नवापुर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

    दिनांक : 17-Dec-2021
Total Views |
नवापुर : तालुक्यातील तुळजाफळी येथील एक अल्पवयीन मुलीवर नवापुर येथे एका शेतात नेवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला याबाबत नवापुर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीता विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक केली.
 
Arrest1_1  H x  
  
येथील सार्वजनिक मराठी शाळा सुटल्यानंतर पिडीत मुलगी पायी घरी जात असतांना नवापुर शहरात हॉटेल रंगुन जवळ एक अनोळखी मुलाने मोटार सायकल वर बसल्यास सांगितले त्यास पीडितेने नकार दिला. पिडीतेस बळजबरीने गाडीवर बसवुन लालबारी गावा जवळ एका शेतात नेवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला म्हणून नवापुर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीता विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
 
घटनेची माहिती नवापुर पोलीसांना मिळताच पो. नि बाळासाहेब भापकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि रविंद्र कळमकर यांनी आरोपीताचा शोध घेण्यासाठी तात्काळ पथकास घटनास्थळी रवाना केले.परंतु स्थानिक गुन्हे शाखा व नवापुर पोलीसांकडे संशयीत आरोपीताचे फक्त वर्णन व स्प्लेंडर हिरो कंपणीची दुचाकी मोटार सायकलचा अपुर्ण व अस्पष्ट नंबर व गाडीचे निळ्या रंगाचे सिटकव्हर एवढीच माहिती पिडीत मुलीकडुन मिळालेली होती. तसेच पिडीत मुलीच्या म्हणण्यानुसार आरोपीताच्या डाव्या हातावर मागच्या बाजुला चार बाणांचे टॅटु गोंधलेले होते, इतर उपयुक्त अशी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती त्यामुळे आरोपी अटक करण्यबाबतचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते.
 
स्थानिक गुन्हे शाखचे व नवापुर पोलीस ठाण्याचे पथक नवापुर शहरात अल्पवयीन मुलीचा नेहमीचा येण्या जाण्याचा मार्गावरील पाहणी करीत असतांना काका वाईन शॉप परिसरातील एका दुकानाच्या सी.सी.टी.व्ही. फुटेज प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यात पिडीत मुलीला एक इसम हा गाडीवरुन घेवुन जातांना दिसत होता. त्या अनुषंगाने मोटार सायकलस्वार याचा तपास करण्याच्या दृष्टीने शहरातील काही भागातील सी.सी.टी.व्ही फुटेजची पुन्हा पडताळणी केली. 
 

Advt_1  H x W:  
 
नवापुर पो नि. बाळासाहेब भापकर हे आप-आपल्या पथकासोबत नवापुर तालुक्यात आरोपीची माहिती घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत 7812 ह्याच नंबरची एक मोटार सायकल केलपाडा गावात देखील आहे. अशी माहिती काढली असता MH-39 AA-7812 असा पुर्ण नंबर मिळाला. तर हि मोटार सायकल अभित उमाकांत वसावे रा. केलपाडा ता. नवापुर यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाल्याने अभित वसावे यांना विचारले असता त्यांनी सी.सी.टी.व्ही. फुटेजमधील मोटार सायकलस्वार पुतण्या अजय धमेंद्र वसावे असल्याचे सांगितले. आरोपी अजय वसावे यास आपली माहिती पोलीस काढत असल्याचे कळताच त्याने केलपाडा येथुन पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अजय धमेंद्र वसावे वय-21 रा. केलपाडा ता. नवापुर यास केलपाडा शिवारातील एका ऊसाचे शेतातुन ताब्यात घेतले. या घटनेबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
 
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.रविंद्र कळमकर, नवापुर पो. नि. बाळासाहेब भापकर, सहा.पो नि संदीप पाटील, महिला स.पो नि नयना देवरे, पो ना जितेंद्र ठाकुर, जितेंद्र तोरवणे, पोलीस अमंलदार अभिमन्यु गावीत, राजेंद्र काटके, दिपक न्हावी, रामेश्वर चव्हाण,रमेश साळुखे,पो उ नि मनोज पाटील, स.पो उ नि गुमानसिंग पाडवी, पो ह दादाभाई वाघ, पो ना जितेंद्र चवहाण, पो अमंलदार योगेश्वर तनपुरे, विनोद पराडके, विश्वास साळुके या पथकाने केली.