तळोद्यात कलाल समाजाचे स्नेहसंमेलन उत्साहात

लग्न वेळेवर न लागल्यास ११ हजाराचा दंड; सर्वानुमते निर्णय

    दिनांक : 03-Dec-2021
Total Views |
तळोदा : समाजातील काही अयोग्य रूढी चालीरीतींना लगाम लागावा, विखुरलेला समाज पुन्हा एकत्र यावा, लग्न वेळेवर लागावेत यासाठी तळोदा येथील कलाल समाजाच्या मंगल भवनात स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम तळोदा कलाल समाज अध्यक्ष व पंच मंडळीं यांच्या संकल्पनेतून उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा झाली. त्यापैकी काही विषयांवर सर्वानुमते निर्णय घेण्यात आले. कलाल समाजात लग्न वेळेवर न लागल्यास ११ हजारांचा दंड आकारण्यात आला. प्रास्ताविक संजयसा पुरुषोत्तसा कलाल यांनी केले. सूत्रसंचालन दिलीपसा गिरणार यांनी केले. या कार्यक्रमात आर. एस. कलाल, जगदीश कलाल, राहुल सोनवणे, संजयशेठ गुलाबरावशेठ कानडे, गणेश सोनवणे, निश्चल गिरनार, महेंद्र कानडे, रत्नाताई गिरणार, रेखाताई गिरणार, नयनाताई कलाल, मनीषाताई बागुल, प्रदीप कलाल, चंद्रकांत कानडे, डॉ. हेमंत सरवारे, प्रविण कलाल, अक्षय कलाल, राजेंद्र कलाल, संजय कलाल, वासुदेव कलाल, मधूकर कलाल यांनी मनोगत व्यक्त केले.
 
 
kalal_1  H x W:
 
जिल्ह्याभरातील कलाल समाजाध्यक्षांचा संमतीने घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे आहेत. वेळेवर लग्न न लावणार्‍या वर-वधूच्या पित्यास रु. ११ हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. लग्न झाल्यानंतर काही कालावधीतच घटस्फोट होणार्‍या प्रकारांना आळा घालणे, मयताच्या अंत्यसंस्काराच्या वेळी विधवा महिलेने बांगड्या न फोडणे, प्रेताभोवती एकच फेरी मारणे, मयताच्या ठिकाणी खिचडीचा व त्या दिवसाच्या खर्च व्याहींनी करावा. त्याला पंच मंडळ व महिला मंडळाकडून सहकार्य राहील, मयताच्या द्वार दर्शनाच्या वेळी चहापान बंद करणे, मयताचा अकराव्याच्या दिवशी अकराच्या ऐवजी एकच पितर बसवणे, मयत व्यक्तीच्या कुटुंबातील इतर सुतकीन्ना टोप्या न घालता अग्नीडाग दिलेल्या व्यक्तीसच टोपी चढवावी. असे निर्णय या स्नेहसंमेलनात घेण्यात आले.
या कार्यक्रमात जळगाव, चोपडा, धुळे, भुसावळ, ठाणे, सुरत, वसई, वर्धा, नंदुरबार, हातेड, शिरपूर, शहादा व इतर ठिकाणाहून समाज अध्यक्ष व तळोदा समाजातील पंच मंडळी व समाज बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान महेंद्रसा कलाल यांची ओ. बी. सी सेलच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला, शहादा येथील राजेंद्रसा कलाल यांनी समाजातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांसाठी रु. ५ हजाराचा धनादेश संजयसा कलाल यांच्याकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तळोदा पंचमंडळींनी व युवकांनी परिश्रम घेतले. आभार प्रकाश मनोहरसा कलाल यांनी मानले.
 
व्यावसायिक वरासही पसंती द्यावी....
स्नेहसंमेलनात अनेकानेक दिग्गज व्यक्तींनी आपापले मुद्दे मांडले. परंतु फक्त नोकरी करणाराच उपवर न शोधता, व्यावसायिक वरास ही पसंती, प्राधान्य द्यावे. जैन, मारवाडी, राजस्थानी समाजाप्रमाणेच आपल्या युवकांनी ही व्यवसायाकडे वळायला पाहिजे. समाजाने त्यांच्या पाठीशी उभ राहायला हवे, तसेच धार्मिक विधींच्या नावाखाली मुक्या प्राण्यांच्या बळी घेऊन ते मांस राक्षसांप्रमाणे माणसांनी फस्त करू नये, असे मत अक्षय भगवान कलाल यांनी व्यक्त केले.
 
 
स्नेहसंमेलनातून समाजाला दिशा...
कलाल समाजातील काही समाज बंधू भगिनी जरी इतर जिल्ह्यात गावात राहत असले तरी प्रत्येकाचे नाते संबंध तळोद्याशी जुळले आहेतच, म्हणून समाजातील प्रत्येक बांधवाने समाजाच्या नवीन मंगल भवनासाठी यथाशक्ती देणगी द्यावी, आजच्या स्नेहसंमेलनातून नक्कीच नवी दिशा मिळेल सर्वांचे सहकार्य लाभेल अशी आशा आहे.
 
- संजयसा पुरुषोत्तमसा कलाल, अध्यक्ष, कलाल समाज, तळोदा