तयार करत धर्मांध मुस्लिमांनी त्याचा आकार बदलून त्याला ताजियाचा आकार दिला. त्याची चित्रफितही समाजमाध्यमांत पसरली. या सगळ्या प्रकारावरुन राष्ट्रभक्त नागरिकांनी संताप व्यक्त केला. पण, इस्लामी कट्टरपंथीयांपैकी कोणी साधी माफीही मागितली नाही. वाराणसीत तर मोहरमला धर्मांध मुस्लिमांकडून सर्वाधिक धुडगूस घातला गेला.
 
इथल्या मिर्झामुराद भागात ताजिया मिरवणुकीसाठी जांभळाचे झाड तोडण्यावरून वादाला सुरुवात झाली व दगड-विटांसह हत्यारांचाही यथेच्छ वापर करण्यात आला. त्यात डझनभर लोक जखमी झाले. बरेलीच्या भोजीपुरात मोहरमच्या मिरवणुकीवेळी इस्लामी कट्टरपंथीयांनी हिंदू दुकानदारांच्या दुकानांवर जोरदार दगडफेक केली, तोडफोड केली. त्यात महिलांनीही हिरीरीने सहभाग घेतला. त्याचीही चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरली. पण, मुस्लिमांतल्या कोणी त्याचा निषेध केल्याचे दिसले नाही. बरेलीच्याच शेरगढमध्ये मोहरमच्या ताजियासाठी धर्मांध मुस्लिमांनी ब्रह्मदेवाच्या मंदिरस्थळी असलेल्या वर्षानुवर्षे जुन्या पिंपळाच्या झाडाची छाटणी केली आणि मंदिरातील मूर्ती, दानपेटी फेकून दिली.
 
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी कथितरित्या मोहम्मद पैगंबराचा अपमान केल्याचे म्हणत धर्मांध मुस्लिमांनी कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांचा बळी घेतला, तर नगरच्या प्रतीक मोरेवर जीवघेणा हल्ला केला. पैगंबराच्या अपमानाचा मुद्दा इस्लामी कट्टरपंथीयांसाठी संपलेला नाही आणि म्हणूनच त्यांच्याकडून वेळोवेळी भडकावू भाषणबाजी केली जाते. तसाच प्रकार जौनपूरमध्येही झाला. इथे मोहरमच्या मिरवणुकीवेळी हातातली धारदार शस्त्रे उंचावत धर्मांध मुस्लिमांनी ‘गुस्ताख-ए-रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा’ची नारेबाजी केली. यासह मध्य प्रदेशातील उज्जैन, बिहारच्या पुर्णिया, कटिहार, मुझफ्फरपूर, साजौरमध्ये इस्लामी कट्टरपंथीयांनी मोहरमच्या दिवशी दहशत माजवण्याचे, भीती दाखवण्याचे प्रकार केले. या सगळ्या प्रकारावरुन हिंदू व अन्य धर्मीयांत त्यांच्याविषयी कमालीचा रोष निर्माण झालेला आहे. पण, त्याने धर्मांध मुस्लीम सुधारतील असे नव्हे.
 
उत्तर भारतात गेल्या पौर्णिमेपासून श्रावण सुरू झाला व त्याबरोबर कावडयात्राही सुुरू झाली. त्यात शिवभक्तांचे जत्थेच्या जत्थे गंगा नदीतून पाणी भरुन घेऊन आपापल्या ठिकाणच्या शिवमंदिराकडे जाऊ लागले. पण, अनेक ठिकाणी इस्लामी कट्टरपंथीयांनी कावड यात्रेला काफिरांचा ईश्वर मान्य नाही म्हणून विरोध केल्याचे पाहायला मिळाले. कुठे कावडियांवर हल्ले केले, तर कुठे रस्ते बंद केले, तर कुठे घाण पाणी फेकले. कसेही करून कावड यात्रा पूर्ण होऊ नये, म्हणून तिच्यात बाधा आणण्याचे व दहशत, भीती, हिंसाचार पसरवण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न धर्मांध मुस्लिमांनी केले.
 
आता तर आपल्याच धर्माच्या दुःखाच्या दिवशी, म्हणजेच मोहरमलाही त्यांनी तसेच केले. म्हणजेच, सण, उत्सव तुमचा असेल तर तो आम्ही तुम्हाला सुखासुखी साजरा करू देणार नाही आणि सण आमचा असला तरी आम्ही तो शांततेने साजरा करणार नाही, तर तुम्हाला त्रोस देऊनच साजरा करू, अशीच समाजसौहार्द बिघडवणारी, समाजात द्वेष निर्माण करणारी भूमिका इस्लामी कट्टरपंथीयांनी घेतल्याचे दिसते. त्या पार्श्वभूमीवर कोणी धर्मांध मुस्लिमांविरोधात रोखठोक बोलत असेल, उभे ठाकत असेल, कारवाई करत असेल तर त्याला चूक कसे म्हणणार? कारण, इस्लामी कट्टरपंथीयांचा बहुसंख्यांनी विरोध करण्याचे कारण त्यांनी स्वतःच आपल्या कृतीतून दिलेले आहे, इस्लामोफोबियाला कारणीभूत स्वतः धर्मांध मुस्लीमच आहेत.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगलखोरांविरोधात कठोर कारवाई करत त्यांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर चालवला. मात्र, त्यावरून काँग्रेस, समाजवाद्यांसह तथाकथित बुद्धिजीवी, विचारवंत, पत्रकार-संपादक आणि मानवाधिकारवाले छाती पिटायला लागले. पण, त्यातल्या कोणी इस्लामी कट्टरपंथीयांना हिंसाचार न करण्याचे आवाहन का केले नाही? उलट धर्मांध मुस्लिमांच्या दंगलखोरीलाही न्यायोचित ठरवण्याचे काम केले. यातूनच इस्लामी कट्टरपंथीयांची हिंमत वाढत आणि ते अधिकाधिक कुकृत्ये करायला प्रवृत्त होतात.
 
आताही देशात ठिकठिकाणी मोहरमच्या दिवशी झालेल्या घटना पाहता, त्याचा वर उल्लेख केलेल्या टोळक्यातल्या कोणीही निषेध केला नाही ना विरोध केला. मात्र, आता त्यांच्यावर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली गेली, तर याच टोळक्यातून आरडाओरडा सुरू होईल. म्हणजेच गुन्हेगाराला गुन्हा करू द्यायचा, त्याला गुन्हा करण्यापासून रोखायचे नाही आणि त्याच्यावर कारवाईही व्हायला नको, अशी अपेक्षा बाळगायची, असा हा प्रकार. पण, जो गुन्हा करतो, त्याला शिक्षा होणारच. आता मोहरमच्या दिवशी ज्या ज्या धर्मांध मुस्लिमांनी माज दाखवला, त्यांची मस्तीही नक्कीच उतरवली जाईल आणि त्याला जबाबदार ते स्वतःच असतील.