नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन तर्फे संघ निवड चाचणीचे आयोजन

    दिनांक : 12-May-2022
Total Views |
नंदुरबार : पुणे येथे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कराटे स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन आणि कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने १५ मे रोजी जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर जिल्हा संघ निवड चाचणी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या निरीक्षणाखाली घेण्यात येणार आहे.
 
 
 
 
karate
 
 
 
२७ ते २९ मे २०२२ दरम्यान शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स महाळूंगे बालेवाडी (पुणे) येथे होणार्‍या महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी सब ज्युनियर, ज्युनियर,२१ वय वर्ष आतील तसेच सिनियर कॅडेट मुले व मुली यांच्या स्पर्धा होणार आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी येथील एस.ए.मिशन जिमखाना येथे १५ मे रोजी सकाळी १० वा. जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हा संघ निवड चाचणीत जिल्ह्यातील कराटे खेळावर प्रेम करणार्‍या खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मराठे, सचिव गणेश मराठे, यांनी केले आहे.