नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून तहानलेल्यांसाठी पाणपोई

    दिनांक : 27-Mar-2022
Total Views |
जिल्हाभरात एकुण ३० पाणपोईची व्यवस्था
 
Panpoi 1
 
नंदुरबार : 
 
येइं भाई, येथ पाही घातली ही पाणपोई,
धर्मजाती कोणती ती भेद ऐसा येथ नाही
संसॄतीचा हा उन्हाळा तल्खली होई जीवाची,
स्वेदबिंदू, अश्रुधारा यांविना पाणीच नाही.
 
 
 
 
 
 
 
कवी यशवंत यांची बालभारतीच्या संग्रहातील ही कविता नंदुरबार येथील पाणपोया, अर्थात 'प्याव' च्या अस्तित्वाची कहाणी मोजक्या शब्दांत मांडते. भारतीय संस्कृतीमध्ये जलदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 
नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता खूप वाढलेली असते. नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळ्यात हा  पारा ४० ते ४४ डिग्री सेल्सीयसच्या आसपास असतो. जिल्ह्यातील बहुतांश लोक हे   मोल मजूरीसाठी बाहेरगांवी जातात तसेच उन्हाळ्यामध्ये लग्नसराई किंवा धार्मीक कार्यक्रम जास्त असल्यामुळे बहुतांश लोक हे प्रवास करतात. सर्वसामान्य नागरीक   देखील खेरेदीसाठी बाजारात आलेले असतात. जे विद्यार्थी शिक्षणासाठी व   कामानिमीत्त बाहेरगांवी गेलेले असतात ते उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी येतात. अशा सर्वांना पैशाअभावी पिण्याच्या पाण्याची थंडगार बाटली घेणे शक्य होत नाही. अशा सर्व नागरिकांसाठी स्वच्छ व थंड पाण्याची सोय व्हावी तसेच त्यांना नि:शुल्क पाणी उपलब्ध व्हावे आणि सर्वात महत्वाचे पाणपोईची दररोज स्वच्छता करून त्यात स्वच्छ व थंडगार पाणी भरण्यात यावे अशी संकल्पना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जिल्हा मासिक गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेसमोर मांडली. त्यांच्या या संकल्पनेस जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून आप-आपल्या पोलीस ठाणे हद्दीत नागरीकांना थंड व स्वच्छ पाणपोईची सोय करुन दिली.
 

Panpoi 2 
 
नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत नंदुरबार जिल्ह्यात एकुण ३० पाणपोई उभारण्यात आलेल्या आहेत. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेल्या पाणपोईचे सर्वत्र कौतूक होत असून नागरीकांचा देखील याउपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 

Panpoi 3