नंदुरबार येथे रंगले हिंदु-मुस्लिम एकात्मतेचे कविसंमेलन

    दिनांक : 06-May-2022
Total Views |
नंदुरबार : राष्ट्रीय एकात्मताव हिंदू-मुस्लीम भाईचार्‍याचा संदेश देत नंदुरबार येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या राज्यभर भोंग्यांवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
 
 
 mushay
 
 
 
दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये एकजूट व्हावी म्हणून ईदच्या निमित्ताने नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक परवेज खान यांनी ईद मिलन व एकतेसाठी मन्यार चौकात मुशायरा व कवी संमेलनाचे आयोजन केले होते.
 
कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व विशेष अतिथी म्हणून मालेगाव येथील जमीन साहिर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून मुशायरा व कवी संमेलनाला सुरुवात झाली.