भारती सिंग होणार 'आई'

खास व्हिडिओद्वारे शेअर केली गूडन्यूज

    दिनांक : 11-Dec-2021
Total Views |
मुंबई : कॉमेडी क्वीन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांनी नुकतीच चाहत्यांना खूषखबर दिली आहे. ही जोडी त्यांच्या आयुष्यात पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. युट्युब व्हिडिओ वर त्यांनी खास व्हिडिओ करत या गोड बातमीची माहिती दिली आहे. युट्युब वर 'हम मा बनने वाले है' अशा टायटल खाली तिने व्हिडिओ बनवला आहे.

bharati_1  H x  
 
भारती सिंग बाथरूम मध्ये प्रेगनंसी टेस्ट करत असल्याच्या व्हिडिओ 'LOL Life Of Limbachiyaa's' या युट्युब चॅनेल वर शेअर केला आहे. यामध्ये मागील 6 महिन्यांपासून टेस्ट करत आहे. हा आनंदाचा क्षण तिला मिस करायचा नसल्याने कॅमेरा ऑन ठेवत असल्याचं तिने म्हटलं आहे. या वेळेस जेव्हा तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.