नंदुरबार जिल्ह्यात बायोडिझेलची अवैध विक्री सुरूच

    दिनांक : 31-Dec-2021
Total Views |
नंदुरबार : मावळत्या वर्षाला निरोप देत असताना जिल्ह्यातील तीन ठिकाणी अवैध बायोडिझेल विक्री केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी मालट्रकसह सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
 
craim
 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्वलनशील पदार्थांची अवैधरित्या विक्री करणार्‍या तिघांची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार नवापूर तालुक्यात जाकीर खान पठाण यांच्याकडे १६ हजार आठशे रुपये किमतीचे २१० लिटर बायोडिझेल विक्री करताना आढळून आले तर खांडबारा गावात बस स्थानकाजवळ रघुनाथ पाटील रा. बामणे ता.शिंदखेडा यांनी आपल्या एम. एच. ३९- ० ३२१ क्रमांकाच्या टाटा माल ट्रक मधून तीन हजार पन्नास लिटर क्षमतेचे बायोडिझेल अवैधरित्या विक्री करताना आढळून आला आहे. दोन लाख २५ हजार रुपये किमतीची ट्रक आणि २ लाख ३४ हजार ८५० रुपये किमतीचे तीन हजार पन्नास लिटर डिझेल अवैधरित्या विक्री करताना आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.
 
याशिवाय अक्कलकुवा येथे देखील धडक कारवाई करण्यात आली. संशयित इद्रिस मेमन राहणार सेलंबा हा महाराष्ट्रातील गुजरात राज्यात बायोडिझेलची विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे २५० लिटर बायोडीजल आढळले असून २० हजार रुपये किमतीच्या ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास नवापूर आणि अक्कलकोट पोलिस करीत आहेत.