'फॅंड्री'तला जब्या करणार पुनरागमन

    दिनांक : 03-Oct-2021
Total Views |
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत फॅन्ड्री चित्रपटात जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडेने साकारली होती. या चित्रपटातून त्याला घराघरात ओळख मिळाली होती. आता तो पुन्हा दिसणार आहे. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुनील मगरे दिग्दर्शित या चित्रपटात फँड्री फेम सोमनाथ अवघडे, अपूर्व एस.यांच्यासह 'सैराट' चित्रपटातील जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेमाच्या महिन्याचे औचित्य साधून या प्रेमकथा असलेल्या 'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता लवकरच प्रेक्षकांना या प्रेमाचा दणका चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
 
f_1  H x W: 0 x