कंजापानी येथे ६४ किलो गांजा जप्त

    दिनांक : 15-Sep-2021
Total Views |
धडगाव : येथील पोलीस ठाणे हद्दीत तालुक्यातील कंज्यापाणी पोस्ट काकडदा येथे शिलदार फाड्या पावरा मु. कंज्यापाणी पोस्ट काकडदा ता. धडगांव (अक्राणी) यांच्या कंजापानी गावाचे शिवारातील ज्वारी पिक असलेल्या शेतामध्ये गांजा च्या रोपांची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग नंदुरबार व पोलीस स्टेशन धडगाव यांच्या संयुक्त कारवाईत ४,५३,३२० रुपये किमतीचे ६४ किलो वजनाचे गांजाचे झाडे पोलीसांनी जप्त करीत शेत मालकाविरुध्द गुन्हा दाखल काण्याची कारवाई सुरु केली.

ganja_1  H x W: 
 
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार येथील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सपोनि संदीप पाटील, अनिल गोसावी, पो. हवालदार दीपक गोरे, रवींद्र पाडवी, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव यांचे पथक व धडगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, पोलीस हवालदार राजेंद्र जाधव, विनोद पाटील, राजेश्वर भुसलवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.