अनन्याने आगामी सिनेमे तूर्तास थांबवले

    दिनांक : 31-Oct-2021
Total Views |
मुंबई : अनन्या पांडे बॉलिवूडमधील चुलबुली गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. क्रूझ ड्रग प्रकरणात आर्यन खानपाठोपाठ अनन्या पांडेचीही चौकशी केली जात आहे. त्यामुळे तिच्या सध्या सुरू असलेल्या सिनेमांबाबतही उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. अर्थात हे प्रकरण कधी निवळणार आहे, हे कोणीच सांगू शकत नाही. अनन्या पांडे करण जोहरची खूप लाडकी आहे. चंकी पांडे आणि त्याची पत्नी भावना पांडे देखील करण जोहरचे चांगले मित्र आहेत. करण जोहरने अनन्याला 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून लॉंच केले होते.
 
ananya_1  H x W
 
सध्या तेलगू स्टार विजय देवरकोंडाबरोबर 'लायगर' आणि आणखीन एक सिनेमा करण जोहर अनन्याला घेऊन करतो आहे. या दोन्ही सिनेमांचे काम सध्या थांबवले गेले आहे. पण चौकशी पूर्ण झाल्यावर अनन्याला कामाला सुरूवात करायला काहीच हरकत नसावी. कारण वर्षभरापूर्वी अशीच चौकशी दीपिका पदुकोणचीही झाली होती. तिला क्‍लीन चीट मिळाली आणि तिने लगेच कामाला सुरूवातही केली. त्यामुळे अनन्यालाही काही धोका नसावा.