अन्...साराचा हरवला फोन

    दिनांक : 05-Dec-2021
Total Views |
मुंबई : रणवीर सिंहच्या आगामी '83′ च्या स्पेशल स्क्रिनिंगच्यावेळी सारा अली खानदेखील आली होती. सिनेमा संपल्यावर ती बाहेर आली खरी पण थोड्याच वेळात आपला फोन हरवला आहे, असे तिच्या लक्षात आले. म्हणून ती धावत धावतच परत आतमध्ये गेली. थोड्या वेळाने ती बाहेर आली, पण तिच्याकडे तिचा फोन नव्हता. रडवल्या आवाजात ती फोटोग्राफर्सना म्हणाली 'अरे माझा फोन हरवला आहे.
sara_1  H x W:  
 
त्यानंतरही काही पापराझी साराचे फोटो काढत राहिले. त्यामुळे चिडलेली सारा त्यांना उद्देशून म्हणाली, 'तुम्ही फोटो काय काढता आहात.' तिचा राग समजू शकतो. मात्र, यामध्ये पापराझींची काय चूक आहे? साराला नंतर तिचा फोन मिळाला. त्यामुळे तिचा राग शांत झाला असावा. सारा आगामी 'अतरंगी रे' मध्ये दिसणार आहे. यामध्ये धनुष आणि अक्षयकुमारबरोबर तिचा प्रेमाचा त्रिकोण आहे. एका मुलीने दोन मुलांबरोबर राहू नये. असे का असावे ? जर असे असेल तर काय आंदोलन होईल का? असे असू शकते, कारण त्यामध्ये निरागसता असू शकते, असे सांगणारी ही कथा आहे.