नंदुरबार जिल्ह्यात विशेष लसीकरण शिबिरात ४ दिवसात ८५ हजार ७६८ लसवंत

    दिनांक : 12-Dec-2021
Total Views |
नंदुरबार : नव्याने आलेल्या ‘ओमायक्रॉन’ या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागात चार दिवस विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेस जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चार दिवसात ८५ हजार ७६८ एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

corona_1  H x W 
 
शिबिरात पहिल्या दिवशी २१ हजार ९८६ व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात १८ ते ४४ वयोगटातील ६ हजार ७६७ व्यक्तींनी पहिला डोस तर ७ हजार २०४ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. ४५ वर्षावरील ३ हजार ९६६ व्यक्तींनी पहिला तर ३ हजार ९७३ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. ३ फ्रंटलाईन वर्कर्सनी दुसरा, तर ६३ गर्भवती मातांनी पहिला तर ५ गर्भवती मातांनी दुसरा डोस घेतला. तसेच ४ दिव्यांगांनी पहिला तर १ दिव्यांगांनी दुसरा डोस घेतला आहे.
 
९ रोजी झालेल्या लसीकरण शिबिरात २५ हजार ११९ व्यक्तींनी लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात १८ ते ४४ वयोगटातील ७ हजार ५५८ व्यक्तींनी पहिला डोस तर ६ हजार ९२८ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. ४५ वर्षावरील ५ हजार ४८७ व्यक्तींनी पहिला तर ५ हजार ७४ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. १० रोजी झालेल्या लसीकरण शिबिरात २४ हजार २६ व्यक्तींनी लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात १८ ते ४४ वयोगटातील ७ हजार १३७ व्यक्तींनी पहिला डोस, तर ७ हजार २१३ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षावरील ५ हजार २२७ व्यक्तींनी पहिला, तर ४ हजार ३४३ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. तर ११ रोजी झालेल्या लसीकरण शिबिरात १४ हजार ६३७ व्यक्तींनी लसीचा डोस घेवून लसीकरणात सहभाग घेतला. यात १८ ते ४४ वयोगटातील ४ हजार ४१० व्यक्तींनी पहिला डोस तर ३ हजार ८११ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षावरील ४ हजार ६५ व्यक्तींनी पहिला तर २ हजार २६९ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. ७२ गर्भवती मातांनी पहिला तर ६ गर्भवती मातांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ४ दिव्यांगांनी पहिला डोस घेतला आहे.