विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तळोदातर्फे कारगिल विजय दिवस उत्सव साजरा

    दिनांक : 27-Jul-2021
Total Views |
तळोदा : येथील बालाजी वाडा येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तळोदातर्फे कारगिल विजय दिवस उत्सव साजरा करण्यात आला.
Kargil Din_1  H 
 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजाराम राणे तळोदा प्रखंड अध्यक्ष यांनी केला. विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री श्री. विजयराव सोनवणे यांनी कारगिल विजय दिवस विषयी मांडणी केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सुभाष जैन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष पिंपरी सर होते. या कार्यक्रमात माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिक रूपसिंग पाडवी यांचा सत्कार सुभाष जैन यांनी केला माजी सैनिक रमेश पिंपरे यांच्या सत्कार पिंपळे सर यांनी केला. माजी सैनिक गोरख कलाल यांच्या सत्कार जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे यांनी केला. माजी सैनिक राजेंद्र शेंडे यांचा सत्कार प्रा.राजाराम राणे यांनी केला. माजी सैनिक उदय सूर्यवंशी यांचा सत्कार महेश टोपले यांनी केला.
कार्यक्रमाचे आभार प्रखंड मंत्री दीपक नाना चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रखंड कार्याध्यक्ष डॉ. शांतीलाल पिंपरी, शहराध्यक्ष मुकेश जैन, शहर मंत्री पवन शेलकर, मुकेश सूर्यवंशी, पवन सोनवणे यांनी प्रयत्न केले.