अनुपम खेर झाले भावूक

    दिनांक : 02-Apr-2022
Total Views |

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर Anupam Kher हे सध्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात अनुपम खेर यांनी काश्मिरी पंडित पुष्कर नाथ यांची भूमिका साकारली होती.

 

kher 

 

विशेष म्हणजे त्यांच्या खऱ्या आयुष्यात त्यांच्या वडिलांचे नावही पुष्कर नाथ होते. अनेक वर्षांनंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या वडिलांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक भावूक कॅप्शनही दिले आहे.
 

या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अनुपम खेर Anupam Kher यांची ही पोस्ट चर्चेत आहे. अनुपम खेर यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी त्यांचे वडिल पुष्कर नाथ यांचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत अनुपम खेर यांचे वडिल हे एका खुर्चीत बसल्याचे दिसत आहे. तर अनुपम खेर हे त्यांच्या मागे उभे आहेत. त्यांचा हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहे. हा फोटो शेअर करताना अनुपम खेर म्हणाले, "माझे वडील पुष्कर नाथ जी यांच्यासोबतचा हा माझा शेवटचा फोटो होता. यानंतर ११ दिवसांनी त्यांच्या मृत्यू झाला. ते एक सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगले. त्यांनी आयुष्यात कधीच कोणाचे मन दुखावले नाही. ते सामान्य माणूस तर होते, पण त्यासोबतच एक असामान्य वडीलही होते. त्यांना काश्मीरमधील त्यांच्या घरी जायचे होते. मी कश्मीर फाइल्स हा चित्रपट त्यांना समर्पित करतो.