नंदुरबार येथे आज मोफत थॅलेसिमिया, सिकलसेल तपासणी शिबीर

    दिनांक : 25-Dec-2021
Total Views |
नंदुरबार : येथील डॉ.अर्जुन लालचंदाणी परिवारातर्फे रविवार, २६ डिसेंबर रोजी मोफत थॅलेसिमिया व सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 
Sickle Cell_1
 
पंधरा वर्षावरील मुल-मुली व नवदाम्पत्य ज्यांना मुल होणे बाकी अशांनी ही तपासणी अवश्य करुन घ्यावी, असे आवाहन डॉ.अर्जुन लालचंदाणी यांनी केले आहे. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च हिमोग्लोबीनोपॅथी डिपार्टमेंट मुंबईचे नंदुरबार युनिट व जनकल्याण रक्त केंद्र नंदुरबार यांच्या सहकार्याने व डॉ.अर्जुन लालचंदाणी परिवारातर्फे सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत येथील गुरु जो दर, नवी सिंधी कॉलनी येथे हे राबविण्यात येणार आहे. थैलेसिमिया व सिकलसेल हे आजार अनुवांशिक असून ते शंभर टक्के टाळता येतात. त्यासाठी मुलगा व मुलीचे विवाहपूर्वक रक्त तपासणी करुन ते थॅलेसिमिया मायनर किंवा सिकलसेल कॅरिअर आहेत किंवा कसे? ते ठरविता येते, अशी माहिती डॉ.अर्जुन लालचंदाणी यांनी दिली. जास्तीत जास्त नागरीकांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.अर्जुन लालचंदाणी यांनी केले आहे.