नंदुरबारला १६ लाख ३२ हजारांची अवैध विदेशी मद्यसाठा जप्त

नंदुरबार जिल्हा पोलिसांची धडक कारवाई, पिकअप वाहन चालक फरार

    दिनांक : 11-Oct-2021
Total Views |
नंदुरबार : मध्यप्रदेश राज्यातील खेतिया गावाकडुन म्हसावद मार्गे धडगांव गावाकडे एक मालवाहु पिकअप वाहनाने अवैध विदेशी दारुची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात खाकी रंगाचे खोके दिसून आल्याने खोके उघडून पाहिले असता त्यात ९ लाख २ हजार ४०० रुपये किंमतीच्या मॅकडॉल्व नंबर-१ रिझर्व व्हिस्कीच्या १८० एम.एल.चे एकुण ८० बॉक्स व त्यामध्ये ३ हजार ८४० सीलबंद काचेच्या बाटल्या, ३ लाख ३० हजार ४०० रुपये किंमतीच्या मॅकडॉल्व नंबर-१ रिझर्व व्हिस्कीच्या ७५० एम.एल.चे एकूण २० वॉक्स व त्यामध्ये २४० सीलबंद काचेच्या बाटल्या तसेच एक लोखंडी पितळी मुठ असलेली धारदार तलवार व ५ लाख रुपये किंमतीचे एक महिंद्रा बोलेरो पिक अप वाहन क्र.एम.एच.०४, एफ.जे. ६८६७ असा एकूण १६ लाख ३६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार झालेल्या वाहन चालकाविरुध्द म्हसावद पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
 
daru_1  H x W:
 
पोलीस उप-महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे आदेशान्वये संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात अवैध दारु तस्करांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्याअनुषंगाने ९ रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना माहिती मिळाली की, मध्य प्रदेश राज्यातील खेतिया गावाकडून म्हसावद मार्गे धडगांव गावाकडे एक मालवाहू पिकअप वाहनाने अवैध विदेशी दारुची चोरटी वाहतूक होणार आहे, अशी माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना मार्गदर्शन करुन तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश दिले. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार व ठाणे अंमलदार यांना सोबत घेऊन शहादा-म्हसावद-धडगांव रोडवरील दरा गावाचे पुढे दबा धरुन बसले. रात्रीच्या सुमारास म्हसावद गावाकडुन एक चारचाकी पिकअप वाहन भरधाव वेगाने येतांना दिसले, म्हणून पथकातील अंमलदारांनी त्यास हाताने व बॅटरीच्या सहायाने वाहन उभे करण्याचा इशारा दिला. परंतु संशयीत वाहनचालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने निघून गेला. पथकाची खात्री झाल्याने वाहनाचा पाठलाग केला असता दरा गावाच्या पुढे काही अंतरावर वाहन चालकाने वाहन थांबवुन तेथून पळ काढला. लवकरच फरार झालेल्या आरोपीताला बेड्या ठोकण्यात येतील असे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी यावेळी सांगितले.