शिंदे सरकारला इतक्यात धोका नाही !

    दिनांक : 26-Aug-2022
Total Views |

Eknath Shinde एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारला पावसाळी अधिवेशन सोपे गेले. नजीकच्या भविष्यातही धोका दिसत नाही.

 
 
 
shinde
 

 

 
शिवसेना बंडखोरांच्या अपात्रतेवरून दोन महिन्यांपासून सुरू कायद्याची लढाई लांब चालणार आहे. आतापर्यंत तारीख पे तारीख सुरू होते. आता सर्वोच्च न्यायालयाने हा सारा मामला घटनापीठाकडे दिला आहे. Eknath Shinde १६ आमदारांचे बंड आणि त्यातून त्यांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिलेली नोटीस हा मोठा मुद्दा आहे. एक नव्हे, वेगवेगळ्या मुद्याच्या तब्बल पाच याचिका आहेत. धनुष्यबाण कोणाचा? हा नाजूक गुंता निवडणूक आयोगाने सोडवायचा आहे. आमचीच शिवसेना खरी असा शिंदे गटाचा दावा आहे. Eknath Shinde कायद्याचा किस निघेल. त्यामुळे अंतिम निकाल लवकर येण्याची शक्यता नाही. Eknath Shinde शिंदे सरकारला हा मोठा दिलासा आहे. या सरकारला फक्त अडीच वर्षे काढायची आहेत. त्याआधी तरी निकाल यावा, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पण जो काही निकाल येईल तो देशातील सर्व विधानसभांना लागू राहणार आहे. Eknath Shinde त्यामुळे सा-या देशाचे या निकालाकडे लक्ष राहणार आहे.
 

Eknath Shinde शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ४० आमदारांनी बंड केले. १० अपक्ष आमदार सोबत आले. या ५० आमदारांना सांभाळणे, त्यांना हवे ते देणे सोपे नाही. प्रत्येक बंडखोराला मंत्री व्हायचे आहे. 'एक अनार सौ बिमार' अशी स्थिती आहे. Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टेन्शन समजू शकते. आमदारांचे रुसवेफुगवे काढताना शिंदे Eknath Shinde यांची दमछाक सुरू आहे. दुस-या टप्प्याच्या विस्तारात शिंदे Eknath Shinde आपल्या फार फार तर ८ ते ९ बंडखोरांना मंत्रिपदे देऊ शकतील. इतरांची चांगले महामंडळ किंवा इतर कुठे सोय लावावी लागेल. नाहीतर हे बंडखोर फाडून खातील. बंडातून आणखी एखादे बंड पेटेल. त्यामुळे शिंदे Eknath Shinde यांची अग्निपरीक्षा आहे. उपमुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस त्यांच्या मदतीला आहेत. राजकीय जोडतोडीत फडणवीस आता वस्ताद झाले आहेत. मोठी जोखीम पत्करून मांडलेला हा डाव फडणवीस उधळू देणार नाहीत. Eknath Shinde शिंदे पूजेला बसले असले, तरी शेवटी ही सगळी सर्कस फडणवीस यांनाच चालवायची आहे. दोन मिनिटे तरी भेट मिळावी यासाठी ताटकळणारे मोठे अधिकारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांची फडणवीस यांच्या चेंबरपुढे झालेली गर्दी पाहिली तर फडणवीसांची ताकद आपल्या लक्षात येईल. 

 

Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांना मात्र आपले काही चुकले असे अजूनही वाटत नाही. त्यांच्या वर्तनावरून तसे दिसते. गद्दार, खंजीर, खोके या शिव्यांची त्यांची टेप सुरूच आहे. आणखी एक Eknath Shinde शिंदे जन्माला घालण्याचा मोह त्यांना सोडवत नाही. महापालिका निवडणुका आघाडी करून लढवण्याचा विचार त्यांनी नुकताच बोलून दाखवला; पण तुम्ही लिहून ठेवा, आता महाआघाडी शक्य नाही. मात्र, शहाजी बापू पाटील या Eknath Shinde एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराला एका गोष्टीसाठी मानले पाहिजे. या बापूने मराठीला एक नवा शब्द दिला. मराठीच्या शब्दवैभवात भर टाकली. गुवाहाटी मुक्कामी शहाजीबापूने सांगितलेला 'ओक्के' दोन महिन्यानंतरही गाजतोय, वाजतोय. घरोघरी ओक्के, नॉट ओक्के सुरू आहे. राजकारणात तर ओक्के विरुद्ध ओक्के अशा लढाया सुरू आहेत. या ओक्केवर कविता झाल्या, विनोद आले, सिनेमाही येईल. मात्र, बुधवारी या ओक्केचे ट्रेलर विधानभवनाच्या पाय-यांवर राडा करून गेले. सत्ताधारी शिंदे Eknath Shinde गटाचे आमदार आणि विरोधी आमदार एकमेकांना भिडले; चौकातल्या टोळ्या भिडतात तसे! जे घडलं ते लज्जास्पदच!

