हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हेच भारतीयत्व - सिने अभिनेते योगेश सोमण

    दिनांक : 12-Feb-2022
Total Views |
नंदुरबारला अभाविपच्या ५६ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचे उत्साहात उद्घाटन
 
नंदुरबार : अभाविपच्या ५६ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला बाल हुतात्मा शिरिष कुमार नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार येथे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चौहान यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सिनेअभिनेते योगेश सोमण, अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, स्वागत समिती अध्यक्ष ईला गावीत, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा.निर्भय विसपुते, प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा.सारंग जोशी प्रदेश मंत्री अंकिता पवार, शहर मंत्री जयेश सोनवणे आदी उपस्थित होते.

ABVP 
 
अधिवेशनाचे स्वागत समिती अध्यक्ष ईला गावीत यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा.सारंग जोशी यांनी सर्वांसमोर विद्यार्थी परिषदेची मांडणी केली. समाजात उभारलेले प्रश्न, परिषदेने केलेला संघर्ष, त्यात येणार्‍या अडचणी, मिळणारे अनुभव अशा विविध विषयांवर प्रा.सारंग जोशी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
 
उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध सिने अभिनेते योगेश सोमण यांनी त्यांच्या भाषणात काही ऐतिहासीक गोष्टींवर उजाळा देण्याचे काम केले. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हेच भारतीयत्व याचसोबत पानिपत हे पराभवाचे नाही तर पराक्रमाचे विशेषण आहे अशा अनेक विशेष बाबी त्यांनी मांडले. कार्यकर्ता कसा हवा? यावर अतिशय सुंदर स्पष्टीकरण यांनी यावेळी केले. सोशल मीडियाकडे आपण कशाप्रकारे लक्ष देऊन वापर करायला हवा, याचे उदाहरण त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. तसेच, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रात कसे कार्यरत राहिले पाहिजे याविषयात सर्वांना मार्गदर्शन केले.
 
प्रमुख अतिथी अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांनी विद्यार्थी परिषदेच्या आजतागायतच्या विविध कार्याचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. परिषदेचे विविध आयाम, मागील वर्षांत केलेल्या कार्यांचा अहवाल आणि आगामी काळात करण्यात येणार्‍या कार्यांवर आशिष चौहान यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 
आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चौहान यांनी त्यांचे विद्यार्थी परिषदेसोबतचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी जनजाती बांधवांचा गौरवशाली इतिहास आणि नव्याने घोषित झालेल्या जनजाती गौरव दिनासाठी विद्यार्थी परिषदेने घेतलेला पुढाकार यासाठी अभिनंदन केले. विद्यार्थी कसा असावा याचे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन स्वागत समिती सचिव संतोष पाटील तर आभार कार्याध्यक्ष डॉ. गिरीश महाजन यांनी मानले.