'मधुबन में राधिका नाचे' गाण्याचे नाव आणि बोल बदलणार !

हिंदू समाजाच्या विरोधापुढे झुकले "सारेगामा म्युजिक" !

    दिनांक : 27-Dec-2021
Total Views |
भोपाळ : 'सारेगामा म्युझिक' या म्युझिक लेबलने आता सनी लिओनच्या 'मधुबन में राधिका नाचे' या गाण्याचे बोल बदलण्यास सहमती दर्शवली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, 'मधुबन' गाण्याचे बोलच नव्हे तर ताज्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन आणि देशवासीयांच्या भावना लक्षात घेऊन नाव देखील बदलले जाईल.

Madhuban-mein-radhika-nac 
 
भारतातील सर्वात जुने म्युझिक लेबल 'सारेगामा म्युझिक' ने सांगितले की, नवीन गाणे येत्या तीन दिवसात जुन्या गाण्याची जागा घेईल. हा बदल सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर केला जाईल, जिथे हे गाणे रिलीज झाले आहे. वृत्त लिहिपर्यंत हे गाणे यूट्यूबवर १.०१ दशलक्ष वेळा पाहिले गेले होते. २.१९ लाख लोकांनी लाइकही केले आहे. हे गाणे गायक कनुका कपूरने गायले असून संगीत शारिब-तोशी यांनी दिले आहे. चॅनलने २०२१ या गाण्याचा खूप जोरात प्रचार केला होता.
 
मथुरेच्या संतांनीही या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या गाण्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचे आणि ते गाणे अतिशय अश्लील असल्याचे समाजमाध्यमांत वारंवार टीका केली जात होती .वृंदावनचे संत नवल गिरी महाराज यांनी तर सनी लिओनची माफी मागितल्याशिवाय तिला भारतात राहू देऊ नये, असे म्हटले होते.अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेनेही सनी लिओनीच्या 'मधुबन' गाण्यावर आक्षेप घेतला होता. ज्या पद्धतीने हे गाणे चित्रित करण्यात आले आहे, त्यामुळे संपूर्ण ब्रिजभूमीची प्रतिमा आणि प्रतिष्ठा डागाळली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
 
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही इशारा दिला होता की, “काही पाखंडी लोक सातत्याने हिंदूंच्या भावना दुखावत आहेत. राधा ही आमची देवी आहे. या देशात राधेची वेगळी मंदिरे आहेत. राधा मातेची पूजा केली जाते. हा साकिब तोशी, तो त्याच्या धर्मावर काही गाणी रचू शकतो का? त्यांनी फक्त आमचा धर्म आणि श्रद्धा दुखावली. त्याचे 'मधुबन में राधिका नाचे' हे गाणे असाच एक दुर्दैवी प्रयत्न आहे. मी सनी लिओन आणि साकिब तोशी यांना ताकीद देत आहे कि.दोघांनीही तीन दिवसांत माफी मागून गाणे काढून टाकले नाही, तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू.”