आता छोट्या पडद्यावर दिसणार सिल्व्हरस्टर स्टॅलोन

    दिनांक : 09-Dec-2021
Total Views |
मुंबई : सिल्व्हरस्टर स्टॅलोन हा अशा काही निवडक कलाकारांपैकी एक आहे, जो जेथे जाईल तेथे त्याचे चाहते त्याची वाट बघत असतात. रॉकी आणि रॅम्बोची क्रेझ अजूनही युवकांमध्ये आहे. आता स्टॅलोनची जादू टीव्हीवरही बघायला मिळणार आहे. पॅरामाऊंट प्लसवरील 'कनास सिटी' या सीरिजमध्ये स्टॅलोन काम करणार आहे. 'यलोस्टोन'चे लेखन करणाऱ्या टेलर शेरीडननेच या सिरीजचे लेखनही केले आहे. लीड रोलमधील स्टॅलोनची ही पहिलीच टीव्ही सीरिज असणार आहे. यापूर्वी पाहुणा कलाकार म्हणून त्याने काही टीव्ही सीरिजमध्ये काम केलेले आहे.
roki_1  H x W:  
 
स्टॅलोन 'रॉकी' सीरिजमधून लोकप्रिय झाला होता. आश्‍चर्य म्हणजे 'रॉकी'च्या पहिल्या सिनेमाची पटकथा त्याने स्वतःच लिहिली होती. या सिनेमाला 10 श्रेणींसाठी ऑस्करचे नामांकन मिळाले होते. त्यापेक्षाही जास्त लोकप्रियता त्याला रॅम्बोच्या सीरिजमधून मिळाली होती. ऍक्‍शनपटांमध्ये त्याला पैसा आणि प्रसिद्धी खूप मिळाली. आता वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर गेली काही वर्षे तो निवृत्तीचे आयुष्य मजेत जगतो आहे. आता आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला टीव्हीवर किती यश मिळते आहे, याचाही अनुभव घेता येईल.