Tuesday, 23 September, 2025

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख जाहीर?

    दिनांक : 26-Mar-2022
Total Views |
मुंबई : आलिया - रणबीरच्या लग्नाची तारीख जाहीर... 'गंगुबाई काठियावाडी', 'RRR' असे बॅक टू बॅक हिट देणारी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt Latest Movies) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे.
Alia and Ranbir  
 
दरम्यान अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर लवकरत लग्न करणार (Alia Bhatt and Ranbir Kapoor Wedding Date) असल्याचं वृत्त तुम्ही वाचलं असेलच. पण आता या कपलच्या चाहत्यांना त्यांचं लग्न कधी होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आलिया-रणबीर चं लग्न कधी होणार याबाबत अंदाज बांधला जात आहे. सुरुवातीला अशी माहिती समोर आली होती की हे कपल यावर्षी डिसेंबरमध्ये बोहल्यावर चढेल, नंतर असं समोर आलं की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोघांचं लग्न होऊ शकतं.
पण लेटेस्ट मीडिया रिपोर्टनुसार अशी माहिती मिळते आहे की, आलिया-रणबीर काहीच दिवसात अर्थात पुढील महिन्यात एप्रिल 2022 (Alia Bhatt and Ranbir Kapoor marriage date) मध्ये लग्न करू शकतात. दरम्यान कोणतीही अधिकृत निश्चित तारीख समोर आलेली नाही आहे. आलिया - रणबीर हे कपल ऑनस्क्रीन आतापर्यंत एकत्र दिसलं नाही आहे. मात्र लवकरच ते 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहेत. आलियाच्या वाढदिवशी तिचा या सिनेमातील लुक देखील रीव्हिल करण्यात आला होता. या कपलला ऑनस्क्रीन बघण्याची तर चाहत्यांना अशी इच्छा आहेच, पण त्यांच्या लग्नाबाबत चाहते अधिक उत्सुक आहेत. आरआरआर म्हणा किंवा गंगुबाई काठियावाडी म्हणा, या दोन्ही सिनेमांच्या प्रमोशन दरम्यान आलिया-रणबीर बाबत अनेकदा प्रश्न विचारण्यात आले होते. तिनेही या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरं दिली होती. त्यामुळे या कपलने लवकरात लवकर लग्न करावे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
2021 मध्येच झालं असतं लग्न रिपोर्ट्सनुसार, अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचे लग्न 2021 सालीच होण्याची योजना होती. मात्र कोरोनामुळे या देखील लग्नात विघ्न आलं. रणबीर एका मुलाखतीत असं म्हणाला होता की कोरोना पँडेमिक नसतं तर त्याने आलियाशी केव्हाच लग्न केलं असतं. आलियाला जेव्हा याविषयी विचारण्यात आले त्यावेळी ती म्हणाली की, 'त्याचं म्हणणं बरोबर आहे मात्र मी माझ्या डोक्यात रणबीरशी केव्हाच लग्न केलं आहे. खूप काळ आधीपासूनच मनातून मी रणबीरशी लग्न केलं आहे. सर्वकाही घडण्याची एक वेळ असते. जेव्हा केव्हा आम्ही लग्न करू तेव्हा ते योग्य आणि सुंदर असेल'.
अन्य बातम्या