नवनाथनगर येथे १७ पासून कानुमाता उत्सव सुरु

    दिनांक : 10-May-2022
Total Views |
नंदुरबार : शहरातील नवा भोईवाडा, नवनाथ नगर भागात खेडकर परिवारातर्फे येत्या १७ मे पासून श्री कानुबाई माता उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
 
 
 
kanu 
 
 
कुलस्वामिनी नागाई मातेच्या कृपेने आदिशक्ती महाकालीका कानबाई मातेच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार १७ मे रोजी सायंकाळी रास पूजन, गहू दळणे कार्यक्रम होईल. बुधवार १८ मे रोजी सकाळी पाणी आणणे, रत्न आणणे, कस्तुरी आणणे, ध्वज मिरवणूक तसेच सायंकाळी कानबाई मातेची मिरवणूक, थाट भरणे आदी धार्मिक उपक्रम होतील. शुक्रवार १९ मे रोजी कानबाई माता उत्सवाचा समारोप होईल.
 
कानुमाता उत्सवाचे भगत म्हणून अमळनेर येथील दादू भगत धार्मिक विधी पार पाडणार आहेत. भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक शोभा खेडकर, मोहन खेडकर, राकेश खेडकर आणि शिव खेडकर तसेच समस्त खेडकर परिवार यांनी केले आहे.