 

Eknath Shinde कुठल्याही अधिवेशन काळात विधान भवनाच्या पाय-यांवर उभे राहून विरोधी आमदार नारेबाजी करतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हे सुरू आहे. याही वेळा नारेबाजीने सुरुवात झाली, पण एका ओक्केने घात केला. त्यामुळे सत्ताधारी आमदारांनाही पाय-यांवर यावे लागले. Eknath Shinde पहिल्याच दिवशी 'पन्नास खोके, एकदम ओक्के' अशी घोषणा देत विरोधी आमदारांनी शिंदे गटाच्या आमदारांना खिजवले. हे ओक्के म्हणून चिथावणे शिंदे गटाच्या आमदारांच्या जिव्हारी लागले असावे. कारण बुधवारी सकाळी विरोधक यायच्या आधीच या आमदारांनी विधान भवनाच्या पाय-या बळकावल्या होत्या. Eknath Shinde सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओक्के, अनिल परबचे खोके, मातोश्री ओक्के, लवासाचे खोके, बारामती ओक्के अशा घोषणा सुरू झाल्या. पुढे हे दोघेही भिडले आणि अभूतपूर्व गोंधळ देशाने टीव्हीवर पाहिला. Eknath Shinde विरोधकांना त्यांच्याच स्टाईलने बंडखोरांनी उत्तर दिले. हे तर ट्रेलर आहे. यापेक्षा कडक राडे पुढे होतील. दोन्ही बाजूला खुमखुमी आहे. पण या घटनेने सामान्य माणसाला प्रश्न पडला आहे... हे विधानभवन की आखाडा? Eknath Shinde बाहेर रस्त्यावर असा राडा झाला असता तर पोलिसांनी आपला हिसका दाखवला असता; पण हा प्रकार विधानभवन परिसरात झाला.

 

Eknath Shinde पोलिसांचे इथे काही चालत नाही. मात्र, विधानसभेचे अध्यक्ष समज देऊ शकतात. ज्यांनी कायदे करावे अशी अपेक्षा आहे ते आमदार चिल्लर नारेबाजीत राडा करतात. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हा बट्टा आहे. Eknath Shinde लोकांमध्ये काय संदेश गेला असेल? हे चाललंय काय? जनतेचे प्रश्न सुटले अशातला भाग नाही. समस्यांचा ढीग लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्या राज्यात विकासाच्या नावाने बोंबाबोंब होती. Eknath Shinde आता दुप्पट पावसाने शेतकरी अडचणीत आला. शेतीतून त्याला पाच पैसेही मिळणार नाहीत. डोक्यावर कर्ज आहे ते वेगळे! Eknath Shinde सरकारने मदत दुपटीने वाढवली आहे. त्यामुळे परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही. ५-५० हजार रुपयात काय ऊद जळणार आहे? विदर्भात सात महिन्यात ८१० शेतक-यांनी आत्महत्या केली.

 

दररोज कुण्या ना कुण्या भागात शेतक-याने आत्महत्या केल्याची बातमी येत आहे. Eknath Shinde परवा विधान भवनाच्या दारातच एका शेतक-याने रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यावेळी शेतकरी आत्महत्या वाढणार आहेत. तुम्ही लिहून ठेवा. यावेळी रेकॉर्डब्रेक आत्महत्या होण्याचा धोका आहे. Eknath Shinde शेतक-यांचे नुकसान भरून देता येईल एवढा पैसा सरकारच्या तिजोरीत नाही. पण, त्यांना नैतिक बळ तर सरकार नक्कीच देऊ शकते. Eknath Shinde खोके, खंजीर आता विसरा. राजकारण गेलं चुलीत. मुख्यमंत्र्यांनी सा-याच पक्षाच्या आमदारांना सक्तीने आपापल्या भागातील शेतक-यांच्या बांधावर जायला सांगण्याची हीच वेळ आहे.

 
  मोरेश्वर बडगे