आज श्रेया घोषाल यांचा वाढदिवस , आईकडून मिळाला संगीताचा वारसा, ‘सारेगमप’मधून केली करिअरची सुरुवात! वाचा श्रेया घोषालबद्दल...

    दिनांक : 12-Mar-2022
Total Views |
श्रेया घोषाल ही एक बॉलिवूडची आघाडीची अन् प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. श्रेयाचा जन्म 12 मार्च 1984 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मात्र, ती लहानाची मोठी राजस्थानमध्ये झाली. सुमधुर गळा लाभलेली श्रेया ‘मेलडी क्वीन’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. शर्मिष्ठा घोषाल आणि विश्वजित घोषाल यांच्या मुलीला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. श्रेयाने संगीताचे धडे आई शर्मिला यांच्याकडूनच गिरवले.
 

 
ghoshal

 
 
श्रेयाने आपल्या आवाजच्या जोरावर 7 फिल्मफेअर पुरस्कार, 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहे
.
रिअॅलिटी शोमधून सुरुवात!
 
श्रेया घोषाल 20 वर्षांपासून आपल्या गोड आणि जादुई आवाजाने श्रोत्यांचे मनोरंजन करत आहे. श्रेया रिअॅलिटी शोची परीक्षक देखील आहे. कधीकाळी स्वतः श्रेयादेखील अशाच एका स्पर्धेत सहभागी झाली होती. 'सा रे ग म प' हा रिअॅलिटी शो जिंकून वयाच्या 16व्या वर्षी श्रेयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या शोमधून आपल्या मधुर प्रवासाला सुरुवात करणाऱ्या श्रेयाने संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
 
इंडस्ट्रीत नो डेटिंग!
 
श्रेया घोषाल दीर्घकाळ बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगतात वावरली. पण, कधीही कोणत्याही गायक आणि संगीत दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली नाही. श्रेयाने शिलादित्य मुखोपाध्याय यांच्याशी 2015मध्ये लग्नगाठ बांधली. शिलादित्य हा श्रेयाचा बालपणीचा मित्र आणि व्यवसायाने इंजिनियर आहे. एकदा टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत श्रेयाने सांगितले होते की, 'मी कधीही गायक किंवा संगीत दिग्दर्शकाला डेट केले नाही. कारण, जेव्हा तुम्ही दुसऱ्या इंडस्ट्रीतील एखाद्याला डेट करता तेव्हा तुम्हाला इतर क्षेत्रातील लोकांचे मत जाणून घेण्याची संधी मिळते.’
 
श्रेया आता तिच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे. जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. श्रेया आता एका मुलाची आई देखील आहे.