अभाविप तर्फे जिल्ह्यात एक गाव एक तिरंगा अभियानाद्वारे जनजागृती

    दिनांक : 11-Aug-2021
Total Views |
नंदुरबार : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे संपूर्ण देशात एक गाव एक तिरंगा हे अभियान येत्या 15 ऑगस्ट पासून राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अभियानासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अभियान असून नंदुरबार जिल्ह्यातील 8423 कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा संकल्प आहे. अशी माहिती अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी दिली. शहरातील वृंदावन कॉलनीतील कृष्णकुंज कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ABVP_1  H x W:  
यावेळी अभाविपचे जिल्हा संयोजक निलेश हिरे अभियान प्रमुख पृथ्वीराज रावल, शहर मंत्री गणेश चौधरी, शुभम स्वामी उपस्थित होते. सिद्धेश्वर लटपटे यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यात 31 ठिकाणी सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम व 141 गावातील 8423 कुटुंबात भारत माता प्रतिमापूजन व घर घर तिरंगा मन मन तिरंगा हे ब्रीद घेऊन घरावर राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहेत. तालुका, शहर, पाडा व गावांसाठी अभियान प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून गाव, वस्ती, पाडा व कॉलनीतील घरोघरी योगा नागरिकांपर्यंत पोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी परिषद नागरिकांना सहभागी करून घेणार आहे.
 
आगामी वर्षभर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे देशभरात विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात विविध 75 कार्यक्रमांची योजना वर्षभरासाठी आली आहे. अशी माहिती नंदुरबार अभियान प्रमुख पृथ्वीराज रावल यांनी प्रसारमाध्यमांना दिली नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळ दुर्गा मंडळ महिला बचत गट सामाजिक संस्था आणि नागरिकांनी अभियानांतर्गत सार्वजनिक ध्वजारोहन व भारत माता पूजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे व आयोजन करावे असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी केले तसेच एक गाव एक तिरंगा या अभियानाचे पोस्टर अभावीप क्षेत्र संघटनमंत्री राजसिंग यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.